Translate

Wednesday, February 27, 2013

चल सन्यासी मंदिर में......

  चल सन्यासी मंदिर में, तेरा चिमटा मेरी चूड़ियाँ दोनों साथ बजाएंगे
 साथ\-साथ खनकाएंगे क्यूँ हम जायें मंदिर में, 
 पाप है तेरे अंदर में लेकर माला कंठ दुशाला राम नाम गुन गायेंगे
     
    धर्म छोड़कर, ध्यान छोड़कर पाप नहीं अपनाएंगे प्रेम है 
      पूजा प्रेम है पूजन प्रेम जगत है प्रेम ही जीवन
   मत कर तू अपमान प्रेम का प्रेम है नाम प्रभू का बड़ा ही पावन
      प्रेम\-प्रेम कर के मुझको कर देगी अब तू पागल 
      मेरा धीरज डोल रहा है, लाज रखे गंगा जल
   चल सन्यासी मंदिर में, तेरी माला, मेरा गजरा गंगा साथ नहायेंगे

दारू प्या .........

 स्वातंत्र्या नंतर गेल्या ६५ वर्षात आपले लोकशाही शासन जनतेला पिण्या साठी साधे पाणी पुरवु  शकले नाही ना दोन वेळेचे अन्न ...मात्र फ्रांस च्या मगरूर राणी प्रमाणे पाव ब्रेड मिळत नसेल तर केक खा या चाली वर  जनतेला पाणी मिळत नसेल तर............
मंत्र्यांच्या दारूच्या कारखान्यात अन्न धान्या पासून तयार झालेली दारू प्या ......... आणि पोटाची आग विसरा असा सल्ला हे हायवे वर जागोजागी लावलेले दारू विक्री दुकानाचे फलक देत आहेत. असेच वाटते. जय हो जय हो....मेरा इंडिया महान!!!

वो पेड़ों पे चढ जाती है.....


वो लड्डू पेड़े खाती है वो पेड़ों पे चढ जाती है वो लड्डू पेड़े खाती है वो पेड़ों पे चढ जाती है
ये मच्छर बीन बजाते हैं वो अपना राग सुनाती है वो ठुम्मक ठुम्मक नाचे जब मैं दिल का बजाऊँ मैं दिल का बजाऊँ इकतारा मेरी भैंस को डंडा मेरी भैंस को डंडा क्यूं मारा
 अरे घर का ये इक स्टेशन है और झंडी प्यारी प्यारी है अरे घर का ये इक स्टेशन है और झंडी प्यारी प्यारी है सब हम तो रेल के डिब्बे हैं  वो अपनी इंजन गाड़ी है वो गुस्सा जब भी करती है तो बन जाती है  तो बन जाती है अंगारा

Monday, February 25, 2013

महीलांच्या व्यवसायात ही पुरुषाची मक्तेदारी !!!!!.............


महीलांच्या व्यवसायात ही पुरुषाची मक्तेदारी !!!!!.............
महीला सक्षमीकरण , पुरुषाच्या बरोबरीचे हक्क, दर्जा , बळकटीकरण या सर्व गोष्टी फक्त पक्षाच्या व्यासपिठा वर बोलून दोन चार महिलांच्या इमेज बांधण्याचा धंदा सध्या सर्व राजकीय पक्षात जोरात चालू आहे......गावोगाव मेळावे घेतल्या जात आहेत......प्रत्यक्षात महीलांचे अधिकार क्षेत्र असलेल्या
मेकअप , सौंदर्य प्रसाधने या क्षेत्रात सुद्धा महिलांना काम करू दीले जात नाही हे दुर्देवः ......

आज ही देशातील संपूर्ण चित्रपट इंडस्ट्रीत फक्त पुरुष मेकअपमनलाच का मान्यता देण्यात आली आहे? हे काम महिला आर्टिस्ट करू शकत नाहीत का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे. मुंबई व दक्षिण भारतातील सिनेइंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम न मिळाल्याने बेकार राहावे लागलेल्या चारू खन्ना यांच्या वतीने राष्‍ट्रीय महिला आयोग गेल्या साडेचार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात खटला लढत आहे. ... हे सर्व वाचल्यावर आपण किती भंपकपणा करतो हे लक्षात येत. अश्या छोट्या गोष्टी साठी महिलेला झगडावे लागते म्हणून न्यायालयाने फक्त नोटीस न बजावता याना सरळ दंड सजा सुनवावी आणि महिलाना न्याय द्यावा.

Friday, February 15, 2013

MARKETING

                                              AAVO CHORO LUTO SARAA!!
                        AADHA TUMHARA AADHA HAMAARA!!!!
Wednesday, February 13, 2013

महाराष्ट्र शासन दुष्काळी पर्यटन........

Prabodh Apegaonkar यांची दुष्काळी पर्यटन या कल्पने ची महाराष्ट्र शासनाने त्वरीत अंमलबजावणी करण्याची योजना आखली असून या पर्यटना मुळे शहरी भागातील जनतेला, विद्यार्थ्यांना दुष्काळ म्हणजे काय ?? पाणी टंचाई , चारा टंचाई, अन्नधान्याची टंचाई याची माहीती होईल, आणि या पर्यटकां मुळे दुष्काळग्रस्त खेड्यातील उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील असा आत्मविश्वास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी , उप मुख्यमंत्र्यांनी आणि पर्यटन मंत्र्यांनी पत्रकार परीषदेत जाहीर केला . दुष्काळाच्या संकटा वर दुष्काळी पर्यटनाच्या निमित्ताने खेड्या पाड्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देऊन या निसर्ग निर्मित संकटावर मात करण्याची जिद्द शेतकऱ्यांनी बाळगावी असे आवाहन या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना केले.
या नुसार कृती आराखडा केला असून प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना त्यांच्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त दुष्काळग्रस्त गावांची यादी पाठवण्याची आज्ञा करण्यात आली....... या निमित्ताने आपलेच गाव जास्तीत जास्त दुष्काळग्रस्त आहे याची यादीत नोंद करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी नेत्यांनी नेहमी प्रमाणे बाजी मारली असून मराठवाडा आणि विदर्भावर नेहमी प्रमाणे हात चोळत बसण्याची वेळ आली आहे...... अधिक माहीती साठी पाहत रहा महाराष्ट्रीय ओसाडगाव च्या दुष्काळी बातम्या..........

Tuesday, February 12, 2013

महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारण कामा च्या प्रसिद्धी साठी ब्रांड एंबेसेडर नेमण्याचे ठरविले

महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारण कामा च्या प्रसिद्धी साठी ब्रांड एंबेसेडर नेमण्याचे ठरविले
गेल्या दहा हजार वर्षात पडला नाही असा दुष्काळ महाराष्ट्र देशी पडला......पाण्याची टंचाई, चाऱ्याची टंचाई ....सिंचन , वीज लोड शेडींग या प्रश्नांना, समस्याना सामोरे जात असतानाच विरोधकांच्या स्वकीयांच्या टीकेला, भडीमाराला तोंड देतादेता सरकार ची दमछाक झाली ..... सरकारने दुष्काळ  निवारण्या साठी केलेल्या कामाची माहीती जगाला कळावी आणि विरोधकांचे तोंड बंद करावे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळ निवारण्या करता नेमलेल्या उच्च समितीने महाराष्ट्र सरकारला एक दुष्काळ निवारण ब्रांड एंबेसेडर ( राजदूत ) नेमण्याची अफलातून कल्पना मांडली, आणि ती सरकारने लगेच स्वीकारली. त्या नुसार सरकारने दुष्काळ निवारण ब्रांड एंबेसेडर नेमण्या करता जाहिरात देण्यात आली.
जाहीरात !!             जाहीरात !!       जाहीरात !! 
महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारण कामा च्या प्रसिद्धी साठी ब्रांड एंबेसेडर नेमण्याचे ठरविले असून त्या संबंधी योग्य व्यक्तीची नेमणूक करण्या करता अर्ज मागविण्यात येत तरी इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावे. अटी शर्ती मानधन कामाचे स्वरूप इत्यादीचा तपशील पुढील प्रमाणे ..

१) उमेदवार हा जन्माने महाराष्ट्राचाच रहावाशी असावा . त्याला मी मराठी असल्याचा गर्वच नाही तर माज असावा. बाहेरच्या राज्यात जन्मलेल्या पण महाराष्ट्रात राहून प्रसिद्धी पावलेल्या उमेदवारांनचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

२)त्याला मराठी, विशेषत इंग्रजी हिंदी चांगल्या प्रकारे भावनात्मक आवाजात बोलता आली पाहिजे . कारण या जाहिराती राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावर करावयाच्या आहेत.हे लक्षात घ्यावे.

३) अर्जदार हा थ्री पेज वर तसेच मिडीया वर चमकणारा असावा.

४) अर्जदाराला प्रत्यक्ष दुष्काळाचा अनुभवाची गरज नाही......पण त्याला फक्त रेडी,अक्शन, कट फ्लूड लाईट च्या प्रखर प्रकाशात काम करण्याचा अनुभव असावा..... त्याला फक्त वातानुकुल A /C स्टुडीओ मध्ये दिग्दर्शकाच्या सांगण्या प्रमाणे फिल्मी लेखकाने लिहून दिलेले डॉयलॉग्ज कॅमेरया समोर भावनात्मक रीत्या बोलावे लागतील. हा दुष्काळ शासन निर्मित नाही पण शासन या संकटाचा सामना चांगल्या प्रकारे करत आहे हे जनतेला जाहीराती द्वारे पटवून द्यावे लागेल .

५) निवडलेल्या ब्रांड एंबेसेडर ला मानधन पाच कोटी रुपये देण्यात येईल तसेच रोज कामाच्या दीवशी त्यास अकरा हजार रुपये टी ए डी ए , मांसाहारी, स्वीट्स भोजन आणि पेयपान सरकारी खर्चाने दीले जाईल .

६) कामाचा कालावधी जून-जुलै २०१३ पर्यंत पाऊस पडे पर्यंत राहील...कोणत्या ही परिस्थितीत त्यास काम सोडून जाता येणार नाही किंवा दुसऱ्या राज्याच्या दुष्काळाची/कामाची जाहीरात करता येणार नाही....किंवा शुटींग च्या दिवशी गैरहजर राहता येणार नाही.

७) राज्य मंत्रीमंडळाच्या सहा मंत्र्यांची निवड समिती ज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे प्रत्येकी तीन तीन मंत्री राहतील.

८) या नेमणुकीसाठी उमेदवारांनी कोणत्या हि प्रकारचे लॉबिंग, शिफारशी, वशिलेबाजी, रिश्वत देणे हे प्रकार करू नयेत . केल्यास त्यास स्पर्धेतून बाद करण्यात येईल.

९) मंत्रिमंडळाच्या समितीने नेमलेल्या उमेदवाराची निवड अंतिम राहील त्या विरुद्ध कोणास ही न्यायालयात जाता येणार नाही.

महाराष्ट्र शासन मुख्य सचिवांच्या सहीनिशी

Saturday, February 9, 2013

अऱ अऱ आर. आर. आबा आता तरी थांबा ना .....

अऱ अऱ  आर आर आबा आता तरी थांबा ना .....का आपल्याच सहकारी मंत्र्यांना असा  त्रास देत आहात???? ....काल म्हणे आपण आपला एक महिन्याचा रुपये ५७ हजार  पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री  साह्यता निधीला दीला .......आबा आपल्याला गरीबांचा कळवळा आहे याचा अर्थ बाकी मंत्र्यांना गरीबांचा कळवळा नाही असा होत नाही...... का उगीच त्यांना अडचणीत आणतात??

दुष्काळग्रस्ता  साठी हे तुमचे सहकारी मंत्री नेहमी पेक्षा कीती जास्त काम सध्या रात्रीचा दीवस करून करत आहेत...याची तुम्हाला कांही कल्पना आहे का?? 

दुष्काळी भागातील जनतेला पिण्या साठी पाण्याचे टँकर्स  पुरवणे, या टँकर्सवाल्या लॉबी  ची त्यांच्या मर्जी प्रमाणे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे , यांची बिले लवकरात लवकर कशी निघतील याची जातीने काळजी घेणे....... त्याना नियंत्रित दराने डीझेल उपलब्ध करून देणे....  त्याच बरोबर दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी चारा डेपो छावण्या उभ्या करणे,  चारा वाहतुकीची ट्रक ने  व्यवस्था करणे, आपल्याच भागात कसा जास्तीतजास्त दुष्काळ आहे याचा मिडीयाला हाताशी धरून प्रचार करत  आपल्या मतदार संघात जास्तीत दुष्काळग्रस्त निधी मंजूर करून घेणे..............वेळ प्रसंगी इतर भागातील दुष्काळ निधी आपल्या मर्जीतल्या भागात पळवून आणणे...... ही सर्व जनसेवे ची कामे करत असतानाच आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या पोटापाण्याची सुद्धा नजरेत न येता  व्यवस्था  करणे… इत्यादी जास्तीची कामे सध्या मंत्र्याना , आमदार , खासदाराना करावी लागत आहेत......

प्राचीन काळी भगीरथाने स्वर्गातून  गंगा पृथ्वी वर आणली असे म्हणतात....... स्वर्गा मधुन   पृथ्वी वर गंगा आणणे फार सोप्पे काम होते...... आजच्या सारखे अडथळे नव्हते...... गंगा स्वर्गातून सरळ पृथ्वी वर आली........आज या आधुनिक लोकशाही भगीरथाना पाणी वेगवेगळ्या भागात वळते करण्यासाठी जे अडथळे पार पडावे लागतात, सिंचन घोटाळे (माफ करा प्रकल्प… सध्या सिंचन टाईप केले की  आपोआप घोटाळे हा शब्द येतो त्याला नाईलाज आहे.)...करावे लागतात ते त्यांनाच माहित......आता तर भारतीय रेल्वे च्या वाघिणी ने पाणी पुरवठा करण्याच्या योजना आखण्यात येत आहे. या वाघिणी मिळविण्या करता काय काय अडचणी येतात हे केळी , कांदा उत्पादक शेतकर्याना चांगल्याच माहीत आहे .. या वाघिणी येई पर्यंत कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो आणि केळीच्या बागा शेतातच सुकून जातात..  त्या मुळे रेल्वे ने पाणी दुष्काळी भागात पुरविणार म्हटल्यावर त्यांनी जिवंत राहण्याची आशाच सोडली ...  असे अडथळे त्या भगीरथाला आले असते तर त्याने गंगा पृथ्वी वर आणण्याचा नादच सोडला असता.... असो .
 
खरे तर या जनसेवकाना  या दुष्काळाच्या ज्यादा, अतिरिक्त कामा बद्दल ज्यादा पगार, ओव्हर टाईम , विशेष भत्ता देण्याची गरज असताना, आपण मंत्रिमंडळा च्या बैठकीत  या राज्यकर्त्यांनाच त्यांनी आपआपला दोन महिन्याच्या  पगार दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याची मागणी केली… ये बहोत नाइंसाफी झाली आहे.......तरी बर आपल्या सहकारी मंत्र्यांनी आभाळच फाटलं तर आपण कोठे कोठे ठिगळ जोडणार अस म्हणत वेळीच विरोध केला........ आणि पगार न देण्याचा निर्णय घेतला..... पण आपण गप्प न बसता स्वतःचा एकट्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला लगेच ड्राफ्ट काढून दिला. माननीय दादा म्हणतात ते खर आहे......आबांना प्रसिद्धीचे तंत्र चांगलेच अवगत आहे आणि आबा त्याचा उपयोग आपल्या प्रसिद्धी साठी चांगला करून घेतात .....पण आबा आपल्या प्रसिद्धी बरोबर आपल्या बाकीच्या सहकारी मंत्र्याची का अडचण करतात हे बर नव्ह ...
म्हणून  अऱ अऱ  आर आर आबा आता तरी थांबा ना असा अख्ख मंत्रिमंडळ म्हणत आहे. अश्या घटनान मुळेच  या जगण्यावर शतदा प्रेम करावे
.....

Thursday, February 7, 2013

माझ्या देशाचे सर्व नेते सुद्धा महान आहेत......
रोज सकाळी उठल्या बरोबर FB वर शासन आणि राजकीय नेत्यांच्या विरोधी टिपण्णी करून सरकारचा नौकारशाही चा राग ओढून घेण्या पेक्षा FB वर आज मी देशच्या महानतेच्या बाबी मित्राना शेअर करणार आहे .
माझा देश महानतम महान आहे. माझ्या देशाचे सर्व नेते सुद्धा महान आहेत.

ते सर्व एक पत्नी , सत्यवचनी आहेत. सर्व भारतीय माझे बांधव आहे यावर त्यांची निष्ठा असल्या मुळे परस्त्री,बाटली दारू या पासून ते चार हात दूरच राहतात,

बेईमानी, भ्रष्ट्राचार हे शब्दच त्यांच्या शब्दकोषात नाही , या मुळे ते भ्रष्ट्र बेईमान असणे शक्यच नाही. हे सर्व नेते पापभीरू असल्या मुळे ते कोणत्या ही प्रकारचे पाप करणे शक्यच नाही. काया वाच्या मनाने ते स्वच्छ आहेत.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रजातंत्र असलेल्या जनतेचे ते निवडून आलेले प्रतिनिधी असल्या मुळे दिनरात ते जनतेच्या सेवेत मग्न असतात.


बिना सहकार नही उद्धार या वर या नेत्यांची अविचल निष्टा असल्यामुळे निवडणुकीत बहुमत मिळालेले नसताना ही केवळ जनतेच्या सेवे साठी, ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्या विरोधकांशी आघाडी करून सरकार स्थापन करतात. आणि जनतेची सेवा करतात. अश्या आघाड्या करताना केवळ जनसेवे साठी मनस्ताप होत असताना सुद्धा आपल्या तत्वाना ते सोडचिठी देतात. या वरून त्यांची महानता लक्षात येते.

लोकशाही राजा हा उपभोगशून्य राज्यकर्ता असतो या वचना प्रमाणे ते विविध सहकारी सोसायट्या संस्था , सहकारी बँका , सहकारी साखर कारखाने, सुत गिरण्या यांच्या संचालक मंडळावर काम करतात..... देश्यातील वाढणारया तरुणांच्या बेकारी च्या चिंते पोटी या सहकारात त्यांनी आपल्या कार्यकर्त्याना ही कामे दिली. या वरून देशाच्या तरुणांची त्याना किती काळजी वाटते हे लक्षात येते.

देशातील अशिक्षित जनतेला शिक्षण देण्या साठी या नेत्यांनी अनेक गैरसोयी असताना सुद्धा मोठमोठ्या शिक्षण संस्था शिक्षणाच्या कोणत्या ही सुविधा नसताना खेडोपाडी उभ्या केल्या. उच्च शिक्षण हे केवळ उच्च गुणवत्ता धारकांची मक्तेदारी होऊ नये म्हणून कमी मार्क्स गुण असलेल्या विद्यार्थ्याना ही डॉक्टर, इंजिनिअर MBA शाखेत प्रवेश उपलब्ध करून दिला. या वरून समाजातील तळा गाळा तील जनतेची त्याना कीती काळजी आहे हे लक्षात येते .

सत्तेमुळे आलेले दुखः , दर्द , यातना मनातच ठेवत , रात्री अंधारात एकांतात रडतात पण केवळ जनतेच्या प्रेमा मुळे , काळजी मुळे ते सत्ता राबवत असतात आणि हे दुखः यातना जनतेला होऊ नये म्हणून आपल्याच वारसदाराना मुलांना, नातवंडाना सत्ते वर बसवून जनसेवा करण्यास भाग पडतात. त्याना रडवतात .