Translate

Sunday, March 24, 2013

वाटर पार्क , रेन वाटर बंद करावेत .सध्या FB च्या अनेक साईटवर वर होळीला पाण्याची नासाडी, उधळपट्टी म्हणून होळी खेळू नका असे आवाहन केल्या जात आहे.... त्याच बरोबर आम्ही होळी नाही खेळली तर दुष्काळग्रस्ताना पाणी मिळणार आहे का?? आमच्या धार्मिक उत्सवावर बंदी घालणारे तुम्ही कोण ??? आमचा पैसा खर्च करून आम्ही पाणी,रंग उडवले तर इतरांना विरोध करण्याचा हक्क नाही इत्यादी इत्यादी .......
एक दिवस होळी खेळून पाणी वाचावा हा संदेश सल्ला चांगला आहे. पण आपण जेंव्हा असा सल्ला देतो किंवा पाण्याच्या उधळपट्टी बद्दल बोलतो दुसऱ्यावर आरोप करतो तेंव्हा आरोप करणाऱ्याची तीन बोटे त्याच्या स्वतः कडे त्या आरोपांचे निर्देश करत असतात हे आपण सोयीस्कररीत्या विसरतो. ……. मुंबई मधील ३६५ दिवस दिवसच्या २४ तास पाण्याच्या गैरवापराचे , अपव्यया चे कांही फोटो जोडत आहे. . १९८०च्या जागतिक बाजारीकरणाच्या नावाखाली या देशाचा विकास म्हणण्या पेक्षा विद्रूप भकास करण्यात आला . सामाजिक बांधिलकी कश्याला म्हणतात याचे कांहीही सोयरेसुतक या अर्थतज्ञाना, विकासकाना नाही. मुंबई पुणे अश्या मोठ्या शहरांचा , मनोरंजनांचा अविवेकी विकास करण्यात आला.

सावधान!!!!

 
सावधान!!!! इस पार्लर से बाहर आनेवाली युवा तरुणी 
आपकी नानी, दादी हो सकती है. 

भरे पेट बाते करना......नैतिकता की बाते करना आसन है .

भरे मनोरजन पार्क में कृत्रिम बारिश में भीगते हुवे ......... आर्टीफिशियल वाटर पार्क में पानी की बरबादी करते हुवे, मौज करते हुवे आम आदमी को होली पानी से मत खेलो कहना आसान काम है। पहले मुंबई और बड़े शहर में ये जो पानी की बरबादी हो रही है वो बंद करे फिर आम आदमी के त्यौहार के बारे में बिन काम की राय दे। अगर ये वाटर पार्क रेन डांस पार्क बंद हुवे तो शेकडो गाँव के लाखो जनता को पिने के लिए पानी मिलेगा। है आपमे ये हिम्मत????? की खुद का मनोरजन बंद करके, खेडे के आम आदमी को पिने के लिए पानी उपलब्ध कराये।।।। भरे पेट बाते करना , लोंगो को राय देना,  नैतिकता की बाते करना आसन है . पहले आप पानी की बरबादी करना बंद करो तो अकाल गिरेगा ही नहीं और आम आदमी को पानी भी आसानी से मिलेगा .... और  आपकी FB पोस्ट करके नकली समाजसेवा की समय बरबादी भी कम होगी।

Wednesday, March 20, 2013

बिन पाण्याने हजामात

कृतानेक शिर साष्टांग नमस्कार विनंती विशेष'

महाराष्ट्राची गंभीर पाणी टंचाई आणि दुष्काळी परिस्थिती पहाता आणि
अनेक समाज विचारवंतानी पाणी बचतीचे केलेले आवाहन लक्षात घेऊन
 मी जल बचती साठी बिन पाण्याने हजामात करण्याचा संकल्प सोडला आहे.

कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेच...तरीही आपला आशीर्वाद असावा....
कळावे लोभ असावा ही विनंती ....
आपला
Thanthanpal
हल्ली मुक्काम पोस्ट ओसाडगावं राज्य महाराष्ट्र इंडिया

Sunday, March 17, 2013

लॉर्ड मेकॉले यांची आधुनिक बाटगी अवलाद ..

http://www.loksatta.com/desh-videsh-news/english-dropped-from-chinese-university-exams-82773/ 
  एकीकडे चीन चीनच्या नामवंत विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षा पद्धतीतून इंग्रजी भाषेला वगळले आहे.  तेथे आता इंग्रजी हा सक्तीचा विषय राहणार नाही. तर दुसरी कडे भारतात ( थॉमस बॅबिंग्टन मेकॉले [१८०० - ५९).]  आज लॉर्ड मेकॉले नसला तरी देशाच्या शिक्षणक्षेत्रात शिरकाव केलेल्या लॉर्ड मेकॉले यांची आधुनिक बाटगी अवलाद भारतीय शिक्षण व्यवस्था, संस्कृती भाषा नष्ट  करण्यात आघाडीवर आहे. त्यांच्या इंग्रजाळलेल्या सडक्या मेंदू मधून UPSC केंद्रीय परिक्षां मधून भारतीय प्रादेशिक भाषांचे पद्धतशीर प्रयत्न नेहमीच केले जातात. याचा ताजा अनुभव असतानाच चीन ने प्रवेश परीक्षेतून इंग्रजीला वगळले हि बातमी बरेच कांही सांगून जाते. आणि भारतात २ वर्षाच्या मुलांचा इंटरव्यू  सुद्धा या बाटग्या नर्सरी स्कूल इंग्रजी मधून घेतात ...पण याची  कोणालाही  लाज , खंत वाटत नाही , वाईट वाटत नाही........  भारताला खतम  करण्यासाठी पाक च्या  दहाषदवाद्यांची गरज नाही...ते काम आपली बाटगी भ्रष्ट्र नौकारशाही आणि बाटगे , भ्रष्ट्र बेईमान राजकारणी करण्यास समर्थ आहेत.  बर्बादे गुलिस्तां करने को बस एक ही उल्लू काफी है , यांह तो हर शाख पर उल्लू बैठा है अंजाम-ए- गुलिस्तां क्या होगा ?

Monday, March 11, 2013

दिल्ली गैंग रेप चे भूत......

दिल्ली गैंग रेप चे भूत सरकारच्या मानगुटी वरून उतरता उतरेना ....दिल्ली गैंग रेप चा मुख्य आरोपी रामसिंग याने दिल्ली मधील सी सी TV कॅमेरे असलेल्या हाय सेकुरेटी जेल विभागातील कोठडी मध्ये आत्महत्त्या केली... आणि सी सी TV कॅमेरे असलेल्या हाय सेकुरेटी जेलचे वाभाडे काढले ...जेल प्रशासनाची इज्जत जगाच्या वेशीवर टांगली......आता ही आत्महत्त्या आहे का पोलिसांनी, त्याच्या साथीदारांनी केलेला खून आहे.........सरकारची माथेफोड सुरु झाली.

हुरळली इंडियन मेंढी लागली अमेरिकन लांडग्याच्या मागे अशी झाली आहे. ………ज्या अमेरिकेत प्रत्येक सहाव्या मिनिटाला  एका अमेरिकन महीलेवर बलात्कार होतो , आणि ५ पैकी एका महीलेवर आयुष्यात कधीना कधी एकदा तरी बलात्कार झालेला असतो, ज्या अमेरीकेत पुरुष सैनिक आपल्याच सहकारी महीला सैनिकावर बलात्कार करण्यात बदनाम झालेले आहेत त्या अमेरिकेने  जागतिक महिला दिनी ८ मार्च २०१३  रोजी दिल्लीमध्ये गेल्या वर्षी धावत्या बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची बळी ठरलेल्या 23 वर्षीय तरुणीला अमेरिकेमध्ये आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्काराने गौरविण्यात आले.. तीच्या वर अत्याचार झाला ती पुरुषाच्या वासनेला बळी पडली तीचा जीव गेला आणि हे राजकारणी तीचा जागतिक साहसी महीला म्हणून गौरव करत आहेत. अमेरिकेने आपल्या स्वतः च्या देशातील बलात्कारी महिलेचा असा पुरस्कार देवून कधी गौरव केला नाही.. आणि कोणताही संवेदनाशील देश (इंडिया सोडला तर)  अश्या लांच्छनास्पद कृत्याला राष्ट्रीय अभिमानाचा विषय बनवणार नाही. पण आमची अवस्था  हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या मागे या म्हणी प्रमाणे  हुरळली इंडियन मेंढी लागली अमेरिकन लांडग्याच्या मागे  अशी झाली आहे. ………

ही बातमी आणि गेले तीन महिने या बलात्कारावर आपले राजकारणी , साधुसंत, सेलिब्रेटीज आणि भांड मिडीया ज्या तऱ्हेने बेताल बडबड करत आहेत, बातम्या देत आहेत त्या वाचल्यावर १७/ १८ शतकात मेलेल्या नवरया बरोबर जिवंतपणी जाळल्या जाणाऱ्या, सती जाणारया स्त्रीयां वरील अत्याचारांची  आठवण झाल्या शिवाय राहत नाहीं . स्त्रीला जिवंत जाळून मारायचे आणि वर ती सती गेली म्हणत तीचे मंदीर उभे करत तीची पूजा करायची तसाच हा प्रकार झाला आहे. Wednesday, March 6, 2013

नुरा कुस्ती ...एक लुटुपटीचा ; खोटा . खेळ ....


आजच्या संगणक पिढीला नुरा कुस्ती माहीत असणे शक्य नाहीं ...पण कुस्तीच्या आखाड्यात एके काळी नुरा कुस्त्या चांगल्याच गाजत असत... दोन पहेलवान मोठमोठया गर्जना करत एकमेकाना आव्हाने प्रति आव्हाने देत कुस्ती लढत ......पण मोठ्या प्रमाणात कुस्ती पाहण्यास जमलेल्या कुस्ती प्रेमींची मात्र कुस्ती संपल्या वर निराशा होई ..तुल्यबळ मल्लांमध्ये कुस्तीचे डाव रंगतील असा सुरुवातीला मोठा गाजावाजा होवून प्रत्यक्षातली लढत म्हणजे अगोदरच निकाल ‘फिक्स’ झालेली नुरा कुस्ती.. आपण फसवले गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात येई.....कारण प्रचंड गाजावाजा करत झालेली ही कुस्ती हारजीत चा फैसला न होताच संपवली जाई..... कारण ही कुस्ती म्हणजे एक लुटुपटीचा ; खोटा . खेळ असे.

Friday, March 1, 2013

मौत का फ़रिश्ता रिश्वत नहीं लेता....

मौत का फ़रिश्ता रिश्वत नहीं लेता .... इसी लिए मौत के बाद दुनिया में रहना हो तो नेत्रदान , अवयव दान किजिये ..... जन हितार्थ जारी...