Tuesday, December 8, 2009

राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते याचे दुख: जास्त..... ,


मोहाच्या फुला पासून दारू,ज्वारी,बाजरी अन्न धान्य यांचे पासून दारू असे क्रांतिकारक निर्णय घेणारे सरकार जगात गेल्या 10000 वर्षात झाले नाही. या निर्णया मुळे महाराष्ट्र सरकारचे नाव वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकार्डस मध्ये ताबोडतोब सामील केले गेले पाहिजे.
मोर्च्या ने पाव रोटी धान्य मागायला आलेल्या जनतेस  फ्रांस च्या उर्मट राणीने जनतेला पाव भेटत नसेल तर केक खा असे उत्तर दिले दिले. त्या नंतर जनतेच्या रागाचा उद्रेक झाला , अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले आणि देशभर अराजक, हिंसाचार याचे थैमान सुरू झाले. आणि जग प्रसिद्ध फ्रेंच राज्य क्रांती झाली.त्यात राज घराण्याचा  शिरच्छेद झाला.राजाच्या राणीचे ठीक आहे. हो. . .. तीला गरिबी,भूक, काय असते हे माहित असायचे कांहीच कारण नव्हते , ती तर तोंडात सोन्याचा चमच्या घेवून जन्मली होती.
पण लोकशाहीत जनते कडून निवडून आलेले सरकार असे निर्णय घेते 
याचे दु:ख जास्त आहे . हे धक्का:दायक चीड आणणारे आहे. हे  राजकारणी नेते इतिहासा पासून  कांही अक्कल शिकले नाही, असे वाटते. माझे  मना बन दगड..... या घाणी चेच खत होईल. असे झाले तर सरकारने असेच निर्णय  घ्यावे व क्रांतीचा मार्ग मोकळा करावा हीच आपण प्रा र्थ ना करू शकतो.
शराब की बोतल से जिन्न निकला
और उस नेता  से बोला  
-”हुकुम मेरे आका!
आप जो भी मुझसे मंगवाओगे
वह ले आउंगा
बस शराब की बोतल नहीं मंगवाना
वरना मुझसे हाथ धोकर पछताओगे..... मगर फिर भी नेताजी नही माने और शराब बनाने की ठान बेठे ... देखो आगे आगे होता हें क्या ?
??               

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

Sunday, December 6, 2009

माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.







आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना. कोटयावधी बालकांना गुन्हेगारीच्या मार्गावर वाटचाल
करावयाला लावणारा असा हा  भारत सरकारचा बाल कामगार विरोधी कायदा आहे. बाल कामगाराच्या हीता करता काहींचं नाही करता फक्त बालकाना कामावर न ठेवण्याचा  कायदा करून आणि कामावर ठेवल्यास मालकांना जेल मध्ये टाकण्याचा,त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक दंड लावण्याचा  अजब कायदा करून   सरकार, राजकारणी नेते आणि नोकरशाही आपण बाल कामगाराच्या सर्व समस्या दूर केल्याचे आणि आपण बालकाचे मुलांचे हित पाहत असल्याचे ढोल पिटत आहे. पण वास्तवात हा कायदा नोकरशाहीच्या भ्रष्ट्राचाराला आधिक वाव देत आहे. पण शासन बुद्धीजीवी वर्ग वेड पांघरून पेडगावला जात आहेत. आणि बालक काम करून घराची चूल पेटण्यासाठी राबत आहे. हेच दाहक सत्य आहे. आणि शासन यंत्रणा वार्षिक 
श्राद्धा  प्रमाणे बालकामगार दिवस "आमच्या विभागात बालकामगार नाहीत" अश्या पाट्या लाऊन साजरा करतात. 

रेल्वे ने प्रवास करत असताना स्
टेशन वर अनेक पदार्थ मिळतात . का सेलू स्टेशन वर चणे गरमागरम मिळतात. गरीब चणे खात असेल तर ,देखो घरमे खाणे को मिलता नही स्टेशन पर चणे खा राहा आणि  श्रीमंत माणूस तेच चणे खात असेल तर देखो शौक से चणे खा राहा है. चणे तेच पण खाणाऱ्या च्या सामाजिक दर्जावर खाण्याचा दर्जा ठरत असतो. या वरून बालकामगार  ही सामाजिक  दर्जावरून वर्ग ठरवले जातात . घरी चूल पेटावी घरच्यानन च्या पोटात दोन घास जावे , भावंडाना शिक्षण घेता यावे , आजारी मात्या-पित्याच्या आजारपणासाठी औषधा करत मदत व्हावी म्हणून हि कोवळी बालक काम करत असतात. तेंव्हा समाज यांचे कोतूक करावयाचे सोडून आपला बुद्धिवाद पाजळत बसतात. आणि बालकामगार समाजाला कलंक आहे असे सांगत हे बंद करण्या करता कायदे , अधिक कडक कायदे करत बसतात.


तेच उच्चभ्रू , मध्यम  समाजातील मुल, मुली अभ्यास सोडून रियालिटी शो च्या नावाखाली टी.व्ही वर वेडे वाकडे तोडक्या कपड्यात सरक्यालो खटीया १२ बजे असे विचित्र गाणे घाणरडे हावभाव करत असतात; कमरे खालचे विनोद सांगत असतात ,  तेंव्हा हेच उच्च वर्ग , या बाल कलाकार उर्फ बाल कामगार याचे कोतूक करत असतात. या कलाकारांना बाल मजदूर ,कामगार म्हणतो  म्हणून दचकलात? हां हे बाल कलाकार १००% बाल कामगार आहेत हे  विदारक  कटू सत्य आहे. नैसर्गिक जीवन जगण्याचे, खेळाचे,अभ्यास करण्याचे सोडून हे बाल कामगार  8 - 10  तास  चेहऱ्यावर मेकअप चे थर चढवून, अक्शन, कट, च्या वातावरणात, फ्लूड लाईट च्या प्रखर प्रकाशात ,घामने ओलेचिंब होत काम करत असतात. याच वेळी परीक्षेकांची कुजकट, अवमान करणारी शेरेबाजी ऐकत अपमान गिळून चहेर्या वर  खोटे हसू आणत काम करत असतात. राग, त्रागा केला तर स्पर्धेतून बाहेर फेकल्या जाण्याची भीती असते.जशी भीती कामावरून काढून टाकण्याची बाल कामगाराला असते.  त्याच बरोबर आई वडिलांच्या अंतहीन अपेक्षांचा फुगा फुटला तर काय होईल याची पण भीती मनात असतेच. पण आजच्या उपोभोगवादी, बाजारू संस्कृतीत या कडे कोणाचेच लक्ष जात नाही, कारण बाजारू संस्कृतीत बाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यांहा तो हर चीज बिकती है हेच सत्य आहे . यामुळे  या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते.हीच या मुलांची म्हणण्या पेक्षा आपल्या समाजाची शोकांतीका आहे.मुख्य गोष्ट आज जगात 22 - 23 कोटी बाल कामगार काम करत आहेत. विषम सामाजिक, आर्थिक परिस्थिती मुळे, बाजारू अर्थ व्यवस्थे मुळे ;  जगातील कोणत्याही कायद्याने ही बाल कामगार व्यवस्था बंद पडणार नही . मग अतिरेकी कायदे करण्या पेक्षा या बाल कामगारांना कायद्याने कामगार हक्क देऊन त्यांची ताकद वाढविण्याची गरज आहे. या करता मालकांना बाल कामगारांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्यात यावी.या मुलांचा सरकारी  शिक्षणाचा आर्थिक भार या मालकांवर टाकावा. शाळे मध्ये आई-वडिलांच्या नावा बरोबर या मालकांचे जबाबदार पालक म्हणून नाव टाकावे. मुलांचे कामाचे तास शाळेच्या तासा बरोबर नियमित करावे. 5 - 6 तासा पेक्षा मुलांचे कामाचे तास जास्त होणार नाही, या मुलांना ओवर टाइम मध्ये काम करणे, ओवर टाइम काम करण्या करता सक्ती करणे कायद्याने बंद करणे. संघटीत कामगारा चे हक्क या बहाल करणे. अश्या व्यवस्थित नियमावली करून या  बालकांच्या श्रम शक्तीला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊन देशाच्या या भावी नागरिकांना सशक्त बनविणे हीच काळाची गरज आहे. नाही तर समाज कंटक , गुन्हेगारांच्या, शुद्र राजकारण करणाऱ्या नेत्यान च्या सापळ्यात अलगद सापडून ही पिढी बरबाद होईल , आणि याचे गुन्हेगार तुम्ही आम्ही सगळेच असुत. हे ध्यानात घ्या.



हसने के लिये कुछ वाक्य !!!


पहली भेंट..नए-नए डॉक्टर ने अपने जीवन का पहला ऑपरेशन किया, लेकिन ऑपरेशन के थोड़ी ही देर बाद मरीज मर गया...
डॉक्टर ने दीवार पर टंगी काली मां की तस्वीर की ओर हाथ जोड़कर सिर झुकाते हुए पूरी श्रद्धा से कहा, "हे मां, मेरी ओर से यह पहली भेंट स्वीकार कीजिए..."

Saturday, December 5, 2009

पूसा के वैज्ञानिक ने बांस से बनाई बिजली

पूसा के वैज्ञानिक ने बांस से बनाई बिजली



Sep 13, 11:54 am
मुजफ्फरपुर [गणेश कुमार मेहता]। राजेन्द्र कृषि विश्वविद्यालय वानिकी विभाग के वरीय वैज्ञानिक डा. आरएन झा के अद्यतन शोध ने वैज्ञानिक हलकों में जिज्ञासा पैदा कर दी है। उन्होंने बांस से बिजली बनाने की तकनीक इजाद की है। इंटरनेशनल जर्नल में प्रकाशित उनके आलेख ने जहां बायोमास [घास से बिजली] पर सबसे अधिक काम करने वाले चीनी वैज्ञानिकों का ध्यान आकर्षित किया है वहीं नेशनल थर्मल पावर कारपोरेशन ने भी उनसे तकनीक मांगी है। चीन में तो इस पर काम भी शुरू हो गया है। इधर, डा. झा अपने लैब में इसे विकसित करने में रात-दिन जुटे हुए हैं। कृषि के अलावा पावर सेक्टर में शोध कर रहे वैज्ञानिकों की नजर भी अब उन पर टिकी हुई है।

कई वर्षो से डा. झा की बांस से बिजली बनाने की तकनीकी लगभग अंतिम चरण में है। डा. झा ने बताया कि बायो इनर्जी में सबसे अधिक संभावना बांस में है। एक किलो बांस से एक घंटा में 15 सौ वाट बिजली पैदा की जा सकती है। बांस का औसतन उम्र पांच वर्षो का होता है। वह जितना पुराना होगा, उतनी अधिक बिजली पैदा की जा सकती है। इसके लिए उन्होंने बड़ा बक्सा के आकार की एक मशीन इनर्जी बायोसूट गैसफायर मशीन बनायी है। इसके अंदर 440 वोल्ट का ट्रांसफार्मर लगा हुआ है। इसमें बांस का बिस्कुट डाला जाता है। इस बाक्स को जेनरेटर पर चलाया जाता है। डा. झा के अनुसार यह ईधन के अन्य स्रोत से भी चलाया जा सकता है। बांस का बिस्कुट बनाने की भी मशीन बनायी गयी है। डा. झा ने बताया कि इस पद्धति से बिजली की लागत 1.35 रुपये प्रति यूनिट आयेगी। यह पद्धति पूरी तरह से प्रदूषण मुक्त होगी। डा. झा के अनुसार बांस कार्बन डाई-आक्साइड का सबसे बड़ा अवशोषक है। बांस की अधिक खेती कर पर्यावरण से कार्बन डाई-आक्साइड को कम किया जा सकता है। इंटरनेशनल जर्नल आफ बैम्बू में यह शोध रपट छपने के बाद बायोमास पर काम करने वाले वैज्ञानिकों ने इसे हाथोंहाथ लिया है। उन्होंने कहा कि इस दिशा में पहल कर किसानों के भविष्य को संवारा जा सकता है और ऊर्जा संकट से मुक्ति पाई जा सकती है





 




Thursday, December 3, 2009

It hurts a lot : (.


Wednesday, December 2, 2009

भारतीय नेत्याच्या भ्रष्ट्राच्यारा वर हकीम लुकमान कडेही ओषध मिळणार नाही,


लोकशाही म्हणजे जनतेचे , जनतेकरता , जनतेने निवडलेले सरकार.हि अब्राहीम लिंकन यांनी केलेली व्याख्या . पण भारतात जनतेने निवडून दिलेले सरकार, नेत्याच्या भ्रष्ट्राचारा करता, भ्रष्ट्र नेत्या कडून चालवले जाणारे सरकार म्हणजे लोकशाही अशी झालेली आहे. जो पर्यंत मताची खरेदी विक्री , धर्म , जातीपातीचे राजकारण कायद्याने बंद होत नाही तो पर्यंत हकीम लुकमान कडेही यावर ओषध मिळणार नाही,  आणि या करता  खुले जनमत घेण्या करता सरकारवर जनमताचा प्रचंड दबाब आणणे आवशक आहे.   








 

Monday, November 30, 2009

मग भारत सरकार नेहरू प्रमाणे लोकसभेत बयान देईल कि ती जागा ओसाड होती .तेथे गवताचे पातेही उगवत नाही ,


आपल्या हद्दीतील बांधकाम चीन च्या  हरकतीं मुळे  बंद करण्यात आले या सारखी शरमेची गोष्ट दुसरी असु शकत नाही. चला आता आपले माननीय पंतप्रधान परत अमेरिकेला आम्ही आमच्याहद्दीत , आमच्या मालकीच्या जागेत काम करत होतो ही जागा आमच्या मालकीची आहे याचे अमेरिकन सरकारला पुरावे सादर करण्यास लवकरच भेट देतील. तो पर्यंत चीन त्या जागेचा ताबा घेईल . आणि मग भारत सरकार पंडित नेहरू प्रमाणे लोकसभेत बयान देईल कि ती जागा ओसाड होती .तेथे गवताचे पातेही उगवत नाही ,

Saturday, November 28, 2009

१०० चुहे खाके बिल्लि चली हज को. त्या माजरी सारखी अवस्था झाली आहे*



१०० चुहे खाके बिल्लि चली हज को. त्या माजरी सारखी अवस्था झाली आहे* पण कॉंग्रेस पक्ष हा हज चा मुक्काम नाही. हे जेंव्हा यान्या समजेल तेंव्हायांचा पोपट झालेला असेल.
युतीच्या राज्यात सतेचा उन्माद उपभोगल्या मुळे , आज यांची अवस्था पंख छाटलेल्या जटायु सारखी झाली आहे'.

आपल्याला राज्यसभेवर पाठविण्याचा शब्द शिवसेनाप्रमुखांनी पाळला नाही, यावरून  खरे दुखणे समजते.

Friday, November 27, 2009

वकील हे खोटे बोलण्या साठीच असतात,






आझमी हे न्यायालयात खोटे बोलत आसल्ल्या मुळे न्यायधीश संतप्त. वकील हे खोटे बोलण्या साठीच
असतात, हे माननीय न्यायधीशाना माहीत नाही याचे नवल वाटते.

Wednesday, November 25, 2009





Country's longest expressway The 11.6-km
P. V. Narasimha Rao Elevated Expressway stretching
from Sarojini Devi Eye Hospital to Aramghar junction was
inaugurated on October 19, 2009.याला म्हणतात अस्मिता. नाही तर महाराष्ट्रात  सेतु पासून अनाधिकृत  झोपड़पट्टी पर्यंत सर्वाना नेहरू, इंदिरा राजीव सोनिया राहुल गेला बाज़ार प्रियंका गाँधी पाट्या लागतात. जय हो !!

Tuesday, November 24, 2009

                                            


गेले दशकभर जगात सगळीकडे ग्लोबल वॉर्मिंगच्या नावाने ओरड चालली आहे. विशेषत: मुंबईत २६ जुलै २००५ च्या न भूतो अशा प्रलयानंतर न भविष्यती करता काय करता येईल असा विचार व्यक्तिगत पातळीवर होऊ लागला, हा एक स्तुत्य बदल समाजात अनुभवायला येऊ लागला आहे.  पाणी वाचवा, वीज वाचवा, इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा पर्यायाने वसुंधरेला वाचवा तरच आपण वाचू अश्या मागण्या सुशिक्षित समाजात जोर धरू लागल्या आहेत.

अनेक छोटे छोटे बदल आपल्या राहाणीमानात करायला आपण आपल्यापासून सुरूवात केली तर आपणच ओरबाडलेल्या या वसुंधरेला पुन्हा सुजलाम सुफलाम करता येईल

Saturday, November 21, 2009


IndiBlogger - The Indian Blogger Community

यांचा विषारी प्रचार पाहून हीटलर चा गोब्बेल्स हा प्रचारक् ही चक्कर येउन पडला असता


A domestic dog of any of various breeds commonly used for hunting, characteristically having drooping ears, a short coat, and a deep resonant voice

डॉक्टरांवरील हल्ले हा अजामीनपात्र गुन्हा करण्यात आला आहे.मुळातच हा कायदा चुक आहे. कट प्रॅक्टिस करून आजारी पेशंट ला लुबड्नाऱ्या डॉक्‍टरना शिक्षा करण्याऐवजी
यांच्या चुकी मुळे मरण पावलेल्या नातेवाईकाना शिक्षा हा अजब न्याय आहेआज मीडिया  हा धंदा झाला आहेधंढ्या बरोबर अनेक वाईट प्रवर्ती यात शिरल्यात . या वाईट  गोष्टीना शिक्षा करण्याची सरकारची हिम्मत नाही, हा हल्ला का केला याचा विचार केला तर सरकार ला नुकसान होईल . या मुळे सामान्य जनतेला जैल मध्ये टाकून त्यांचा आवाज बंद करणे  सोपे.स्वातंञ्या नतर लोकशाही चे  रक्षण करायचे सोडुन मिडीयाच्या सहाय्याने लोकशाहीला बटिक करण्याचे कारस्थान  चालु आहेत्याला शिक्षा  कोण करणार???? हा मीडियाचा दहशदवाद पाकिस्तान पेक्षा घातक
आहे. समोरील चित्रातिल फोटो पाहिल्यास शिकारी कुत्रे बरे असे वाटल्यास नवल नाही. यांचा विषारी प्रचार पाहून हीटलर चा गोब्बेल्स हा प्रचारक् ही चक्कर येउन पडला असता. १०० दा खोटे बोला ते लोकाना खरे वाटते हा याचा सिध्ह्नत होता .येथे तर मिडिया घनट्या ला हजार वेळा खोटे बोलून, भड़क छ्याचित्रण दाखउन समाजात विष पेरत आहे.
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही
मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे ।



                                                                     

Wednesday, November 18, 2009

राज वर खटला भरण्या पेक्षा बिमार उत्तर भारतातील राजकारण्यावर खटले भरावेत

हिंदी ही कायद्याने भारताची राज्यभाषा नाही. तर ती फक्त सरकारी कामकाजची कार्यालयीन भाषा आहे. ते अफीशियल लॅंग्वेजस आक्ट, 1963 भारत सरकार च्या कायद्यात स्पष्ट केले आहे. केवळ उत्तर भारतात ही भाषा बोलल्या जाते. भारताच्या लोकसंख्ये पेकी फक्त ४०%लोकच ही भाषा बोलतात. तसेच कोर्टात हिंदी मजकूरात त्रुटी असतील तर इंग्रजी मजकूर मान्य केला जातो.
केन्द्र व राज्यात पत्रव्यवहार हिंदीत होतो. पण केन्द्र दक्षिणेतील राज्या बरोबर इंग्रजीत व्यवहार करते. हे महत्वाचे आहे. केंद्रीय मत्री शशी धरूर यानीच हे सत्य सांगितले आहे. यामुळे राज किंवा बाळासाहेबांचे काहीही चुक नाही. हिंदी नेत्यांच्या अतिरेका मुळे या देशाची तोडणी होईल  दक्षिण भारत आधीच दुरावला आहे व तो कडवा भाषवादी झाला आहे.
महाराष्ट्रा मुळे देशाचे तुकडे होणार नाही तर उत्तर भारतीयांच्या अरेरावीपणा,मुजोरपणा मुळे देशाचे तुकडे होतील. सर्वधर्म समभाव सर्वभाषा समभाव या चुकीच्या धोरणा मुळे या देशाचे जेव्हढे नुकसान झाले तेव्हडे नुकसान दहशतवादी हल्ल्या ने
झाले नाही. पण स्व:तला पुरोगामी म्हनून घेण्याच्या नादात मराठी पत्रकार व राजकारणी दिल्हीच्या खुर्ची ला सलाम नमस्ते करण्यात दंग आहे. गल्लीत गोंधळ दिल्हीत मुजरा असा हा प्रकार आहे. 

भूमीपूत्रारवर अन्याय करून परप्रांतीयाना नोकर्‍या द्या . असा कायदा भारतात नाही. राज वर खटला भरण्यापेक्षा    बिमार उत्तर भारतातील राजकारण्यावर खटले भरावेत. गेल्या
६० वर्षात स्वताच्य  राज्यात रोजगार निर्माण न करता देशाच्या इतर प्रांतात नोकर्‍या साठी जाउन तेथील शा'तता,कायदा खराब करण्या साठी दहशतवादी कारवाया केल्या बद्दल.याना  टाडा लावावा.





Monday, November 16, 2009

बाळासाहेबानीच कान टोचले, आणि मराठी मन मोकळे झाले


बाळासाहेबानीच कान टोचलेआणि मराठी मन मोकळे झाले. साडेतीन टक्के आता या विरुध ओरडतील. पण सत्य हे कटू असते ते सर्वजण बोलण्याची हिम्मत करत नाही. सलाम नंस्ते करण्यातच यांची जिंदगी जाते. दिल्हीच्या तख्ताला विरोध करणारा राणाप्रताप हा एकाच असतो. मराठी  वर्तमानपत्रांपासून  सचिन  दूरच  ... या वरुनच मराठी माणूसच मराठीचा शत्रु
आहे. हे समजते. हीच उच्चवर्णीय काम झाले की मराठी ची नाळ तोडतात.आपण मात्र आमचा आपला संपूर्ण अंक सचिनवरच काढणार आहे . दक्षिण कलाकार खेळाडु चा आदशॅ  घ्या. मागे ऊड्डाण पुला वरुन कलावंतानी  मुबईला वेठीस धरले होते.

Friday, November 13, 2009

मराठी बाणा



आग रामेश्वरी बंब सोमेश्‍वरी आसा हा प्रकार आहे. दक्षिण भारतात भाषिकवाद्यां समोर लोटांगण घालणारी काँग्रेस भाजपा, समाजवादी, लालू आणि उदारमतवादी पक्ष महाराष्ट्रात मात्र राजच्या मराठी बाण्या बद्दल ओरडत आहे. आणि सरकारही त्याला मदत करत आहे. भाषांतराची यंत्रणा बसविण्यापेक्षा महाराष्ट्रात मराठीच बोलावे लागेल असे ठणकाउन का सांगत नाही.
राजचे पत्र जसेच्या तसे हे पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील कांना कोपर्‍या वर मोठ्या बॅनर च्या रूपात लावावे. नाहीतरी कणाहींन लाचर नेत्यांचे बॅनर पाहण्यापेक्षा हे पत्र पहिल्यावर मराठी मन जागे होई



Wednesday, November 4, 2009

महाराष्ट्रातील नेते कधी सुधारणार


 






वा क्या बात हे! नकाशा पाहुनच पोट भरले. उगीच नाही भारतावर प्राचीन  काळ! पासून परकियांची अतिक्रमने होत राहिली. पिज्जा बर्गर खाणारा परदेशी पण भारतीयांच्या मसालेदार खाण्यावर फ़िदा झाला . ३० किलोमीटर वर बदलणारी भाषा आणि बदलणारी खाण्याची चव हेच भारताच्या विविधतेचे बळ आहे.

Tuesday, November 3, 2009

विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे

फक्त मराठीतूनच शपथ घ्यावी, हा आग्रह घटनाविरोधी असल्यांचंही अमरसिंह यानी म्हटलेअसे जर   असेल तर कर्नाटक च्या मंत्र्याने हिंदीतून शपथ घेतली म्हणून त्यला राजीनामा काद्यावा लागला.त्या वेळी ही समाजवादी पिल्लावळ गप्प का बसली. उत्तर भारतीयांच्या या अरेरावीला त्रासून दक्षिण भारतात हीनऽदीला पूणॅ बंदी आहेएव्हढेच नव्हे तर  
राष्ट्रीय प्रसारण हीनदी बाताम्याचे वेळी त्या लावता तमिळ बातम्या लावल्य जातात... ..  तेथे ही भयया मंडली  शेपुट घालतात .  प्रादेशिक अस्मिता बाळगणे हा देशढ्रो नाही तर दुसर्‍या राज्यात जाऊन तेथील भूमीपुञा वर आरेरावी करणेत्यांच्या भावनांशी खेळणेहा देशढ्रो आहे.  

विविधते मधे एकता हेच भारताचे सामर्थ आहे 




Saturday, October 31, 2009

राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली अपॅण होईल.



सत्तेचा दुरुपयोग करत गेल्या ६० वर्षात राजकारणी लोकाणी सरकारच्या जमिनीची लूट केली आहे. त्याच बरोबर सत्तेचा गेरफायदा घेत बेकायदेशीर शिक्षण संस्था कायदेशी करून NGO च्या नावा खाली शासनाला हजारो करोडो चा चुना लावला. यांच्या नावावर साधी मोटर नाहीतरी हे परदेशी मोटारी च्या खाली उतरत नाही. अनेक  संस्था बूडउन हे जातीच्या धर्माच्या नावावर देशाचे मंत्री होतात. गरीबा करता असलेल्या योजना यांच्या नातेवाईकाना बहाल करतात. रोजगार हामी
योजनेच्या यादीत यानाचेच नातेवाईक असतातयाकरता गेल्या ६०
वर्षात सॅथापन झालेल्या राजकारणी संस्थानाचे राष्ट्रीयकरण केलेतरच ती इंदिरा गांधीना खरी श्र ध्दानजली
अपॅण होईल.



 

महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चव, सवॅ काही शिकवुत.


राज तेरा जबाब नही . हे जे कोणी अब्बू मुंबईत आहेत त्याना जर मराठी येत नसेल तर त्यानी मराठी
भाषे चे  वर्ग लावावेत त्याना आम्ही मराठी भाषा नव्हे तर मराठी रीतीरीवाज, शिवाजी,संभाजी चा पराक्रम, शाहिस्तेखान, अफजलखान चा पराभव. राकट कणखर महाराष्ट्र,ठेचा भाकरीची झणझणीत चवसवॅ काही शिकवुत. 

त्यानतर ते आपला ईतिहास, भूगोल. बिर्यानी, कबाबची चव

 विसरून जातीलजय मराठी.

Saturday, October 24, 2009

तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .. त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला..


त्या मराठी माणसाने आमच्या पाठीतही खंजीर खुपसला, दगा दिला... अशी प्रतिक्रिया बालासाहेबानी दिली. छगन भुजबल,नारायण राणे आणि राज  आता मराठी माणसाने ही आमच्या पाठीत  खंजीर खुपसला हें बोलण्या आधी मराठी माणसाच्या नावावर आपण जे उद्योग केले , त्याचा अभ्यास करावा. उडाले ते कावले आणि मागे राहिले ते मावले या बेफिकिरी मुले आपल्या मागे कोण राहिले हें मागे वलून पहान्याचे कष्ट आपण घेतले नाही.

राज्य सभेवर खासदार नेमणूक करताना केनिया , धुत जेठमलानी आणि उतर भारतीय. मराठी माणुस विसरून नेमले गेले. ज्या मराठी माणसाच्या जिवावर सेना भवन उभारले गेले तय मराठी माणसास भवनाची दारे बंद जहाली व् ती उद्योगपति . पैसेवाल्ल्या. बिल्डर लाब्बी,थ्री पेज वर चमक्नार्या चमकू साठी २४ तास उघडी राहु लागली .

गेल्या ४० वर्षात ज्या मराठी तरुनानी  सेने करता पोलिसांचा मार खाला, तुरुंगात गेले त्यांचा सतेचा सोपान चढ़ल्यावर विसर पडला . महापालिका तुमच्या हाती असताना मुंबई बकाल जाहली . नगरसेवाकानी मुंबई चा सत्यानास केला.पण  आपण युधिष्ठिरा सारखे डोळ्यावर पट्टी बांधून बसलात. अखेर कांग्रेस च्या ज्या वंश परंपरेला आपण जिंदगी भर विरोध केला, त्याच परंपरेला धरून पुत्र प्रेमा मुले अंधले होउन आपण आपल्याच पुत्र चा राजभिषेक केला. या सर्व गोष्टी विसरून आपण मराठी माणसाने घात केला म्हणुन मगरीचे आश्रू काढत आहात. एकच विचारावे वाटते तेंव्हा कोठे गेला होता मराठी सुता तुजा धर्म .

Friday, October 23, 2009

INDIAN DEMOCRACY


Thursday, October 22, 2009

WEAPONS OF COMMON MAN


Wednesday, October 21, 2009

BOSS RTI- 2005


BOSS RTI- 2005


mera bharat mahan


Monday, October 19, 2009

अमिरिकेची संहारक , युध्दखोर नीती स्पष्ट होते.

शांततेचा नोबल पुरस्कार घेणार्‍या ओबमचा खरा मुखवटा काय आहे हे जगाला अजुन समजले नाही.एकीकडे पकिस्तान अमेरिकेच्या मदतीचा दुरुपयोग करून अणुबॉम्ब यार करत आहे, त्याचीतस्करी करत आहे पण ओबामा डोळे मिटून बसला आहे. दुसरीकडे  लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेचा सक्रिय पाठिंबा असेल अशी ग्वाही अमेरिकेने दिली आहे. त्याचवेळी आपल्या मदतीकडे कुणीही संशयित नजरेने पाहू नये असेही अमेरिकेने बजावले आहे.
या बोलण्यावरून अमिरिकेची  संहारक , युध्दखोर नीती स्पष्ट होते. चोराच्या मनात चांदण्याची भीती असते हे खरे आहेjago india jago !!!! असे दुप्पती धोरण अवनबले नाही तर अमेरिकेतील मौत चे
सौदागर असलेले सहांरक शस्त्रा चे उत्पादक आपणास एका सेकंदात मौत च्या मार्गावर नेतील हें त्याना माहित आहे

Friday, October 9, 2009

आता मनमोहन जय हो !!!!!!! obama


नोबल पारितोषक मिळ्याल्या वर बराक ओबामा यानी या नोबल चे सारे श्रेय भारताचे पंतप्रधान मनमोहन याना दिले आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्या नतर  खरे तर भारत पकिस्तानवर अणुबॉम्ब चा हल्ला करून संपूर्ण जगाला युध्धाच्या
खाईत लोटनार होता. पण अमेरिके सोबत असलेले जुने नाते लक्षात घेऊन आणि आपल्या पंतप्रधान पदाचा उपयोग करत
मनमोहन यानी केवळ पकिस्तानला केवळ ईशारा देण्याचे काम केले, पण युध्ध करण्याचे टाळले. याच वेळी माझे नोबल
नक्की झाले.

Wednesday, October 7, 2009

भारतीय वंशाच्या वेंकटरमण यांना नोबेल

आता भारतीय वंशाचा जय हो !!!!!!!  सुरु होईल या नोबल चा आणि भारताचा भारतियात्वाचा लांबून ही संबध नाहीते ज्या देशात काम करतात त्या देशाचा हा गौरव आहे.
 
भारतात ते राहीले असते तर
पी.टीऊषा वर जशी वेळ आली तशी वेळ त्याच्यावर आली असतीअसो सवँ नोबल विजेत्यांचे आणि  त्याना कायॅ करण्या करता सहकायै करणार्‍यां
देशाचे अभिनदन.

Wednesday, September 30, 2009

विविध गायन स्पर्धोतुन पुढे येणार्‍या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..

मानधन कमी मिलते अशी तक्रार राष्ट्रपति पंताप्रधना कड़े मंगेशकर भागिनेनी केली
मंगेशकर भगिनीनी अशी तक्रार करणे म्हणजे चोराच्या उलट्या बौबा. या लाईनीत प्रवेश करणार्या नवीन गायिकांची यानी कशी नाकेबंदी केली, हे सिनेमा जगताला माहीत आहे . आपल्या वलयाचा गैरफायदा घेत पेडर रोड उडाण पुला ला विरोध करत, मुबंई सोडण्याची धमकी देऊन सामान्य जनतेला यानी वेठीस धरले हे सवौना माहीतच आहे. परदेशातील मानधना बद्दल एवढे आकर्षण असेल तर परदेशात जाउन राहावे. तेथील कायद्यांची अमलबजावणी पाहील्यावर शाहुरुखखान सारखे याचे हाल होतील..विविध गायन स्पर्धोतु पुढे येणार्या गायंकाची अडवणूक करणे. हाच याच्या सघंटनेचा छुपा आजेडा आहे..

तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ

मराठी माणसाचा वापर करुन आणि कांग्रेस च्चा वळचळणीस राहुन ऐकेकाळी वसंत-सेना असलेल्या सेनेंने मराठी चे काय हीत केले .अभद्र युत्या करुन परप्रांतीयाना राज्यसभेत पाठवताना मराठी माणुस आठवला नाही . तैव्हा कुठे गेला होता मराठीसुता तुझा धमँ ; असे . राज मराठी म्हणुन नाही तर व्यवस्थेला सुता सारखा सरळ करेल हा जनतेचा विश्वास आहे या मुळे राजला मतदान होईल. yes we can change

Saturday, September 19, 2009

तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,

बाँध बनाए, गाँव डुबोए, कारखाना बनाए ,
जंगल काटे, खादड खोडे, सेंचुरी बनाए,
जल जंगल जमीन छोडिन हम कहा कहा जाए,
विकास के भगवान बता हम कैसे जान बचाए॥

जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा,
गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी,
हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी?

पुरखे थे क्या मूरख जो वे जंगल को बचावे,
धरती रखी हरी भरी नदी मधु बहाए,
तेरी हवससे जल गई धरती, लुट गई हरियाली,
मचली मर गई, पंछी उड गई जाने किस दिशाए

मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी,
उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी,
गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी

बिरसा पुकारे एकजुट होवो छोडो ये खामोशी,
मछवारे आवो, दलित आवो, आवो आदिवासी,
हो खेत खाली हान से जागो नगाडा बजाओ,
लडाई छोडी चारा नही सुनो देस वासी

Saturday, September 12, 2009

नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.

नेहरू चा पणतू पंतप्रधान होऊ शकतो तर राष्ट्रपतीचा मुलगा हा आमदार का ? होऊ शकत नाही.
IN THE WORDS OF ABRAHAM LINCON WHAT DEMOCRACY MEANS :-GOVERNMENT BY THE PEOPLE,FOR THE PEOPLE,OF THE PEOPLE
SIR *BUT IN INDIA DEMOCRACY MEANS :-
DEMOCRACY IS THE GOVERNMENT OF THE POLITICAL LEADER FOR
THE SELFISH POLITICAL LEADER। BY THE PEOPLE।SO JAGO INDIA JAGO

नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं



नील आर्मस्ट्राँगने चंदावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हाची गोष्ट...!

तिथे पोचल्यावर स्पेससुटच्या आतच त्याने पहिला मोकळा श्वास घेतला, या चंदावर, पृथ्वीच्या बाळावर, लिंबोणीच्या झाडामागून दिसणाऱ्या आपल्या लाडक्या चंदामामावर पाऊल ठेवणारे आपण पहिले या जाणीवेने त्याचा कंठ दाटूनही आला आणि चंदाचा तो परिसर डोळ्यात भरून घेण्यासाठी त्याने आजूबाजुला पाहिलं...

तर...

...तर आधीच दोन माणसं तिथे उभी होती.

नील आर्मस्ट्राँग सॉलिड गडबडला. त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला :

'एस्क्युज मी! कोण आहात तुम्ही...?'

तेव्हा त्यातला दाढीवाला लगेच पुढे झाला आणि म्हणाला..

'कॅमेरामन आशिष के साथ दिपक सौरसीया... चांदतक!'

Tuesday, September 8, 2009

सर्व धर्म समभाव नितीची शोकांतिका


हिंदुना लाठ्या मुसलमान आणि ईतर धर्मियाना हात हीच भारतीय सवँधमँसमभाव या नीत्तिचि
शोकांतिका झाली आहे.
पच्शिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी कॉंगरेसनेच हा विषय चिघळु दीला. शिक्षण सम्राटपासून ते साखर सम्राट आणि राष्ट्रवादी चे राजकारणी या काळात कोठे होते. गृहमंञी पाटील सुध्दा परीक्षेत नापास झाले. घरच्या दंगलीत पराभूत झालेलै हे राजकारणी ( नेते नव्हे} चीन पाकीस्तान बरोबर काय लढणार. एकाही राजकार्न्याची हा इतिहास आहे, तो बदलता येणार नाही असे सगान्याची हिम्मत दाखवली नाही। या बद्दल याना क्षमा करण्याची ही यांची लायकी नाही। याना तोफेच्या तोंडी देणेही एकच शिक्षा आहे.

Saturday, August 15, 2009

शाहुरुखानचा अपमानअमेरिकेचे कांही चुकले नाही !!

अमेरिकन नोकरशाही म्हणजे भारतातील भ्रष्ट कामचुकार नोकरशाही नाहीशाहुरुखान चा अपमान जहाला म्हणुन छाती बडवन्या पेक्षा आपण स्वत आत्म परिक्षण केले पाहिजेकबुतरबाजी साठी भारतातील सामान्य लोकच काय राजकारणी, कलावंत सुद्धा बदनाम जहाले आहेकोणत्याही देशात जायचे तर त्यांचे कायदे मान्य करावेच लागतातआणि अश्या अमलबजावणी करण्याचे नुकसान आपला भारत भोगत आहेकधी कारगिल, कधी संसदेवर हल्लामुम्बैत दर - वर्षानी होणारे बोम्ब हल्ले या पासून आपणाला अक्कल आली नाहीआपण कधी कायदेच पाळत नसल्या मुले , आपणास उगीचच भारताचा अपमान जाल्या सारखे वाटतेभारताची मान ताठ रहावी या करता आपण काय करतो याचा आपण विचार करून नंतर अमेरिकेचा निषेध करावा.

Friday, August 14, 2009

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार

स्वाइन फ्लू आधुनिक मार्केटिंग चा आजार. जनतेचे महागाईं , पाकीस्तान समोर गुडघे टेकवणे या कडे दुलॅक्ष व्हावे म्हणुन सरकार ने मीडीया ला हाताशी धरून हा स्वाइन फ्लू चा प्रचार केला. मी ३ दिवस मुंबई मधे फिरलोपण जणते मध्ये १% टकऽका लोक मास्क लावुन फीरताना दीसले नाही. स्वताला विकण्या साठी याना कधी राखी सावंतचे न लागलेले लग्न तर कधी दाउत ; अस्तित्वात नसलेले प्रश्न लागतात. डॉक्टर बंगदांपत्याने बालकांचा कुपोषणा कीतीही पोटतिडकीने , सत्य सांगितले तरी शासनाचे लक्ष नसते. कीतीही शेतकरी आत्महत्या करु द्या राजकारणी हालत नाही. आजचा गोविंदा पाहील्यावर जनतेत कोठेही घबराहट नाही हे स्पष्ट दिसते. यावरचर्चा आवश्यक आहे.

Monday, August 3, 2009

सरकारने आपल्या या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे

१७ वर्ष एकच भावाने गैस पुरवठा करावा या करता दोन भावात कोर्ट कचेरी चालू आहेरोज भाव बदलत असतानाखाजगी करारा वरून कोर्टाचा देशाचा वेळ ख़राब केल्या बद्दल कोर्टने अनिल याला जबरदस्त दंड आकरावाजनहिता करता देशाची राज्य घटना बदलली जाते ,हा तर दोन भावमधिल करार आहेआणि अनिल तरी १७ वर्षएकच दराने माल पुरवठा करेल काय? एन टी पी सी ला ३०००० हजार कोटीचा तोटा होणार म्हणुन मगरीचेक्राशु काढून देश हिताचा आव अनिल आणतआहेआणि सरकार कांग्रेस पक्ष या दोन लाबडाच्या भानामाकडाची भूमिका बजावुन लोणी खात आहेजमिनीच्या फुटा खालील सर्व गोणखानिजाची मालकीसरकारची कायद्याने आहेकार्पोरेट करार करून समोरच्या व्यवसा करणार्याला अड़चणित आनने , हा यांचा धंदा आहेसरकारने आपल्या आधिकराचा वापर करून या कंपन्या चे राष्ट्रीयकरण करावे .

Saturday, July 11, 2009

ऐ .टी .के टी .असा निर्णय गेल्या दहा हजार वर्षात कोणी घेण्याची हिम्मत केलि नाही

शिक्षण क्षेत्राची अधोगति करणारा असा निर्णय गेल्या दहा हजार वर्षात कोणी घेण्याची हिम्मत केलि नाही, आणि पुढील दहा हजार वर्षात घेण्याची कोणी करणार नाही । असा हा एतिहासिक निर्णय घेतल्या बद्दल कोतुक करायचे की , डोक्यावर हात लावायचा या संभ्रमात आज आपण पडलो आहोत। भारतात राजकारण, गुतैदारी, आणि शिक्षण हे तीन क्षेत्र असे आहेत की जेथे काम करण्यास कोणत्याही प्रकारची पात्रता लागत नाही। बहरे चमन उजड़ने को एक उल्लू काफी है । यंहा तो हर डाल पर उल्लू बैठा है। यात बदल करून यंहा हर सत्ता के खुर्सी पर उल्लू मंत्री बैठा है।

Sunday, July 5, 2009

पराभूत मनोवृतीवर हाकिम लुकमान के पास भी दावा नही .

मतदान यंञात चुक असु शकेल हे मान्य करुन देखील भाजप ची मागणी
पराभवाच्याभीती मुळे निर्माण झाली , हे स्पष्ट होते. आणि पराभवाच्या मनोवृतीवर
Hakim Lukman ke pass bhinahihai.औषध . आणखी एक या मशिन अमेरीकन
मशिन पेक्षा चांगल्या आहेत म्हणुन अनेक देशात यांची निर्यात होते. इंदिरा गांधीच्या
काळत
सुध्दा विरोधकांच्या चिन्हावर
मारलेला ठप्पा गाय-वासरू वर पडतो. असा आरोप यांनीच केलाहोता.

Thursday, July 2, 2009

ऑनलाइन च्या बेजबाबदार वापरास कोण जबाबदार ?


मुंबई तील ऑनलाइन परीक्षेचा गोंधळ याची चर्चा महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रात चालू आहे पण हा गोंधळफक्त मुंबई तील विद्यार्थ्रायाना त्रास झाला म्हणुन चर्चा चालू आहे, हे कटु सत्य आहे . आज नोकरी पासून ते, शाला कॉलेज प्रवेश ऑनलाइन झाले। ग्रामीण भागातील विद्यार्थी हा त्रास गेल्या वर्षा पासून सहन करत आहेत, त्यानी पेपरवाल्या कड़े अनेक तक्रारी केल्या , पण आपल्या स्थानिक वार्ताहर कडून केराची टोपली दाखवन्यात आली . कारण राजकारना पलीकडे समाज आहे त्यांचे आपण देणे लागतो आपली बांधिलकी समाजा बरोबर आहे ही गोष्ट वार्ताहर विसरले आहेत। आज मुंबईत फॉर्म भरण्यास मार्गदर्शक आहेत ।फॉर्म मराठीत आहेत . ग्रामीण भागातून अग्रिकल्चर कॉलेज मध्ये प्रवेश घेनारया विद्यार्थ्या करता फॉर्म माहिती पुस्तक मात्र इंग्रजीत होते। कॉलेज मधे माहिती देण्यास कोणीही अधिकारी नव्हता। मराठीत देता येणार नाही , इंग्रजी येत नाही म्हणुन तिरस्कराने पाहिले जात होते. फॉर्म भरण्या साठी ऍम के सी ने मागणी करून सुद्धा मराठीत माहिती पुस्तक देण्याचे नाकारले।इंग्रज गेले तरी गुलामीची वृति गेली नाही. ग्रामीण भागात इंग्रजी फॉर्म आणि मुंबई मधे मराठी फॉर्म या वरून इंडिया आणि भारत हा भेद स्पष्ट होतो।
ही एकच अड़चन होती तर ठीक , पुढे बैंक हा एक अड़थला मोठाहोता। १०० -२०० रुपयाच्या ड्राफ्ट साठी बँकेत अकाउंट असने आवशक केले गेले विदार्था चे अकाउंट नसणार हेमाहित असून देखील बंकानी ही अड़वनुक केली.आज स्टाफ नाही, ड्राफ्ट पुस्तक संपले आहे दूसरी बैंक बघा अशीअनेक कारने देऊन बन्कानी विद्यार्थ्याचा छल केला यात भर पडली ती सेतु कार्यालयाची , विविध सरकारी दाखले देणारे सरकारी अधिकारी जागेवर नव्हते
बैंक ऑनलाइन ची अवस्था आणखी वाईट झाली आहे नोकरी अर्जा साठी बैंक ऑनलाइन -- घंटे उघडत नव्हत्या याला कोणी वाली नव्हता कांही बंकानी फ़क्त आपल्याच बन्कचे ड्राफ्ट पाहिजे चालान आमच्याच बैंककेत भरावे अश्या जाचक अटी लागु केल्या। यामुले विद्यार्थास १५० -२०० किलोमीटर रेलवे प्रवास करून त्यांच्या बँकेत चालान भरावे लागले याकरता दिवस आणि २००-४०० रुपये खर्च झाले , पण याचे कोणाला सोयारेसुतक नव्हते यावरून कॉमप्युटर कसे वापरावे याचा धड़ा आपण अजुन शिकलो नाही हे जाणवते। ऑनलाइन करता आवश्यक असणारे सर्वर उपलब्ध नसताना ऑनलाइन चा हव्यास का?

Wednesday, July 1, 2009

दिल्ही मधील माहिती कमिशनर हे ख़ुद या कायद्या विरोधी आहेत

शेतकर्या च्या कर्ज माफीचा नावा सह जाहिर याद्या प्रकाशित करणारे सरकार आणि आर .बी. आई . बैंक मोठ्या उदोग्पतीची करोडो रुपयांची माफ़ केलेली कर्जे जाहिर करत नाही। खरे तर या उद्योग्पतिची कर्जे फेडन्याची शमता आहे। पण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टचार करुन ही कर्जे माफ़ केलि जात्तात। सामान्य जनतेस कर्जा करता रस्त्यावर आनन्याची भाषा करणार्या बैंक मोठ्या समोर घुड़गे टेकवतात । माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तर आर .बी. आई . बैंक ही माहिती दिली तर देशास व् बैंकिंग उद्योगास धोका होईल । या कारना साठी माहिती देत नाही। या कर्ज माफ़ी मधे हर्षद मेहता, केतन पारीख या सारखे जनतेस लुबाड़नारे सटेबाज जसे आहेत तसे सरकारी सवलती घेउन उद्योग करणारे उद्योगपति ही आहेत। या सर्व भानगडी बाहेर येऊ नये म्हणून सरकार व् नोकरशाही या कायद्यावर बंधने आनु पाहत आहे। या सर्वा वर कड़ी म्हणजे
दिल्ही मधील माहिती कमिशनर हे ख़ुद या कायद्या विरोधी आहेत। इस कायदेसे कुछ होने वाला नाही,भारतीय लोग क्यूँ मालूमात लेना चाहते हे उन्हें कुछ मालूमात मिलनेवाली नहीं। आप लोग वक्त बर्बाद कर रहे हे । जर ही अवस्था असेल तर देव सुधा, कांही करू शकणार नाही। विरोध केलाच पाहिजे

Friday, June 26, 2009

अंधेरी नगरी चोकट राजा असा कारभार आहे .

mkcl नव्हे तर online च्या सवॅ साईट अत्यंत धीम्या आहेत. फक्त मुबईत नव्हे. मुबईत
फामॅ मराठीत आहे. माञ खेड्यांपाड्या तुन agri college चे फामॅ भरणार्‍यां विद्याथौना मराठीतुन
माहीती पुस्तिका देण्यास नकार mkcl ने दीला . या मुळे विद्याथौची अत्यत परवड झाली. त्यात
विद्यापीठानी मागॅदशॅन करण्यास नकार दीला, आणि अखेर बैकानी DRAFT देण्यास नकार दीला .
या सवॅ प्रकारास शासन जबाबदार आहे. बैकाना DRAFT नाकारण्यांचा हक्क कोणी दीला. RBI कडे
तक्रार केली तर RBI म्हणते आम्ही बँकावर DRAFT देण्याची सक्ती करु शकत नाही. अंधेरी नगरी
चोकट राजा असा कारभार आहे
.

Saturday, June 20, 2009

आणि आंतकवाद करन्यास पाक सरकारला परवाना मिळाला


चारों उंगलिया घी में और सर कढाई में, किंवा खुदा देता है तो छपर फाड़ के देता है , अशी पाकिस्थान ची सध्याअवस्था आहे । ओबमाने हजारो करोड़ डालर मदत अतिरेक्य्ना ख़तम करण्या साठी दिली आहे.त्यातच अमरिकेचा वाइस असलेल्या हिस मास्टर'स वाइस ने मनमोहन ने भारता कडून अतिरेक्याना ख़तम करण्या साठी सर्व मदत पकिस्थानला करण्याचे वचन दिले आहे। पाक च्या कोणत्याही राजकर्त्याला जमले नाही ते १०% वाल्या झरदारिला जमले। आणि आंतकवाद करन्यास पाक सरकारला परवाना मिळाला।

Thursday, June 18, 2009

ekach


Saturday, June 13, 2009

भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते

आई बाप खाउ घालु शकत नाही आणि समाज भीक मागु देत नाही, अश्या वेळी गरीबीत जन्मलेली
मुले घराला आथौक हातभार लावण्या साठी कामगार बनतात. अश्या वेळीसरकार काही करु शकत नाही.
आणि भंपक समाज सेवकाच्या दबाब तंञा ला बळी पडुन अविचारी; अतिरेकी कायदे सरकार करते आणि
या कायद्याचा दुरउपयोग करुन नौकरशाही जनतेस वेठीस धरून भ्रष्टाचार करते; बाल मजुर
आहे तिथेच रहातात. यापेक्षा अश्या बाल कामगाराच्या शिक्षणाची , त्याच्या जेवण, कपड्याची,
कामाच्या वेळे बाबत कडक
कायदे अंमलबजावणी यंञणा उभी करावी. नाही तर या बाल मजुराना
गुन्हेगारि
कडे वळविण्याचे
पा आपणास लागेल. यावर केवळ चचौ नव्हे तर ठोस अंमलबजावणी
आवश्यक आहे .सुज्ञानी
विचार करावा,,,,,,,,,,,

सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन ऊभे केले पाहीजे.

अणु करारा सोबत मनमोहनने आपले स्वातंञ्य सुध्दा अमेरीके कडे गहाण टाकले हे
सिध्द झाले आहे. मनमोहन लाचार चेहर्याने त्याचे स्वागत करतील. आता जनतेनेच
सायमन चले जाव च्या धरतीवर अमेरीका चले जाव चे आंदौलन ऊभे केले पाहीजे.
ओमाबा आले काय बुश काय अमेरीका पाकीस्तान चेच जोडे उचलणार; हे ओमाबाच्या
वागण्या वरुन सिध्द झाले. सध्या १०० दीवंसाचा मिडीयाचा सरकार बरोबर हनीमुन चालु असल्या मुळे
मीडीया या विरुध्द आवा१जऽऽऽ उठवेल काय ?????

Friday, June 12, 2009

खासदार निधि 'कॅग चा अहवाल

'कॅग' ने या खासदरनी निधी वापरल्या बद्ल जे तशोरे ओढले त्या आधी जी रक्कम खासदारा नी
वापरली त्याची आणि केलेल्या कामाची , निकॄष्ठ कामाची , टक्केवारीची काम करणार्‍यां गुत्तेदाराची
चौकशी केली असती तर नक्कीच कँग ने निधी अश्या गेरमार्गा ने वापरल्या बद्दल या खासदारान चे
जाहीर अभिनंदन केले असते.खासदारानी वापरलेल्या खासदार निधी चे आँडीट कायद्याने
बंधनकारक करावे.

Thursday, May 7, 2009

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण फिरते आहे

जनता पिण्याच्या पाण्या साठी ऊन्हात वणवण स्वातंञ्याच्या ६० वषँा नंतर ही फिरते आहे . आणि १५ दिवसाच्या प्रचारात हे नेते दमले. हे काय देश चालवणार. आज यांच्या नाकरटेपणामुळे जनतेवर हा बिकट प्रसंग ओढवला आहे. पण म्हणतात ना सत्तातुराम भय ना लज्जा !! या देशात आणीबाणी च पाहिजे. म्हणजे नोकरशाही , राजकारणी सुता सारखे सरळ होतात.शरद पवार दक्षिण आफ्रिकेत आयपीएलचा आनंद लुटत आहेत. याना पंतप्रधान करा म्हणुन राष्ट्रवादीचे नेते याञा करत आहेत, या पेक्षा यानी जनतेच्या पाण्याची सोय केली असती तर जनतेचे आशीवौद तर मिळाले असते !!!!

Wednesday, May 6, 2009

राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.

अदनान मदतकरणार्या राजकारणी व नोकरशाही ला व समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे.

असे कीतीतरी अदनान भारतात आहेत. कलेच्या , क्रीकेट खेळाच्या नावाने पैश्याच्या लोभाने कांही पेजवर आणि टी. व्ही वर चमको असलेले महाभाग कलाकाराच . कलेेचे स्वातंत्र्य यावर भाषणेठोकतात ; देश्याच्या हीताशी याचे काही घेणे-देणे नसते. अश्या लोकां मुळेच शञुला आपण गेट-वेआँफ इंडीयाची दारे मोकळी करतो. या करता आपले मेभळट, कणा हीन शासन जबाबदार आहेत .अदनान मदतकरणार्या राजकारणी नोकरशाही ला समथॅकाना फाशी जाहीरपणे दीली पाहीजे

Tuesday, May 5, 2009

राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.

ओबामा म्हणतात, ‘भारतीय हटाव,!
ओबामा जे अमेरीकेत धोरण अमलात आणु शकतात, आणि भूमीपुत्राला न्याय देऊ शकतात
ते धोरण राज महाराष्ट्रात अमलात आणू पाहतात तर मतलबी उतर भारताचे नेते राजलाच
देशद्रोही ठरवून खोटे खटले दाखल करतात हेच या देशाचे दुदॅव आहे.. आणि ओमबचे काहींच
चुक नाही. स्वदेशातील नागरीकाच्या तोंडातील घास ग्लोबालायज़ेशन च्या नावाखाली हिरवुन
घेऊन आणि कोट्यावधी रुपयांचा टॅक्स बुडवणाऱ्या कंपन्यां करता जनतेने ओमबाना निवडून
दिले नव्हते . आज भारतात; उतर भारताचे नेते जनतेला स्वताच्या गावाकडे रोजीरोटी भूमीपुत्राला देण्यात अपयशी ठरल्या मुळे खोट्या देशप्रेमाच्या नावाखाली भारताला विघटना
कडे नेत आहेत . राज हे महाराष्ट्रा चेच नव्हे तर भारताचे ओमाबा आहेत हे सत्य आहे.
--
THANTHANPAL

Sunday, May 3, 2009

तेंव्हा कोठे गेला होता राम जेठामानाली तुझा धर्म

THANTHANPAL,PARBHANI,म्हणतात:राज ने सत्य सांगितले तर, आयुष्य भर खोट्याचे खरे करण्यात आणि समाजकंटकांची वकीली करण्यात गेलेल्या राम जेठमनालीला एवढेच सांगावे वाटते . तेंव्हा कोठे गेला होता राधासुता धमॅ. राज तूझे सलाम !! ९०% बेईमान असलेतरी राज तुझ्यामुळेच मेरा देश महान आहे !!!!!!!

Saturday, May 2, 2009

पायलटच्या डुलक्या आश्‍चॅय काहीच नाही

विमान चालवताना पायलटच्या डुलक्या आश्‍चॅय काहीच नाही. १०० कोटी जनतेची जबाबदारी असणार्‍या ज्या देशाचे पंतप्रधान मंञीगण संसदेत सावॅजनिक कायॅक्रमात चक्क डुलकऽया घेत असतात तेथे ५००-४०० प्रवाश्यांच्या जीवनाची जबाबदारी असणार्‍या पायलटने डुलक्या काढल्या तर फारसा फरक पडत नाही. फक्त प्रवाश्यांबरोबर पायलट चा मृत्यु अटळ आहे ; माञ जनतेचा मृत्यु होताना नेत्यांना काहीच होत नाही. हेच खरे दुख: आहे,

Friday, May 1, 2009

मराठी लोक काही तामिळ कन्नड बोलणार नाही .

केवळ. विदभँच नव्हे तर विकासाच्या दॄष्ठीने मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र, आणि उरवँरीत महाराष्ट्रा ,
मुबई अश्या राज्यात महाराष्ट्राचे विभाजन करावे. उगीच ईतिहासाला कवटाळुन बसण्यात अथँ
नाही. पंजाब चे.विभाजना नतर हरीयाणा, हीमाचल प्रदेशाचा जलद विकास झाला. हे सत्य आहे.
आज पश्चिम महाराष्ट्राच्या दादागिरी मुळे ईतर भागाचा विकास झाला नाही हे शासकीय अवहाला
वरुन स्पष्ट होते. राहीला मराठी भाषेचा प्रश्‍न . वेगळी झाल्यावर हया राज्यातील लोक काही तामि
कन्नड बोलणार नाही .

ही पदके सन्मानांचा मान राखण्यासाठी परत घ्यावी.

शासकीय सन्मान हे देशासाठी निस्वाथै कायै करणारासाठी असताना केवळ पैशासाठी
कीऱ्केट खेळणार्‍या धंदेवाईक खेळाडूला देऊन राजकारण्यांनी या सन्मानांचा अपमान ेला.
आणि धंदेवाईक खेळाडुनी गेरहजर ाहुन आपण देशापेक्षा धंद्दाला ास्त महत्त्व देतो; हे
दाखवुन दीले. शासनाने अपमान केल्या बद्दल ही पदके सन्मानांचा मान राखण्यासाठी परत घ्यावी.

मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे

मतदान न करणे म्हणजे आपल्या पायावर आपणच दगड पाडून घेणे होय. मतदान केले नाही तर
तुम्हाला तक्रार करण्याचा आधिकार नाही.मतदानाचा ह्क्क न बजावणे हा राष्ट्र द्रोह आहे. केवळ ताज समोर मेणबत्या लावून,मूक मोर्चा काढून, टी. व्ही. समोर आक्रोश करून सरकारला दोष देऊन व्यवस्था बदलणार नाही. 5 वर्षातून फक्त 10 मिनिट जर आपण मतदाना करता देत नसु तर आमचे रक्षण देव,आल्लाह , येशू सुद्धा करू शकनार नाही. तेथे ह्या नेत्यांचा काय भरवसा हे लोक देश कधी विकून टाकतील हे समजनार नाही.

Saturday, April 25, 2009

क्या मै बुढीया लगती हूं.

क्या मै बुढीया लगती हूं.
क्या मै बुढीया लगती हूं. प्रीयंकाची ही भाषा ऐकुन निवडणूकीतील प्रचाराची पातळी पाहुन हे सवॅ ऐकणे पाहणे सहनशीलतेच्या पलीकडे असल्याने जवाहरलाल नेहरुच्या लडन मधील पुतळ्यांने स्वत: आत्महात्या केली. आणि स्वत: नेहरु जर प्रत्यक्षात जिवंत असते तर त्यानीही प्रत्यक्ष आत्महात्या केली असती यात शका नाही
कम्युनिस्टांवर टीका करताना मनमोहनचा नोकरशाही स्वभाव स्पष्ट होतो. आज मंदीत ही
भारतीय बँका मजबूत आहे त्याचे श्रेय इंदीरा गांधीनी केलेल्यां बँक राष्ट्रीयकरणाला जसे जाते
त्या पेक्षा जास्त श्रेय कम्युनिस्टांनी गेल्या ५ वषॅ मनमोहन चिदंबरम या अमेरीका धार्जिन्या
पंतप्रधान व अथैमंत्र्या वर ठेवलेल्या अंकुशला जाते. कम्युनिस्ट नसते तर यानी अमेरीकेला
देश विकला असता. हे कम्युनिस्टांचे शञु देखील मान्य करतील. जय हो .

या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे.

राज मराठवड्यात शेतीला पाणी मिळावे आणि जनतेला पिण्यास पाणी मिळावे मन्हुण शकरराव चव्हान
यानी पशिम महाराष्ट्राच्या मतलबी राजकारण्याचा विरोध पत्करून जायकवाडी धरण बांधले. पण या पाण्याचा
उपयोग शेती आणि जनतेला पाणी तहान भागवण्या पेक्षा बाटालिंग प्लँट साठी जास्त प्रमाणात झाला हे कटू
सत्य आपण मांडले हे लक्ष्यात घेता ईतर राजकारण्याना लाज वाटावयास पाहिजे. या प्रश्ना कडे कोणीही लक्ष्य
देत नाही. केवळ बाटालिंग प्लँट साठी या पाण्याचा उपयोग होत नाही तर बियर करण्या साठी याचा उपयोग होतो.
कारण जायकवाडीचे पाणी म्हणे बियर तयार करण्यास सर्वोतम आहे. सरकारला बियर पासुन करोडचा टॅक्स मिळतो
यासाठी सोन्या सारख्या पाण्याचा दुरुपयोग होतो आहे, याची खुद्ध शकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री आसलेल्या
मुलालाही काळजी नाही. जनतेचे नक्की काय प्रश्‍न आहेत याची जान आजच्या राजकारण्यात नाही. एक दिवस तू
या बेशरम राजकारण्याना व नोकरशाहीला सुता सारखा सरळ करशील हे नक्की आहे. आता सरकार आणि निवडणूक आयोग झोपले आहेत का ? राज जरा बोलला तर राज च्या नावाने शिमगा करणारे कोठे गेले. अमेरीकन ओबामा ने सुध्दा परीथ्सिती हाता बाहेर गेल्यावर परकीयोनवर बंधने आणली. राजच्या नावाने बोबंलण्या पेक्षा आपल्या राज्याची सुधारणा करा. आझमीला ; जयाला उत्तर प्रदेश्यात कोट्यावधीची माया जमवता आली असती का ? राज हा महाराष्ट्रांचा ओबामा नाही तर ओबामा हे अमेरीकेचे राज ठाकरे आहेत. अबू , राजने तिसरा डोळा उघडला तर चणे येथेच टाकुन युपी ला पळाव लागेल.

Friday, April 10, 2009

लातौके भुत बातो से मानते नही

२५-२५ वर्षा नंतर सूध्दा न्याय मिळत नसेल तर सामान्य माणसाने दुसरे काय करावे अशी आपली अपेक्षा आहे। जन्ररल भिंदरवला चे भूत कॉंग्रेसनेच निर्माण केले होते. जनावरे कतलखाण्यात जनावरे कापताना थोडे पाणी तरी पाजवले जाते त्या पेक्षा जास्त अमानुष पणे सरदारजी लोकांचे खून करण्यात .या देशाच्या न्याय पालिकेवर लोकांचा विश्वास राहिला नाही हे सत्या नाकरणारे मगरी चे नक्रॠ ढाळत आहे. सरदारजीनी जे दुखः भोगले ते न्यायालयाचा अपमान झालाम्हणुन उर बडवणार्‍यां उच्चभ्रू समाजाला काय माहीत.
पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकीची शिक्षा जगदीश टायटलर आणि सज्जन कुमार यांना मिळाली याचा अथॅ लातौके भुत बातो से मानते नही. न्यायालय जो न्याय गेल्या २५ वषॅ करु शकली नाही तो न्याय पत्रकार जर्नेल सिंग यांच्या बूटफेकी ने एका मिनीटात केला. धमॅनिरक्षेपता चा जय हो म्हणणार्‍या काग्रेसचे हात सुध्दा स्वबाधंवाच्या रक्ताने माखले आहेत हेच सिध्द होते. मनमोहनने आता तरी बोध घ्यावा . नागरीका जागा हो .आतातरी मत विकु नको. CBI चा गेरवापर केल्याचे काय दुष्परीणाम होतात राजकारण्यानी लक्षात घ्यावे. अखरी जनतेचे जय हो......