Translate

Tuesday, April 12, 2011

डॉ. मनमोहनसिंग यांनी मतदानाचे कर्तव्य बजावले नाही.

गुवाहाटी -  पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदानाचे कर्तव्य बजावले नाही. डॉ. मनमोहनसिंग गेली 20 वर्षे आसाममधून राज्यसभेवर निवडून जात आहेत. त्यांची आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची मतदार म्हणून राज्यातील दिसपूर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत नोंद आहे.
ही फसवेगिरीच नाही  तर भ्रष्ट्राचार सुद्धा आहे. राजकारण्यांनी स्वतः:च्या आणि पक्षाच्या फायद्यासाठी अश्या अनेक लांड्या लबाड्या  राजरोस करत असतात. पण राजकारण्यांचे मिंधे असलेले निवडणूक आयोग या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष्य करते. आणि यांच्या अमानुष ताकदीमुळे आणि किचकट न्याय पद्धती मुळे सामान्य मतदार तक्रार करण्यास हिम्मत करत नही. RTI कार्यकर्त्यांचे खून मुद्दाम पाडून माहिती मागणारावर दहशद निर्माण केले जाते. देशाचा पंतप्रधानाच मतदान करत नाही, खोटे राहावाशी पुरावे निर्माण करतो  ही लोकशाहीची क्रूर चेष्टा आहे. आणि निवडणूक आयोग गांधारी सारखा डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे.हा एक  मोठ्ठा कागदोपात्राचा विनोद आहे... पंतप्रधान मागील ६-७ वर्षापासून पंतप्रधान शासकीय निवासस्थानी राहत आहेत... साहेब आहेत पंजाबचे (सिंग) ....जन्मले पाकव्याप्त  पंजाब मध्ये आणि... भाड्याने राहतात आसाम ला...फक्त निवडणुकीसाठी कागदोपत्री ....इथूनच खोटारडेपणा  चालू झाला ह्यांचा  आणि आम्हाला हे नैतिकता शिकवतात. हा लोकशाहीचा घोर अपमान आहे....   म्हणजे उद्या (देव न करो) अटक वारंट आला तर पोलीस जाणार आसाम ला... साहेबाना अटक करायला नाहीतर कोर्टाची कागदपत्रे त्या घराच्या पत्त्यावर टाकायला... आणि आरोपी मिळत नाही   पत्त्यावर असा कोणी इसम राहात नाही असा  रबरी शिक्का मारून .  अटक वारंट परत येईल....मेरा देश महान .... आणि  हे प्रामाणिकपणाचे, इमानदारीचे धडे  सामान्य नागरिकांना देत असतात . जय हो जय हो !!!!!!!!!!!

1 comment:

Satish Bhardwaj said...

Better to call him Pakistani migrant