मुंबई : शेतीचे पाणी उद्योगांकडे वळविणारे विधेयक म्हणून टीकेचे लक्ष्य बनलेले जलसंपत्ती नियमन प्राधिकरण सुधारणा विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मंजूर होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. तसेच या विधेयकात काही सुधारणा देखील करण्यात येणार आहेत. १३ एप्रिलला मध्यरात्रीनंतर दीड वाजता विधानसभेत हे विधेयक मंजूर करून घेण्यात आले होते. त्याला विरोधी पक्षांनी तीव्र विरोध केला होताच पण दुसऱ्या दिवशीपासून काँग्रेसच्या आमदारांनीही विरोधाचा सूर लावला.गजानन तुरे तुझ मना पासून अभिनंदन. फेस बुक वर मराठी बांधव प्रेम, खादाडी, पिणे फालतू विनोद कविता आणि त्याच त्या...........................
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी या विधेयकाविरुद्ध आघाडी उघडत स्वपक्षीय आमदारांना सोबत घेऊन काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली होती आणि हे विधेयक रोखण्याची मागणी केली होती. विधेयक मंजूर झाल्यास त्याचा मोठा फटका काँग्रेसला विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. आवश्यक सुधारणांसह विधेयक उद्या, बुधवारी विधान परिषदेत मांडले जाईल आणि त्यावर चर्चा केली जाईल.
गजानन तुरे तुझ मना पासून अभिनंदन. फेस बुक वर मराठी बांधव प्रेम, खादाडी, पिणे फालतू विनोद कविता आणि त्याच त्या ५० वर्षा पूर्वीच्या आपल्याच लेखकाचे कौतुक या पलीकडे जात नाही.शिक्षणा मुळे साक्षर झालेल्या बहुजन समाजातील खेड्या पाड्यातील गावकुसा बाहेरच्या नवीन लेखकांचा तर यांनी नेहमीच तिरस्कार केला. व्याकरणाचे शुद्ध भाषेचे स्तोम माजवत या लेखनाला तुच्छ लेखले जाते. परभणी सारख्या गावात राहून तु पाणी प्रश्नाचा एव्हढा ज्वलंत प्रश्न मांडला हे खरच कौतुक करण्या सारखे आहे. पर मित्रा या पोस्ट वर किती प्रतिक्रिया येतील शंकाच आहे. या पेक्षा तु प्रेम कविता यावर फालतू लिहिले असते तर २५-३० प्रतिक्रिया आल्या असत्या. पण यामुळे तु असे ज्वलंत प्रश्न मांडण्याचे सोडू नको. ग्रामीण भागातील तुझ्या सारख्यांना येथे जमा कर . कारण येथे सर्व शहरी ज्यांना भारतातील खेड्याशी कांही देणे घेणे नाही असे लोक जमले आहे. आपला लढा आपणासच द्यावा लागेल. कारण तुम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी दिल्ही आणि मुंबई ला गेले की कारखानदारीचे गुलाम होतात. म्हणूनच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी हे अंधारात शेतीचे पाणी पळवणारा कायदा करणार. आणि आपण शेतकरी आत्महत्या करण्या शिवाय कांही करू शकत नाही. पण यांना विरोध केलाच पाहिजे. विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मंजूर होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. पण या मुळे आपण गाफील राहता कामा नये. हे विधयेक पूर्ण फेटाळले जाई पर्यंत लढा द्यावाच लागेल. आता आत्महत्या आपण करायच्या नाही तर या नेत्यांनी केल्या पाहिजे. परभणीचे काय हाल आपल्या नेत्यांनी केले हे तु पाहतोच आहे.
तेंव्हा हा रस्ता अटळ आहे ! अटळ आहे घाण सारी अटळ आहे ही शिसारी एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा, होतील भुते या सोन्याचे बनतील सूळ सुळी जाईल सारे कूळ ऐका टापा! ऐका आवाज! लाल धूळ उडते आज त्याच्यामागून येईल स्वार
या दगडावर लावील धार! इतके यश तुला रगड माझ्या मना बन दगड
No comments:
Post a Comment