Translate

Monday, April 30, 2012

जनतेच्या वेदना या नेत्यांना समजत नाही हेच मराठवाड्यातील जनतेचे दुर्भाग्य आहे.....


मराठवाड्यातील दुष्काळ पाण्याची टंचाई, चारापाण्या शिवाय खंगत चाललेले पशुधन उजाड होणारी गावे खेडी या पेक्षा या भागातील लोकप्रतिनिधीचा नियोजन शून्य कारभाराचा नमुना.......योजना राबवण्याच्या कल्पनेचा दुष्काळ याचा फटका मराठवाड्यातील जनतेला जास्त बसत आहे......आजच्या बाजारीकरणाच्या युगात प्रत्येक गोष्टीचा पद्धतशीर प्रचार करावा लागतो तरच त्या वस्तू ची विक्री होते .दुष्काळाचे हि तसेच आहे ...जो पर्यंत तुम्ही दुष्काळाच्या नावाने मिडीयाला हाताशी धरून बोंबा बोंब करत नाही.... तो पर्यंत शासकीय मदत तुमच्या पर्यंत पोहंचत नाही.....आणि हे ध्यानात घेवूनच पश्चिम महाराष्ट्रातील शरद पवारा पासून ते ग्रामपंचायती सर्वांनी दुष्काळा ची पद्धतशीर ओरड चालू केली .....
 
वास्तविक संपूर्ण महाराष्टातच दुष्काळ पडला आहे. मराठवाड्यात तर पश्चिम महाराष्ट्रा पेक्षा जास्त दुष्काळ आहे...पण या बद्दल कोणता ही राजकारणी बोलत नाही....इतर विभागातील नेत्यांचे जावू द्या ...पण आपल्या विभागातील नेते सुद्धा तोंडाला चिकट पट्टी लाऊन गप्प बसले आहे......जनतेच्या वेदना या नेत्यांना समजत नाही हेच मराठवाड्यातील जनतेचे दुर्भाग्य आहे......निसर्गाच्या दुष्काळा पेक्षा मराठवाड्याच्या नशिबी असलेला नेत्यांच्या नियोजनाचा विचारांचा दुष्काळ जास्त भयानक आहे...... राज्यातील 31 जिल्ह्यांत टंचाईच्या झळा बसत आहेत. मराठवाडा, विदर्भातील मोठी शहरे तहानलेली असतातच. त्यात यंदा पश्‍चिम महाराष्ट्रातील नगर, सांगली, साताऱ्यातील बराचसा भाग आणि सिंधुदुर्गमधील काही तालुक्‍यांची भर पडली आहे...तरी ही आपण अजून झोपेतच आहोत.

Sunday, April 29, 2012

सूक्ष्म MICRO लोडशेडिंग प्रकल्प....MAHAVITARAN



विजेची चोरी, वितरणातील हानी आणि विक्री केलेल्या वीज बिलाची सांगड घालत महा.वीज वितरण गाव शहर पातळीवर लोडशेडिंग करत वीज पुरवठा ८-१० घंटे बंद करत आहे. पण ज्या  विभागातील ग्राहक प्रामाणिक पणे वीज बिल भरतात त्यांना या  सरसकट वीज बंदीचा फटका बसून त्यांचे नुकसान होते आणि कमी वीज पुरवठ्या मुळे वसुलीवर आणखी विपरीत परिणाम होतो हे लक्षात घेवून महा.वीज वितरण     कंपनीने  वीज वितरण आणि बिल वसुलीचा तुलनात्मक अभ्यास करून लोडशेडिंग चा नवीन नमुना कार्यक्रम आखला आहे.....या नुसार गाव/शहर पातळीवर सरसकट  लोडशेडिंग चा नव्याने कार्यक्रम आखला जात आहे. या नव्या सूक्ष्म MICRO लोडशेडिंग प्रकल्पा नुसार  गावात/ शहरात आता विभाग/वार्ड या घटकाचा अभ्यास करण्यात आला आहे. या नुसार ज्या वार्ड/विभागात वीज चोरी जास्त त्या विभागात जास्त लोडशेडिंग आणि ज्या विभागात वीज चोरी कमी वसुली समाधानकारक  आहे त्या विभागाला बक्षीस म्हणून त्या विभागाची लोडशेडिंग कमी करणे असे सूत्र अवलंबण्यात येणार आहे...सूत्र तर ठरले आहे...आणि या सुत्रा नुसार परभणीतील वसमत रस्त्यावर बिल वसुली समाधानकारक असल्याने या रस्त्यावर राहणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे. या विभागात लोडशेडिंग कमी करून घेण्या करता आता या विभागातील नागरिकांनी वीज वितरण कंपनी कडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 

त्याच बरोबर आपण ज्या विभागात राहतात त्या विभागाच्या वीज चोरी आणि बिल वसुली याचा अभ्यास करून महावितरण कडे या संबंधी वारंवार पाठपुरावा करून आपल्यावर विनाकारण होणाऱ्या लोड शेडींग च्या त्रासातून मुक्ती मिळवावी. हे काम तसे अवघडच आहे. पण आपण जर सांघिक प्रयत्न केले तर यश मिळेलच.....आपणास जास्त वेळ विना-व्यत्यय वीज मिळेल ...आणि याचा महत्वाचा सामाजिक फायदा म्हणजे वीज बिल नियमित 



भरले, तर आपल्या विभागातील लोडशेडिंग कमी होईल हे इतर विभागातील  जास्त लोडशेडिंग असलेल्या  नागरिकांना समजेल आणि एक दिवस चांगल्या वसुली मुळे लोडशेडींग हा शब्द वापरावा लागणार नाही.....चला तर आता आपल्या विभागातील वसुली चा अभ्यास करा....वेळ प्रसंगी या करता माहिती अधिकार वापरा. आपली मते अवश्य मांडा 

Wednesday, April 25, 2012

Two sided sculpture Mephistopheles and Margaretta


Two sided sculpture Mephistopheles and Margaretta

सालारजंग म्यूजियम  यह देश का अकेला ऐसा संग्रहालय हैं जिसमे अधिकाँश संकलन एक ही व्यक्ति द्वारा किया गया हैं, वो हैं निजाम शासन के तीसरे और अंतिम प्रधानमंत्री यानि सालारजंग III जिनका पूरा नाम हैं - नवाब मीर युसूफ अली खान बहादुर. इस म्यूजियम मे डबल स्टेचू की एक दुहरी मूर्ति हैं. सामने से देखने पर एक खुशहाल बूढ़े व्यक्ति की मूर्ति हैं. जिसके हंसते हुए मुखड़े के साथ सिर ऊपर उठा हैं। इसके पीछे बड़ा आइना रखा हैं। आईने में पीछे की मूर्ति दिखाई देती हैं, यह मूर्ति एक भद्र महिला की हैं जो सिर थोड़ा झुकाए खडी हैं। और यही ही सभ्यता . पुरुष जो तान कर खडा है. तो दुसरी बाजू मे पुरुष जो सीना तान कर खडा है उससे उसकी पीठ थोढी झुकी हुवी है...शिल्पकार ने यहीं अपनी करागीरि का गजब का प्रदर्शन कीया. उस झुकी हुवी गर्दन पीठ मे उसने एक शालीन आदब से सर झुकायी महिला का बेजोड शिल्प बनाया. देखने वाले ये शिल्प देखते दंग रह जाते है.........और यही है पुरुष और महीला का यतार्थ चरीत्र चित्रण. मगर आज के समाज जीवन मे इसके विपरीत चित्र दीखता है. जी पुरुष को छाती तान कर रहना चाहीये वो कंधे झुकाकार चलता है ...और महीलायें छाती खुली छोडकर घुमती है.........आज वो शिल्पकार और शिल्प बनता तो वो महीला को छाती तानकर खडा हुवा बताता....और पिछले बाजू कंधे गिरा खडा आदमी का शिल्प बनाता....

Tuesday, April 24, 2012


स्त्रीत्वाचा बझार मांडून कंपनी करोडोचा फायदा ........

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12854501.cms  आजच्या बाजारीकरणाच्या जगात माल खपविण्या  साठी  स्त्री ला उपभोग्य वस्तू म्हणून सदर केले जाते...हे नवीन नाही............आता आपणाला ही आता या हीण दर्जाच्या जाहिरातीचे कांही वाटेनासे झाले.....उलट आम्ही सुधारणे चे ढोल बडवत आहोत.....कोणी विरोध करायला गेला कि तुमच्या नजरेत पाप आहे......म्हणायला हे उदारमतवादी तय्यारच असतात ......

ग्राहकांच्या बुभुक्षित नजरेला हेरून जाहिरातदारांनी या जाहिरातबाजीत अत्यंत खालची पातळी गाठत महिलांच्या गुप्तांगावरील त्वचा गोरी करणा-या क्रीमच्या  जाहिरातीचा जोरदार प्रचार आपला माल खपवण्या साठी सुरु केला......आपले सरकार आपले राजकारणी नेते  तर ग्लोबलाजेशन च्या नशेत चूर असल्या मुळे त्यांना या जाहिरातीची लाज लज्जा वाटायची गरज वाटत नाही......महिलांच्या गुप्तांगावरील त्वचा गोरी करणा-या क्रीमच्या वादग्रस्त जाहिरातीचा जोरदार निषेध करत संबंधित कंपनी आणि जाहिरातदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मंगळवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांनी राज्यसभेत केली. ही निव्वळ विकृती असल्याचे सांगत सरकार याविरुद्ध काहीही पाऊल उचलत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. खासदार टी. एन. सीमा यांनी या जाहिरातीवर त्वरित बंदी आणण्याची मागणी केली पण कॉंग्रेस सरकार ने काँग्रेसचे स्त्री लंपट खासदार व प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांची CD ज्या वेगाने  बंद केली ती जलद कार्यवाई ही जाहिरात बंद करण्या बाबत सरकारने दाखवली नाही........आता चर्चेचे, चोकशी चे गुरहाळ सुरु होईल....बंदी येण्यास दिवस जातील आणि तो पर्यंत स्त्रीत्वाचा बझार मांडून कंपनी करोडोचा फायदा कमावून बसेल जय ग्लोबलाजेशन.........

७०-८० वर्षांच्या म्हाताऱ्या.......राष्ट्रपती..........पेक्षा........

७०-८० वर्षांच्या म्हाताऱ्या राजकारणी नेत्यांची राष्ट्रपती भवनात  एषोआरामात राहण्या साठी निवड करण्या पेक्षा  स्वातंत्र्या  नंतर जन्मलेल्या आधुनिक काळाचा विचार करणाऱ्या, भारताला विकासाच्या वाटेवर नेण्याची क्षमता असणाऱ्या स्वच्छ चारित्र्यवान तरुण नेत्याची या पदा साठी निवड करावी....जो वेळ प्रसंगी आपल्या अधिकाराचा देश हिता साठी वापर करण्यास समर्थ असेल......केवळ शोभेची बाहुला बाहुली काय कामाची....   कलाम शास्त्रज्ञ म्हणून थोर आहेत पण राजकारण आणि शास्त्र यात फरक आहे.या आधी त्यांनी हे पद सांभाळलेले आहे..त्यांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन केले तर फारसे कांही हाती लागत नाही.......आणि आज ही मुलायामसिग त्यांच्या नावाचा जो आग्रह धरत आहे त्या मागे मुस्लीम मतांचे राजकारण हेच धोरण कारणीभूत आहे..त्या पलीकडे त्याचे फारसे महत्व खुद मुलायम याना ही नाही........

ब्रेन ड्रेन

उशीरा का होईना सरकार ने पांढऱ्या कॉलर च्या देशाच्या संपत्तीवरील राजरोस चालणाऱ्या दरवडेखोरीला आळा घातला हे बरे झाले..... भारतात सर्व शिक्षण सवलती घ्यावयाच्या , स्वस्तात शिक्षण घ्यावयाचे आणि एकदा डिग्री हातात पडली की देशाच्या व्यवस्थेच्या उणीवा दाखवत परदेशाचे गुणगान करत उच्च शिक्षणा करता परदेशी जायचे आणि पैश्याच्या लोभा खातर मग भारतात परत यायचेच नाही. असा हा फंडा गेली ६५ वर्षे भारतात राबवला जात होता...पण आता असला दुपट्टीपणा चालणार नाही .सरकारने आता या अनिष्ट गोष्टीना आळा घातला हे बरे झाले....http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12844638.cms
उच्च वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाऊन तिथेच प्रॅक्टिस सुरू करणा-या डॉक्टरांची संख्या वाढत असताना, या 'ब्रेन ड्रेन'ला रोखण्यासाठी केंद्र सरकारने सोमवारी नवा निर्णय जाहीर केला. त्यानुसार, अमेरिकेत जाण्यापूर्वी आता डॉक्टर्सना स्वदेशपरतीची हमी देणारा करार करावा लागणार असून अभ्यासक्रम संपवूनही न परतणाऱ्या डॉक्टरला अमेरिकेत प्रॅक्टिस करण्यापासून रोखण्याचा अधिकार सरकारला असणार आहे.त्याच बरोबर खेडोपाडी माफक दारात ओषध उपचार करण्या करता डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत म्हणून इतर डिप्लोमा कोर्स प्रमाणे मेडीकॅल डिप्लोमा कोर्स सुरु करण्याची सर्व तय्यारी पूर्ण केली.. पण यास शहरतील प्रस्थापित कट प्रक्टिस डॉक्टर लोबी कडून जोरदार विरोध होत आहे......या मुळे खेड्यातून या लोबी कडे येणारे रोगी कमी होतील हे भय यांना सतावत आहे.

Sunday, April 22, 2012

पत्र नव्हे मित्र !!!.......कालाय तस्मे नम:

पत्र नव्हे मित्र !!! अशी शेखी मिरवणाऱ्या महाराष्ट्र टाईम्स चा दर्जा एखाद्या थ्री एक्स पिवळ्या वर्तमान पत्राचा झाला हे महेंद्र कुलकर्णी काकांनी मटाबाबा डॉट कॉम Posted on ऑगस्ट 4, 2011 काय वाटेल ते या लोकप्रिय ब्लॉग्ज वर दीली होतीच http://kayvatelte.com/2011/08/04/%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE/. त्यात त्यांनी म्हंटलेच होते.......मटा ची ऑन लाइन एडीशन म्हणजे एखाद्या पोर्नोग्राफी साईटला लाजवेल अशी आहे. काय छापावं- आणि काय नाही ,नग्नता किती प्रमाणात दाखवावी,याचा विधिनिषेध न बाळगता, चीप, व्हल्गर, आणि सेक्स ने परिपूर्ण असलेले काही फोटो तरी पेज हिट्स वाढवायला छापायचे – असे प्रकार मटा ने सुरु केलेले आहेत. फोटोमधे काय दाखवले आहे हे सुद्धा इथे लिहीण्याची मला लाज वाटते, त्या साठी ही लिंक पहा. असे फोटो छापण्यासाठी निर्लज्ज पणा लागतो . इतका निर्लज्ज पणा अंगी मुरवायला पण खरंच गेंड्याची कातडी लागते, असे ही काकांनी म्हणले होते........यावर १०० हून जास्त वाचकांच्या प्रतिक्रया आल्या होत्या आणि महेद्रजींचे म्हणणे खरे आहे असे स्पष्ट नमूद केले होते.....याचा प्रत्यय आजकाल म टा नेट वर उघडल्या बरोबर येत आहे. access to is blocked for your protection असे म्हणत इंटर नेट सेक्युरिटी ही साईट ब्लॉक करत आहे......सोबत याचे चित्र दीले आहे.......पत्र नव्हे मित्र या पासून पत्र नव्हे पोर्न वाटाड्या अशी म टा आज अधोगती झाली आहे.....एव्हढेच नव्हे तर एकेकाळी शासनावर नैत्तिक अंकुश ठेवणारे हे वर्तमान पत्र आज शासनाचे बटीक झाले आहे. कालाय तस्मे नम:

Wednesday, April 18, 2012

एका नवहिंदू धर्माची जरूरी आहे.......

येसुदास याना मंदिर प्रवेश नाकारला..........स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे झाली.......सामाजिक एकात्मतेच्या गप्पांचे ढोल रात्नदिवस बडवताना राज्यकर्ते थकत नाही......पण खरी परिस्थिती कांही लपत नाही ....... आणि....आज ही मंदिर प्रवेश नाकारण्याच्या घटना राजरोस घडत असतात .......कांही मंदिरात देवाच्या दर्शनाचा जाहीर लीलाव लावून गरीबाना तासनतास रांगे मध्ये रखडवले जाते........गलीच्छ मंदिरात जागोजागी लुबाडले जाते......तरी ही हिंदू संस्कृती महान चे ढोल बडवणारे कांही कमी....
Navnath Pawar
जो देव माणसाला ओळखत नाही, त्या देवाला मीही ओळखत नाही. ताठ मानेने ठोकर मारून निघा त्या देवाला. खरा देव ... ज्ञानेश्वरीत वर्णिलेला आहे ...>>उत्तमाते धरिजे, अधम तरी अव्हेरिजे,. हे काहीच नेणीजे, वसुधा जेवी. ...गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊनी मारू,. ऐसे नेणेची का करू, तोय जैसे>> <<का घराचीया उजियेड करावा, पारखिया अंधार धरावा .. हा भेद नच ठावा, दीपा जैसा >> असा देव फक्त निसर्ग नियमात सापडतो... बाकी देव आणि देवळे ही दलालांची मंदिरे आहेत.
Vijay Sabnis एका नवहिंदू धर्माची जरूरी आहे, ज्यात मूळ तत्त्वज्ञान कायम ठेऊन, इतर धर्मातील काही चांगल्या गोष्टी घेऊन, खरा बहुजन समाजाभिमुख झालेला धर्म असेल.

Tuesday, April 17, 2012

समोसे के साथ हमेशा लाल चटनी ही खाना ....

हा नवा च पक्षीय जातिवाद इंडियात निर्माण होत आहे......याच हिशोबाने कॉंग्रेस ने राष्ट्रवादी नेत्यान च्या घरात बेटी व्यवहार करू नये.......... भाजपने एक तर शिवसेने बरोबर नाही तर मनसेच्या घरातच विवाह संबंध ठेवावेत.......शिवसेनेच्या नेत्यांनी मनसे च्या घरात अजिबात विवाह संबंध ठेवू नये.....असे फर्मानच मातोश्री वरून निघाले.........मनसे ने तर विवाह संबंध फक्त मनसेच्या नेत्यांच्याच घरात करावेत........पक्ष बाह्य संबंध अजिबात सहन केले जाणार नाही असा दम भरला......... राष्ट्रवादीने मात्र पक्षीय हीत लक्षात घेवून कोणी ही कोणत्या ही पक्षात विवाह संबंध ठेवण्यास श्रेष्ठी ची हरकत नसल्याचे जाहीर केले......अपक्षा बरोबरीच्या विवाह संबंधाना मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने पाठींबा जाहीर केला..........त्याच बरोबर प्रत्येक राज्यातील विविध पक्षानी या विवाह संबंधा बाबत आपापले धोरण लवकरच जाहीर केले जाईल असे जाहीर केले आहे........http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-mamata-banerjeee-asks-trinmool-members-not-to-marry-cpm-activists-3125623.html

जाता जाता विशेष सूचना मुलीना :-    हद हो गयी .. आज निर्मल बाबा आईबीऍन ७ पर एक औरत जो माँ नही बन पाने के कारण परेशान थी उसको उपाय बताया कि समोसे के साथ कौन सी चटनी खाती हो ? उसने कहा कि लाल वाली ..........
निर्मल बाबा बोला कि इसीलिए माँ नही बन पा रही हो .. जाओ समोसे के साथ हरी चटनी खाना माँ बन जाओगी ..हा हा हा !
कुंवारी लड़कियों सावधान !!!! समोसे के साथ हमेशा लाल चटनी ही खाना .....अगर आप गलती से हरी चटनी खायेगी तो बिना शादी की माँ बन जायेगी.... और..... आपको आपके माँ बाप को लेने के देने पड़ जायेंगे 


Sunday, April 15, 2012

उमेदवार:- हुश्श !!!! मतदान संपले......मतदार:- चला संपले...


उमेदवार:- हुश्श !!!! मतदान संपले .......संपली एकदाची कटकट.........चेहऱ्यावर खोटेखोटे हासू आणत राहणे, नाही त्या लोकांच्या पाया पडणे........आश्वासन देणे नुसता वैताग आला होता..... एका एका मतासाठी लोक सुद्धा किती भाव खायला लागलेत?.........५००० रुपये एका मता साठी.....काय खाक सेवा करणार निवडून आल्यावर........ काय कराव दुसरा इलाज नव्हता......५ वर्षाच्या दुकानदारी साठी हा सगळा पैशाचा तमाशा करणे भागच होते .... एव्हढे करून निवडून आलो तर ठीक नाही तर खर्च केलेले २०-२५ लाख पाण्यात.....आणि कार्यकर्त्ये तर विचारूच नका....गेले महिना भर कोंबडी मटन पव्वा याच्या शिवाय कश्याला ही हात लावत नव्हते.....त्या हॉटेलवाल्याचच बिलच १० लाख झाले......अडव्हांस दील्या शिवाय त्याने कोणाला खाऊ घातल नाही.... निवडून आल्यावर पहाव लागेल त्याच्या धंद्याच्या परवान्या कडे.......
मतदार:- चला संपले...... नको त्या लोकांच्या आपल्या  घरी चक्करा मारणे... कोण कोठला माणूस उठतो....आणि निवडणुकीस उभा राहतो........घरी येऊन वय न पाहता कोणाच्याही   पाया पडतो.... आणि आमच्या विकासा साठी आमची मते मागतो.... गेल्या दिवसा पर्यंत हा कोठेच दिसत नव्हता आता एकदम याला जनतेचा कळवळा आलाय.... तो दुसरा तर चक्क पक्ष बदलून कोणत्याच पक्षाने तिकीट न दील्याने एका रात्रीत अपक्ष म्हणून उभा राहीला..आणि सर्व पक्ष भांडवलदार श्रीमंताचे आहेत.... मीच फक्त गरीबांचा वाली तारणहारा आहे म्हणू लागला...... एका ने तर गेल्या ५ वर्षात खालेल्या पैश्यातून वार्डात स्वतः च्या खर्चाने रस्ता नाली बांधकाम सरकारी परवानगी शिवायचं सुरु केले........ एकाने विमानतळ आणण्याचे गाजर दाखवले तर दुसऱ्याने चक्क सरकारी तिजोरच आमच्या साठी खुल्ली करण्याचे जाहीर केले, जशी कांही ही तिजोरी यांच्या बापजाद्या ची आहे................
पण आता आम्ही ही शहाणे झालो आहोत....यांच्या भूलाथापाना आता आम्ही बळी पडायचं नाही हे पक्क ठरवलं......इतके दीवस लोकशाही म्हणून प्रामाणिकपणे जात पात धर्म पैसा न पाहता मतदान केल........ तर ..... निवडून आल्यावर हे तंगड्या वर करणार.........पैश्याच्या जोरावर सत्तेच्या घोडेबाजारात आपली कींमत वसूल करत टोप्या बदलणार........विविध पदा साठी स्वतःची खरेदी विक्री करणार....सामुदायिकपणे सहलीला जाणार...... काल पर्यंत विडीकाडी ला महाग असणारे हे नेते आज VAT69 , माणिकचंद, मुर्ग मस्सलम बिर्याणी शिवाय तोंडात कांही घालतच नाही..... कामधंदा नाही इन्कम टक्स नाही तरी ही यांची मालमत्ता मारुतीच्या शेपटी प्रमाणे वाढत जाते...... अनेक भूखंड यांच्या नावावर होतात...... बाथरूम मध्ये सुद्धा चार चाकी शिवाय जात नाही..... शासनाच्या पैश्याच्या योजनेत टक्केवारीने सर्वपक्षीय नगर-सेवक हिस्सा खाणार ....... रस्त्यावर हातगाड्या उभ्या करून पोट भरणाऱ्या कडून हप्ता खाणार......हप्ता मिळाला नाही तर सु शोभिकारणाच्या नावा खाली जनतेस त्रास होईल अश्या योजना आखणार ........मग आम्हीच का प्रामाणिकपणे मतदान करावे......चांगले खणखण वाजवून पैसे घेतले.......जातीच्या धर्माच्या माणसा कडून ही घेतले.......त्याला ही सोडले नाही..........नाही तरी निवडूण आल्यावर तो मातीच खाणार .........जय लोकशाही जय हो .....

Sunday, April 8, 2012

.तो.......देशवासियों हो जाइये तैयार एक....आंतकवादी हमला झेलने को......


जब भी पाकीस्तानी नेता भारत की यात्रा करता है तब उसके कुछ ही दिनों के बाद भारत पर पाक अंतकवाद का हमला हो जाता है.......ये इतिहास का सत्य है .....तो....... देशवासियों हो जाइये तैयार  एक और खतरनाक आंतकवादी दहशदवादी जानलेवा हमला झेलने को.......इस हमले में आम आदमी ही मौत का शिकार होता है....नेता पर हमला न करने का करार इनमे हुवा है....  इस हमले के बाद फिर से मोमबतीयां जलेगी........इण्डिया गेट पर शबाना महेश भट्ट और कंपनी काली रिबिन बांधकर इंडिया गेट गेटवे ऑफ़ इंडिया पर मोर्चा निकालेगी.......सरकार पाक सरकार के पास  कड़े से  कड़े शब्दों में इस हमले की निंदा करेगा .......इस हमले के सबूत देने मनमोहन अमेरिकी यात्रा पर जायेंगे.......और आम आदमी रोजमरा की जिंदगी जीने के लिये सुबह ५'३० की लोकल पर लटकते हुवे काम पर जायेगा.......उसके पास दूसरा कोई विकल्प ही नहीं बचता.......और मिडिया......जोरजोर से चिल्लाएगा देखो आम आदमी हरा नहीं.....उसने हमले को कड़ा जबाब दिया.........इसे ही कहते है जनता की जीत जनता का  स्पिरिट ........हम हार नहीं........और फीर एक दिन सब शांत हो जायेगा........और .....पाक ऐक  नए हमल्ले की साजिश में..... एक और नए नेता को अमन और चेन की दुआ मांगते हुवे  भारत भेजेगा और...... हम फीर उसका छप्पन भोग की दावत देकर स्वागत करेंगे........जय हो जय हो 

Tuesday, April 3, 2012

नगर सेवक म्हणजे न = नळ , ग = गटार , र = रस्ता या मुलभूत सेवांची कामे करणारा

निवडणूक महा नगर पालिका ......मी मत विकत घेणार नाही.... जाती धर्म यांचा आधार घेत निवडणूक लढवणार नाही......मी समाज मंदिर, प्रार्थना स्थळे यांना देणगी देऊन मताची भिक मागणार नाही.......निवडूण आल्यावर नाली साफ ठेवण्याचे, पाणी पुरवठा नियमित करण्याचे आणि खड्डे विरहित रस्ते बांधण्याचे काम इमाने इतबारे करेन.....भ्रष्ट्र गुत्तेदारशी हातमिळवणी करणार नाही.... नगरपालिकेच्या कामाच्या रिंग मध्ये सामील होणार नाही.....स्वतः च्या स्वार्था साठी सत्तेच्या घोडेबाजारात सामील होणार नाही..... पक्ष बदल करणार नाही.......जनतेची वैयक्तिक कामे करणार नाही तर..... फक्त सामाजिक हिताचीच कामे करेन याची मी हमी देतो......अशी स्पष्ट भूमिका कोणताही निवडणुकीस उभा टाकलेला उमेदवार का घेत नाही...... आणि जनता सुद्धा अशी मागणी का करत नाही???.......

हे महाराजांचे दुर्देव नसून आमचे दुर्देव आहे.....

इतिहासात आज दिनांक..
३ एप्रिल..........
 ....... जय शिवाजी जय भवानी म्हणत शिवाजी महारांजाचा वाढदिवस दोनदोनदा साजरा करणाऱ्या मराठी नेत्यांना , रस्त्यावर डीजे लाऊन मदिराक्षीच्या तालावर अचकट विचकट नाचणाऱ्याना शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या नेत्यांना , त्यांचा चाहत्यांना फेसबुक वरील गर्वच नाही तर माज आहे म्हणनारयाना आज महाराजांना श्रद्धांजली वाहण्या साठी,  एक श्रद्धांजली POST लिहिण्याची गरज वाटली नाही........वेळ नाही ....... हे महाराजांचे दुर्देव नसून आमचे दुर्देव आहे.
alt१६८० छत्रपती शिवाजीमहाराजांचे रायगड मुक्कामी निर्वाण झाले. अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात छत्रपतींनी इतिहास बदलून टाकला. भारताच्या इतिहासात लोकहितकारी स्वराज्याचे दूरदर्शी संस्थापक म्हणून ते ज्ञात आहेत. आदिलशाही, मुघलशाही, पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज यांच्याशी झगडून महाराजांनी स्वराज्य स्थापले. हे स्वराज्य लोकहितकारी व धर्मसहिष्णू धोरण राबविणारे राज्य होते. उत्कृष्ट लष्करी यंत्रणा, किल्ले राखणे, आरमार उभारणे या बाबतीत महाराज अग्रेसर होते. महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब स्वत:ची राजधानी सोडून २७ वर्षे दक्षिणेत आला, परंतु तो स्वराज्य बुडवू शकला नाही.

Monday, April 2, 2012

महिला राजच्या राजकारणाची ही काळी बाजू...


 

महिला राजच्या राजकारणाची ही काळी बाजू... महिलाराज जर प्रस्थापित नेत्यांच्या घरातील स्त्रियांना मिळाले आणि त्या महिला ताटाखालचे मांजर म्हणून राहिल्या तर आम्हाला महिला राज मान्य आहे..... आणि जर निवडून आलेल्या महीला स्त्रिया आमचे न ऐकता स्वयं निर्णय घेऊन जनतेचे भले करून आमच्या हितसंबंधास बाधा आणत असतील तर अश्या स्त्रियांची आम्ही अडवणूक करू एव्हढी माजोरी प्रशासनात आणि जुन्या प्रस्थापित नेत्या मध्ये आलेली आहे........ PAID मिडिया सुद्धा प्रस्थापित राजकारण्यांच्याच घराण्यातील स्त्रियांना जास्त प्रसिद्धी देतो हे कटू सत्य आहे.
गावातील विकास कामात स्थानिक प्रशासन आड येत आहे. त्याची तक्रार राजावत यांनी पंचायतराज मंत्र्यांनाही केली. त्यांच्याकडून केवळ आश्वासनच मिळाले, कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यानंतर त्यांच्याकडे कामाला असलेल्या व्यक्तिला मारहाण करण्यात आली. त्याची पोलिसात तक्रार देत त्यांनी संरक्षणाची मागणी केली. तिला पोलिसांनी नकार दिला आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणात राजकीय दबाव असण्याचीही शक्यता राजावत यांनी व्यक केली आहे. मात्र अशाही परिस्थितीत गावक-यांसाठी लढत राहाणार असल्याचा निश्चय त्यांनी केला आहे.mba sarpanch bitter  http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-mba-sarpanch-bitter-disillusioned-