Translate

Sunday, September 26, 2010

भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा नाही

आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.
नवी दिल्ली - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी मुख्य जवाहरलाल नेहरु स्टेडियमबाहेर उभारण्यात आलेला पादचारी पूल कोसळल्यानंतर तो पुन्हा उभा करण्यासाठी दिल्ली सरकारने लष्कराला विनंती केली आहे.

प्रदूषणा चा विचार कोणत्याही प्रचंड संपत्ती जमा करणाऱ्या गणपती मंडळानी केला नाही.

गणपती उत्सव उत्साहात पार पडला . करोडोची माया गणपती मंडळानी जमा केली. ही संपत्ती कमी वाटली म्हणून की काय अजून जास्त पैसा जमा व्हावा म्हणून भक्तांनी देवाला अर्पण केलेल्या दागदागिन्यांचा जाहीर लिलाव मांडून अजून जास्त संपत्ती निर्माण केली .
लालबागच्या राजाच्या चरणावर अर्पण केलेल्या अनेक मौल्यवान वस्तूंची गेले दोन दिवस मोजदाद सुरू आहे. कुबेराचा खजिनाही फिका पडावा इतक्या सोन्या-चांदीच्या वस्तू लालबागच्या राजाच्या दरबारात जमा.अनेक ठिकाणी, निवासी वसतीत असलेला पन्ननास डेसिबलचा नियम तर धाब्यावर बसवताना आवाजाची पातळी १०० डेसिबल्स होती.


Thursday, September 23, 2010

सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा

आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग? एक होवू शकते. सरकारी दूरदर्शन सोडून बाकी बातम्या देणाऱ्या TV  चनल वर बंदी घालावी.जशी बंदी आयोध्या निकाला करत्ता SMS वर घातली. आणि मग DD हे सरकारी बातमीपत्र खेळ कसे यशस्वी झाले, भव्य दिव्य झाले, भारत खेळ मध्ये जगातील पहिला  का त्याच्या आधीचा जो कोणता नंबर मिळवत खेळातील जगातील महासत्ता कशी झाला याचे २४ तास बातम्याचे दळण दळावे. हे पाहून भारतीयांची छाती अभिमानाने फुलेल सिर उंच उठेल.
जय देवा देवा जय कलमाडी देवा आरती उतारू खेळ खंडोबा देवा !
कॉमनवेल्थ खेळाला ला केले तू भ्रष्ट्र पैश्या चा मेवा. जय
उड्डाणे पूल तू अशी बांधसी देवा, वापरा आधी ती कोसळून धाराशाही होती देवा!
स्टेडीयम चे छत पावसाच्या पाण्याने गळी देवा!
खेलग्राम मध्ये डास वावर कुत्र्यांचा वावर मुक्त !
परदेशी खेळाडू होते भयभीत स्पर्धे आधी ,  करती नमस्कार माय भूमीतून देवा  !
5 करोड़ रुपए का थीम सांग पांच सेकंद ने नकारा देवा !
भ्रष्ट्राचार , धर्मांधता , भाषा दंगली त देश जळत होता !
दिल्हीत खेळाचा तमाशा रंगात होता!
आयोध्या निकाला चा खेळ रंगतो दरबारी जनता होते भयभीत सारी.
कलमाडी ना मात्र  चिंता पैश्याची  सारी
सारे चानेल थकले गात कलमाडी  भ्रष्ट्र  गाथा
आपण या सारख्या कविता लिहू शकता
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Tuesday, September 21, 2010

आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही?


आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही? तर आजच्या वर्तमान पुढील  पत्रातील बातम्या वाचा. वर आस्मान  कधी नव्हे तर याच वेळी फाटले . गंगा , यमुना नद्यांनी गेल्या पन्नास वर्षात आपली सीमा कधी ही ओलांडली नव्हती त्या नद्या शहरेच्या शहरे मंदिर मस्जिद   उध्वस्त करत बेफामपणे वाहत आहेत  भारताच्या खेळाच्या तय्यारीचे  त्यांना कांही भान आहे का? हा प्रश्न पडतो.  पण गेल्या महिन्या पासून या दोघांनी ही महान भारताच्या यशावर पाणी फिरवण्याचे कार्य अविरत केले . देशाची इभ्रत पणाला लावणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धा दोनच आठवड्यावर येऊन ठेपल्या असताना सोमवारी जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या बाहेर, याच स्पर्धांच्या निमित्ताने उभारला जात असलेला पादचारी पूल कोसळून २३ मजूर जखमी झाले आणि देशाची लाज गेली.राष्ट्रकुल खेळांचे उद्धाटन समारंभ तसंच समारोप समारंभ होणा-या जवाहरलाल नेहरु मैदानाजवळच हा पूल आहे. या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना म्हणजे शरमेची बाब असल्याचे जनतेचे मत आहे.वेलिंग्टन - राष्ट्रकुल क्रीडानगरीतील प्रश्‍न दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यातच दिल्लीत सातत्याने येत असलेल्या पुरामुळे वेगाने होत असलेल्या कामावर प्रतिकूल परिणामही होत आहे. आता यात सुधारणा झाली नाही, तर स्पर्धाच रद्द होईल, असे न्यूझीलंडचे पथकप्रमुख डेव्ह करी यांनी सांगत राष्ट्रकुल संयोजकांची झोप उडवली पण आपल्या कलमाडी अन्ड कंपनीने याला न भिता भारताची मान , शान जगभर उंचावण्या प्रयत्न चालू ठेवले यास दाद द्यायला पाहिजे. आज त्यांच्या जागी दुसरे कोणी असते आणि भारता शिवाय दुसरा देश असता तर कधीच स्पर्धा रद्द झाल्याची घोषणा करून बसला असता.

Sunday, September 19, 2010

रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.


'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीही रस्त्याची अवस्था वाईट असल्याचेही मान्य केले.

Wednesday, September 15, 2010

माँ तुझे सलाम!!!

 माँ तुझे सलाम!!!
एकदा एक निर्णय घेतला, की त्याच्याशी ठाम राहणे, प्रसंगी आत्मक्‍लेश सहन करणे आणि टीकाटिप्पणी होत असतानाही आपल्या निर्णयाशी तडजोड न करण्याला फार मोठे मानसिक बळ, तसेच धैर्याची गरज असते. आपल्या निर्णयाशी प्रतारणा न करणारी माणसे तशी कमीच असतात. योगायोगाने या गटात मोडणाऱ्या दोन स्त्रियांचं आहे. आणि या दोघीजणी आशिया खंडातील आहेत. फक्त फरक एकजणी लष्करी हुकुमशहाच्या लष्करी अत्त्याचाराला बळी पडली तर दुसरी आपण विचारकरू शकणार नाही अश्या महान अहिंसावादी, उठसुठ महात्मा गांधीच्या नावाचा जप करणाऱ्या लोकशाहीच्या भ्रष्ट्र बेईमान राजकारण्याच्या लोकशाही अत्त्याचाराला बळी पडली आहे. हे वर्णन वाचून तुम्हाला भारताची आठवण झाली असेल. तर दुर्देवाने आपल्या आठवणीने आपणास दगा दिला नाही असे मला खेदाने मान्य करावे लागेल. या मध्ये ईशान्य भारतातील मणिपूर येथील इरोम शर्मिला चानू आणि म्यानमार मधील आँग सान स्यू की या दोघींचा समावेश आहे. पहिल्या क्रमांकावर यांचे नाव इतिहासकाराला लिहावेच लागेल एव्हढे मोठे यांचे ऐतिहासिक कार्य आहे.

Tuesday, September 14, 2010

अमेरिकेच्या गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग

अमेरिकेच्या गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग
उपक्रमावर अभय बंग यांच्या उपचार पद्धतीस न्यायवैद्यकीय अनुमति नाही. आदिवासींना फसवून त्यांच्यावर उपचार केले जातात हे वैद्यकीय एथिक्स च्या विरुद्ध आहे म्हणून जोरजोरात चर्चा चालू आहे. वादविवाद आणि त्यात चांगली बाजू हिरहिरीने मांडणे हे ठणठणपाळ याची मजबुरी यामुळे ठणठणपाळ यानेही मोठ्या उत्साहाने भाग घेतला .कारण भारतात ज्या कांही चांगल्या गोष्टी आहेत त्यात श्री आणि सों अभय बंग , आमटे कुटुंबीय यांचा पहिला नंबर आहे. आणि या चांगल्या कार्यास जर कोणी अपशकून करत असेल तर विरोध करणे हे आपले कर्तव्य आहे यामुळे वादविवाद . हे चालत असतानाच आज लोकसत्तात पुढील बातमी वाचली . डॉरी स्ट्रॉम्र्स पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. अभय बंग अमेरिकेला रवाना. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=100...

Friday, September 10, 2010

‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स हा वर मी गणराया मागितला आहे.

कालच मिस्टर इंडिया! हा जाला वरील लेख वाचला . अदृश होवून इतरांच्या खाजगी जीवनात डोकावण्याची इच्छा , जादूची अंगठी, बाबा , बुवा , महाराज त्याच्या मनात आलेल्या सर्व कल्पना वा विचार अत्यंत घाणेरड्या, अश्लील, वात्रट या सदरात मोडणार्‍या होत्या.परंतु हेमंतला अशा वाईट गोष्टीपासून चार हात दूरच रहायचे होते . हे वाचत प्रतिक्रिया देतच झोप कधी लागली समजलेच नाही.
सकाळी उठल्या बरोबर वर्तमान पत्र लोकसत्ता वाचणे हा प्रमुख कार्यक्रम.प्रथम गजलीयत गझलीयत भीमराव पांचाळे यांचे उर्दू शेरोशायारीचे लहानसे पण मन प्रसन्न करणारे सदर वाचून अग्रलेखा कडे वळलो .शीर्षक वाचून अगं बाई,अरे बापरे !! वाटल हे काय आज संपादकांना विषय मिळाला नाही बाई, बाप असा अग्रलेख.

Wednesday, September 8, 2010

भारताच्या रुपयाला नवीन मानचिन्ह मिळाले.

भारताच्या रुपयाला नवीन मानचिन्ह मिळाले. यामुळे भारताच्या विकासाला झालेल्या  न झालेल्या विकासाचे ढोल पिटले गेले . हा विकास कसा झाला त्याचे एक मानचिन्ह.

Monday, September 6, 2010

UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA: मराठी माणसांनो , मराठी जगवा

UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA: मराठी माणसांनो , मराठी जगवा

भ्रष्ट्राचार मुक्त भारत !!

 
भ्रष्ट्राचार मुक्त भारत !! हे स्वप्न आता दूर राहिले नाही. राष्ट्रीय भ्रष्ट्राचार-विरोधी धोरण या मथळ्या खाली आज लोकसत्तेत केंद्रीय दक्षता आयोगाने एक जाहिरात दिली आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने भ्रष्ट्राचार-विरोधी राष्ट्रीय  धोरण तय्यार करण्यात पुढाकार घेतला आहे. हे शासकीय धोरण निव्वळ सरकारी होवू नये म्हणून आयोगाने सर्व हितसंबधिता कडून म्हणजेच भारतीय नागरिक, सिव्हील सोसायटी,ऑर्गनायजेशनस, खाजगी व्यवसायिक,प्रसिद्धी माध्यम, राजकीय व्यक्ती, न्यायधीश, यांच्या कडून आयोगाने या मसुदा धोरणावर जनतेचा प्रतिसाद मागितला आहे. २०/०९/२०१०
पर्यंत आयोग कडे आपली मते पोहोचणे  आवश्यक आहे. आयोगाचा पत्ता पुढील प्रमाणे आहे. ज्या भारतीय नागरिकांना देश भ्रष्ट्राचार मुक्त भारत व्हावा असे वाटत असेल त्यांनी कृपया आपली मते, सूचना  आयोग कडे आवश्य पाठवाव्यात.  ही नम्र विनंती.
                 श्री. के.  सुब्रमण्यम
                 ओ एस डी टु सीव्हीसी
                 सेन्ट्रल व्हिजिलन्स कमिशन
                 सतक्रता भवन आयएनए ;
                 नवी दिल्ली ११००२३
                 फोन : ०११-२४६५१०८५
                 e mail: subramaniam.k@nic.in

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी  कोंबडी आहे. अंड च खा कोंबडी कापु नका एक कळकळीची विनंती दोघांना करत मराठीच्या हितचिंतकांनी मराठी माणसांनी उध्दव आणि राज या ठाकरे बंधूनी एकत्र यावे.  मराठी माणसा करता बरोबरीने काम करावे म्हणून  आज मुंबईत मूक मोर्चा दोघांच्या घरावर काढला..... या प्रयत्नाची दोघानाही कित्येक दीवस आधी कल्पना देण्यात आली होती. पण दोन मराठी माणस एकत्र येतील ते कसले मराठी या उक्तीनुसार आज या दोघांचे वागणे होते. 

Sunday, September 5, 2010

मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले

शाळांना दहा दिवस सुटी
दिवाळी, ख्रिसमस म्हटला की, शाळांना सुटी असते. परंतु शेगावच्या इतिहासात प्रथमच दिवाळी, उन्हाळ्याच्या सुटीनंतर दहा दिवस शाळांना सुटी राहणार आहे. उत्सवादरम्यान नगरपालिकेच्या शाळा, कॉलेज बंद राहतील. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून शाळांचा निवास व्यवस्था म्हणून उपयोग करण्यात येणार आहे.
शाळांना दहा दिवस सुटी शिक्षणाची ऐसी कि तेसी. .नाहीतरी शिक्षणाचे महत्व आहे कोणाला. मंदिरे बांधा, उत्सव साजरे करा , अंधश्रद्धा पसरवा , नवसाला देव पावतो म्हणाव मग पहा पैसा कसा धो धो वाहतो. या पैश्यातून साम्राज्ये उभी करा आणि बिन परीक्षा घेता पदव्याची खिरापत वाटा. हीच तरुण पिढी जय हो!! जय हो

Wednesday, September 1, 2010

हे फक्त भारतातच होवू शकते

दोन दिवसा पासून वर्तमानपत्रात TV वर आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन ह्यांनी मुंबईच्या विकासात अडथळा करण्यास सुरवात केली आहे .स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन यांनीही मुंबईतील पायाभूत विकासाच्या कामात अडसर उभा करण्यास सुरुवात केली आहे . अमिताभनी चारकोप - मानखुर्द व्हाया जुहू या प्रस्तावित मेट्रो रेल्वेमार्गाबाबत नाराजीचा सूर लावला आहे . जुहू येथील ' प्रतीक्षा ' बंगल्याजवळून हा मार्ग जाणार असल्याने सदर प्रकल्पामुळे आपली ' प्रायव्हसी ' संपुष्टात येईल , याची काळजी अमिताभना लागली आहे हे वाचून या कलाकारांवर जनतेने एव्हढे प्रेम केले , मानसन्मान दिला, पैसा प्रतिष्ठा दिली त्या कलाकारांची जनते बद्दल समाजा बद्दल कांही बांधिलकी आहे की नाही ? आज मुंबईच्या समस्या बच्चन यांना माहित नाही का? मध्यंतरी मंगेशकर भगिनींनी सुद्धा अशीच भूमिका घेवून पेडर रोड वरील उड्डाण पुलाचे काम रोकले होते. इतके दीवस राजकारणी लोक स्वार्था साठी शासकीय योजनांना अडथळा आणत होते, आता त्यात सेलिब्रेटिसज ची भर पाडली तर जनतेने काय करावे .सामान्य जनतेच्या घरावर नांगर फिरवून त्यातून उभ्या राहिलेल्या सुखसोयीचा आपण वापर करायचा .आणि आपल्यावर थोडी अडचण सहन करण्याची वेळ आली तर गळा काढायचा . हे फक्त भारतातच होवू शकते