Translate

Saturday, May 29, 2010

मुंबई मिळाली, महाराष्ट्र हरवला!

महाराष्ट्रची 'वाट'चाल : मुंबई मिळाली, महाराष्ट्र हरवला! Bookmark
 and Share Print E-mail
कुमार केतकर , रविवार, २५ एप्रिल २०१०
येत्या १ मे रोजी महाराष्ट्राच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. कोणत्याही राज्याच्या विकासात अर्धशतकाचा कालखंड तसा मोठाच असतो. त्यातही ज्या राज्याच्या निर्मितीसाठी मोठे आंदोलन उभारले गेले, त्याच्या प्रगतीकडेही अपेक्षेने पाहिले जाते. महाराष्ट्राचे गेले अर्धशतक मात्र केवळ निराशेने झाकोळलेले आहे. राज्याच्या भौतिक प्रगतीची चार चाके म्हणविल्या जाणाऱ्या कृषी, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि आर्थिक धोरणे या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचा आलेख सतत उतरता आहे. राज्यकर्त्यांनी या चार चाकांच्या गाडीचे सारथ्य करताना विकासाची दिशा आणि वेगाचे भान न राखता केवळ स्वतचीच प्रगती साधली. त्यामुळे गाडी भरकटली आणि चाके निखळली. महाराष्ट्राच्या या सुवर्णमहोत्सवी ‘वाट’चालीचा हा ‘पंच’वेध घेतलाय- बुधाजीराव मुळीक, प्रभाकर (बापू) करंदीकर, अशोक दातार, अशोक हरणे आणि कुमार केतकर यांनी!

Tuesday, May 25, 2010

ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो!!!

अंधेर नगरी चौपट राजा, टका शेर भांजी टका शेर ख्वाजा. हजारो साल पुरानी  कहावत आपल्या महाराष्ट्र सरकारला लागू होते हे. आजच्या १२ वी च्या निकालाने सिद्ध झाले. जुन्या मंत्र्या पेक्षा कांही तरी नवीन करण्याच्या नादात कालचा गोंधळ बरा होता म्हणावयाची वेळ आली. शहरात आज निकाल मिळाले पण ग्रामीण भागाला निकाल ८-१० दिवसांनी मिळणार आहे.
महाराष्ट्रा फक्त मुंबई,पुणे येथेच आहे या दृष्टीकोनातून सर्व निर्णय राबवले जात आहे मुलांचा सत्यानाश व्हायचा तो टाळत नाही. १२विचा निकाल जाहीर करण्याची लगीन घाई करते वेळी खेड्या-पाड्याचा विचार ग्रामीण भागातून निवडून आलेला राजकारणी सुद्धा करत नाही हे या देशाचे दुर्देव्य आहे, हा नेता मुंबईच्या चमकोगीरीला भुलून स्वत;च्या मतदाराला विसरून जातो. आणि महमद तुघलक हा राजा बरा असे वाटते.
हा निर्णय घेण्याच्या आधी संगणक सर्व दूर राज्यात आहेत का याचा विचार झाला?
हे संगणक चालवण्या साठी पुरेशी वीज आहे का?
या दोन्ही गोष्टी नसताना आणि निकालाच्या प्रिंटींग चे काम झाले नसताना हा उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग बांधण्याचा प्रकार कसा घडला. लाखो रुपय पगार खाणारी भ्रष्टाचार करणारी नोकरशाही, नेते  कश्या करता आपण पोसत आहोत. 
बर ह्या निकालाचा कांहीच फायदा शहरी लोकांना सुद्धा झाला नाही.  शाळेतून ORIGINAL  गुण पत्रिका मिळत नाही तो पर्यंत या जाहीर झालेल्या निकालाचा कांही फायदा नाही. त्या घ्यावयाच लागणार. नंतर प्रवेशाची  सर्व कामे सुरु होतील  वीज पाणी याबाबत आता पर्यंत शहरी आणि ग्रामीण असा भेद सरकार करतच आली आहे. आत्ता शिक्षणक्षेत्रात ही हा भेद सुरु झाला. हा भेदभाव नेहमीच होतो. कोणताही शेक्षणिक प्रकल्प सुरु करायचा झाले तर मुंबई,पुणे गेला बझार औरंगाबाद,या विकसित शहरातच होतो. आणि वर राज्याचा मुख्यमंत्री हतबल होवून म्हणतो ग्रामीण भागात शासकीय कर्मचारी जात नाही. आणि मुर्खा सारखे कारण देतो. ग्रामीन भागात मनोरंजनाच्या ,मॉल च्या सुविधा नसल्याने तेथे कर्मचारी जात नाही. कर्मचारी जर ऐकत  नसतील तर नोकरी वरून काढून टाका ना .जनतेने त्या करताच तुम्हाला निवडून दिले.. नाहीतर एक दीवस तुम्हाला घरी बसावे लागेल.
गुणवान यादी चे सुद्धा असेच. तळागाळातील , बहुजन समाजातील, ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवान यादीत येवू लागली तर मुलांच्या कोवळ्या मनावर वाईट परिणाम होतो म्हणून गुणीजनाची यादीच रद्द केली.इतके दीवस यांची मुले यादीत झळकत होती तेंव्हा यांना बालमनाचा विचार आला नाही. असो हा कोळसा काळा तो काळा.
ताजा कलम:- जाता जाता मुख्यमंत्री आणि गुणवत विद्यार्थी यांचा कांही संबध आहे का या वर कोणी तरी Phd करावी.कारण विलासरावांचे मुख्यमंत्री गेल्या बरोबर लातूर पटर्ण चा बोऱ्या उडाला आणि निकाल चा निक्काल लागला. याच बरोबर आता हा शेक्षणिक विकास नांदेड कडे सरकला . या योगायोग का आणखी कांही याचा आपणच विचार करावा मांडावा.
                                       ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो!!!

Thursday, May 20, 2010

बलात्कार,खून राजकारण्यांची दगाबाजी या बातम्या सकाळी उठून वाचून मन खराब करण्या पेक्षा

बंगल्याला नाव देऊन 'ऍग्रोवन'बद्दल कृतज्ञता
सातोना (जि. जालना) - एखादे वृत्तपत्र कोणाच्या आयुष्यावर किती प्रभाव पाडू शकते, त्याचे पूर्ण आयुष्यच बदलण्याचे सामर्थ्य वृत्तपत्रात असते काय, या प्रश्‍नांचे उत्तर आहे, "होय!' "ऍग्रोवन'चा नियमित वाचक असलेल्या बाळासाहेब बिडवे यांचे आयुष्य या दैनिकाने बदलले आहे. काही वर्षांपूर्वी हजारांत कमाई करणारा हा शेतकरी आता लाखांत उत्पन्न मोजू लागला आहे. "ऍग्रोवन'मधून मिळालेल्या ज्ञानाप्रती कृतज्ञता म्हणून या शेतकऱ्याने आपल्या नव्याने बांधलेल्या घराचे नाव ठेवले आहे, "ऍग्रोवन!' अवघ्या कुटुंबासह जाणतेपणाने आणि नियोजनबद्धरीत्या शेती करणाऱ्या सातोना येथील बाळासाहेबांची ही यशोगाथा महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरावी!
On 5/20/2010 5:13 PM thanthanpal said:
बलात्कार,खून राजकारण्यांची दगाबाजी या बातम्या सकाळी उठून वाचून मन खराब करण्या पेक्षा मी स्वत शेतकरी नसून सुधा सकाळी उठल्या उठल्या प्रथम अग्रोवन वाचतो.आजच्या अंधकारमय जगात शेतकरी परिवारांच्या विकासाच्या, मेहनतीच्या बातम्या वाचल्या तर सकाळ मंगलमय होते जगण्याची उम्मीद निर्माण होते.आज मी ५० च्या पुढे आहे.शेती करण्याची जिद्द मात्र अग्रोवन मुळे आली.आणि मी नक्कीच शेती करेन.मनात एक विचार नेहमी येतो. जर शेतकऱ्याने संप करून शेती उत्पादन बंद करावे म्हणजे या सर्व मस्तवाल लोकांचे डोळे उघडतील .शुभ
Thursday, May 20, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: agrowon,   agriculture,   snn,   jalna


आनंद गाडे : सकाळ न्यूज नेटवर्क

Saturday, May 15, 2010

यांच्या क्रांतिकारक विचारांचा पुढे आपण किती मागासलेले आहोत हे समजते. आज परत एकदा अशा विचारवंतांची गरज आहे.

आजच एका समाजसेवी संस्थे कडून एक मेल आला.   महाराष्ट्रात महिलावरील अत्याचार नवीन नाही. आपण सर्व महिलाच सन्मानासाठी, त्यांचा न्यायासाठी काम करत आहोत. कुटुंब अर्थ सहाय्य योजना विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे. तुमचे आमचे लक्ष नसल्यामुळे कोट्यावधी रुपयाची योजना धूळखात पडून आहे. तुम्ही जरा लक्ष दिल्यास हजारो विधवा महिलांना न्याय मिळणार आहे. एकेका जिल्ह्यात २-२- कोटीचे अनुदान शासकीय कर्मचार्यांच्या लालफिती गलथान कारभार मुळे गेल्या ५ वर्षा पासून पडून आहे. भ्रष्ट्र नोकरशाही ला  याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत.  मनात विचार आला...... 

Friday, May 14, 2010

‘पद’, ‘पैसा’ आणि ‘प्रतिष्ठा’ या ‘प’च्या बाराखडीत अडकलेल्या पालकांच्या प्रबोधनात्मक रायगड “ चला मुलांना घडवू या!”

आमचे ब्लॉगर स्नेही  डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर बालरोग तज्ञ महाड हे डॉक्टर कमी समाजसेवक जास्त असे आहेत . आजच्या कट प्रक्टीसच्या च्या जमान्यात असे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे हा या अवलिया डॉक्टरांचा शालेय शिक्षणा पासून छंद. ब्लोग्स च्या निमित्ताने यांची ओळख झाली.आणि हा माणूस आजच्या डॉक्टरकीच्या व्यवसायात  चुकून आला असे वाटते.व्ययक्तिक रोग पेक्षा सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते. आणि नुसती काळजी करून थांबत नाही तर या रोगावर विलाज करण्या साठी गेली २५ वर्षे ते महाड सारख्या चवदार तळ्याच्या सामाजिक कार्याची परंपरा असलेल्या गावात कार्य करत आहेत. हा एक योग योगच म्हणावा लागेल.
पु.ल च्या सामाजिक कार्या मागे ज्या प्रमाणे कडक दुर्गा सुनीताबाई यांचे पाठबळ होते तसेच पाठबळ डॉक्टरांच्या नेत्ररोग  तज्ञ पत्नी  सुजाता वहिनींचे पाठबळ या बालरोग  तज्ञ बालकास लाभले असे म्हंटले तर ते योग्य ठरेल. व्यासायिक आणि कोटुंबिक या दोन्ही आघाड्यावर या वाहिनिंचाच मोठा सहभाग आहे. हे स्वत: डॉक्टर देखील मोठ्या मनाने मान्य करतात. असो अश्या या डॉक्टरने रायगड जिल्ह्यात आपल्या  मित्रांच्या मदतीने " चला मुलांना घडवू या" याचा आदर्श वस्तुपाठ ‘रायगड पोलीस’ आणि ‘अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटना’  घालून दिला त्या निमित्ताने हा प्रपंच आपणा समोर मांडत आहे. 
 आणि महत्वाचे डॉक.स्वतःhttp://drkidsblog.blogspot.com/ या BLOG द्वारे बालक आणि त्यांचे प्रश्न त्याही पेक्षा पालकांचे प्रश्न यावर मार्गदर्शन सोप्या मराठी इंग्रजी हिंदी अश्या जमेल त्या भाषेत  करणार आहेत.

Thursday, May 13, 2010

"dogs who lick the feet of the Congress"

गडकरीआपणास  माफी मागावयाची होती तर समस्त श्वान जमातीची मागायची होती. या दोघांना श्वानाची उपमा देवून आपण समस्त प्रामाणिक, विश्वासू म्हणून जगात प्रसिद्ध असलेल्या प्राण्यावर अन्याय केला आहे. या प्राण्यांना हे समजले तर ते समस्त मानव जातीस हानिकारक  आहे. हे दोघे जण  जीवनभर यांना निवडून दिलेल्या मतदाराशी, जनतेशीच बेईमान झालेले आहेत.मग यांच्यात श्वानांचा कोणता गुण आपणास दिसला की , आपण लालू,मुलायम यांना कुत्रे असे संबोधन केले असे श्वानांनी आपणास विचारले आहे. कृपया आपला जबाब आपण त्वरित द्यावा.
आजच जंगला मध्ये सर्व प्राणिमात्रांची सभा राजे सिंह यांच्या अध्यक्षते खाली भरली होती.आम्ही जंगलात राहतो पण आमच्या येथे तुमच्या सारखी  भ्ररष्ट लोकशाही नाही. या सभे मध्ये आपला प्राणीमात्र कडून निषेध केला गेला आणि आपल्या सारख्या नेत्या कडून श्वानाचा अपमान केल्या मुळे राजीनाम्याची मागणी केली आहे. जर आपण राजीनामा दिला नाही तर भाजपच्या नागपूर आणि दिल्ही मुख्य कार्यालया समोर रात्रंदिवस मोन पाळून निषेध करण्यात येईल .

Tuesday, May 11, 2010

मेरा भारत महान!!

                         मेरा भारत महान!!
              विकास !! डोक्या वरून सायकल वर पाणी...


                            

Monday, May 10, 2010

त्या शाह फैझल ने भारतीय (यूपीएससी) परीक्षेत देशभरातून पहिला येवून त्या अतिरेक्यांचा बदला घेतला


प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गात न बसता जिद्दीच्या जोरावर काय घडविता येऊ शकते  


याचे एक उत्कृष्ट उदाहरण जम्मू-काश्‍मीरच्या शाह फैझल याने सर्व तरुणांपुढे ठेवले आहे. 


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत देशभरातून पहिला आलेल्या फैझल 


याच्या या देदीप्यमान यशाचे अनेक कारणांनी महत्त्व आहे. काश्‍मीर खोऱ्यातील लोलब 


या दुर्गम खेड्यात वाढलेल्या शाह फैझल याचे वडील तो लहान असतानाच अतिरेक्‍यांच्या 
हल्ल्यात मरण पावले.
subhash sawant pune jai maharashtra said:तुजा बापाचा बदला घ्ये ! खून का  

बदला खून से ! जय महाराष्ट्र ! 

Thursday, May 6, 2010

सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने विजेची नासाडी होईल


                                              Cricket's black and white order exposed
प्रति,                                                                                                    
06/05/2010
श्री.माननीय मुख्य न्यायधी
मुंबई हाय कोर्ट मुंबई
विषय :- विजेचा क्रिकेट सामन्यातील दुरुपयोग थांबविणे बाबत.
सन्मानीय न्यायधीश महोदय,
या जनहित याचिकेद्वारे द्वारे मी आपणास विनंती करतो की  आज महाराष्ट्राची विजेची गंभीर समस्या पाहता आणि १० ते १५ घंटे लोडशेडिंग असताना क्रिकेटचे सामने रात्री  विजेचा वापर करून विजेची नासाडी करण्यास आपण बंदी घालावी ही विनंती आज प्रत्येक ठिकाणी असे रात्रीचे सामने आयोजित करून वीज नासाडी केली जाते. महाराष्ट्रा शासन MSEB यांना या बाबत प्रतिवादी करावे , ही विनंती.  
सदरील पत्राची जनहित याचिका म्हणून दाखल घेण्यात यावी.ही नम्र विनंती.
Yours faithfully
Thanthanpal parbhanikar  
ENCLOSER’S OPINION OF AFFECTED CITIZENS OF LOADSHEDING ELECTRICITY

Tuesday, May 4, 2010

दिल्ही तर भारताची राजधानी आहे .तेथे ही लोडशेडिंग होते तर मुंबईत का नाही?



उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला एकंदरीत मूळ प्रश्नाची व्याप्ति समजलेली नसल्यामुळे काही शंका. या शंका ठणठणपाळ यांच्या लेखावर विचारणं कदाचित अधिक रास्त झालं असतं. पण जाणकाराचा लेख दिसला म्हणून इथे विचारतो. जर आकडेवारी मिळाली तर प्रश्न स्पष्ट व्हायला मदत होईल असं वाटतं.
१. मुंबईत महाराष्ट्रातले सुमारे १५% लोक राहातात. अंदाजे २५ ते ३०% उद्योगधंदे मुंबईत असावेत. महाराष्ट्राला मिळणाऱ्या टॅक्सपैकी सुमारे ३०% मुंबईतून येत असावा असाही माझा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला महाराष्ट्राच्या संपूर्ण वाट्यापैकी नक्की किती वीज मिळते? किती मिळणं न्याय्य आहे? (जाणकारांनी माझे आकडे सुधरावेत)



Saturday, May 1, 2010

अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात

एक मे महाराष्ट्राचा सुवर्ण महोत्सव .मोठ्या शहरात जोरात साजरा होत आहे. आम्ही सुद्धा आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो.  कारण सरकारी उत्सवाला साजरा  करण्या करता वीज बंद केली जात नाही. पण हाय घड्याळात सकाळचे ६ वाजले आणि लाईट गेली ती ११ वाजे ला आली त्या मुळे सकाळची देशभक्तीपर गाणे मेरे देश की धरती वगेरे  ऐकण्याची संधी गेली. यामुळे उत्सव आहे असे वाटलेच नाही. आजकाल कोंबड ओरडण्याची वाट पहावी लागत नाही आमचे घड्याळ वीज जाणे येणे यावरच लावली जातात.
यापुढची सत्य घटना सांगतो.मुलाचा पुण्यातील IT कंपनीत काम करणारा मित्र आई-वडिलांना भेटण्यास बऱ्याच दिवसांनी गावाकडे आला होता. सकाळी गुल झालेली लाईट ११ वाजता आली. गप्पा मरत असताना लगेच घंट्या भरात वीज गुल. घामाच्या धारा सुरु. त्याने थोडा वेळ सहन केले. नंतर माझ्या कडे तावातावाने आला. काका , आता लाईट कधी येणार मी शांतपणे सांगितले ५.३ वाजता. तो चिडला , काका तुम्ही लोक इतके शांत कसे बसू शकता, लोक धिंगाणा करत नाही का? नेत्यांना , MSEB च्या लोकांना मारत का नाही. या ४५ डिग्री तापमानात पंख्या, कुलर शिवाय  कसे राहतात . आमच्या कडे लाईट जात नाही. गेली तर अधिकाऱ्यांची खेर नाही. लोक ठोकून काढतात. ४ दिवसा साठी आलेला त्याने आजच्या  रात्रीचे वातानुकुल बस चे परतीचे तिकीट काढले.
यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल .