Translate

Tuesday, November 27, 2012

आमच्या गुरुजीना आख्ख गाव लंगड्या मास्तर म्हणूनच ओळखायचे.

आमच्या गुरुजीना आख्ख गाव लंगड्या मास्तर म्हणूनच ओळखायचे. आणि लंगड्या मास्तराच्या शाळेत पोरग एकदा टाकल कि बाप कींवा माय शाळे कडे परत ढुंकून ही पाहत नसत.........एव्हढा विश्वास शाळेच्या शिवणकर लंगडे सर, कुलकर्णी आणि बारबिंड या शाळेच्या त्रिमूर्ती संस्थापक गुरुजींनी कमावला होता. सणासुदीला मुलाची/मुलीची माय माउली आठवणीने लंगड्या सरांन करता घरून गोड जेवणाचा  डब्बा पाठवत असे ........... तर कधी धपाटे कींवा साधी तिखट मिठाची पोळी सुद्धा  वेळप्रसंगी अगत्याने सरांना  दे म्हणून देत असे......कारण शाळेच्या संसारालाच लंगड्या सरांनी आपला संसार मानले होते.....सरांचे स्वच्छ धुतलेले पांढरे शुभ्र कपडे, विध्यार्थ्याना बसल्या जागे वरूनच मारण्या साठी खास बनवलेली लांब वेताची छडी अजून ही डोळ्या समोर उभी राहते. सगळ्या सरांनी आम्हाला भरपूर मारले पण आम्हाला कींवा आमच्या मायबापाना कधी राग आला नाहीं .उलट आम्ही तक्रार केली कि मायबाप सरळ म्हणत तुझीच चूक असेल मास्तर उगीच तुला कश्याला मारतील . आजच्या शिक्षण पद्धतीचे धिंधवडे पाहीले की नशीब आपण या काळात शिकत नाही म्हणत देवाचे आभार मानतो. शिक्षकांनी माझ्या मुलाना मारले तरी मी कधीही शाळेत तक्रार करण्यास गेलो नाही.....आणि आज सगळेच बदलले आहे....बालमनाचा गुरुजींनी मारण्याच्या आधीच पालक शाळेत तक्रार नाही तर भांडणाच्या आवेशात जातात. जर गुरुजींनी मुलाला मारलेले पालकांस पटत नसेल तर त्यांनी घरी खाजगी शिकवणी ठेऊन सरां बरोबर स्वतः बसावे .........

Thursday, November 22, 2012

यंहा सत्ता के हर खुर्सी पर उल्लू बैठा है ......

  यंहा सत्ता के हर खुर्सी पर उल्लू बैठा है ...

महाराष्ट्र load shedding मुक्त होता होता राजीनामा आला......


"उष:काल होता होता, काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली."............हे गाण आठवण्याच कारण महाराष्ट्र load shedding मुक्त होता होता राजीनामा आला.......अरे आता पुन्हा पेटवा कंदीलाच्या वाती .......अजितदादा याचं महाराष्ट्र load shedding मुक्त करण्याच स्वप्न नव्हे तर ध्येय होत...... उगीच स्वप्न पाहणाऱ्या पेकी ते नव्हते.......वीज वसुलीची कठोर मोहीम, जेथे वसुली चांगली तो विभाग वीज भारमुक्त 
करणे २४ तास वीज पुरवठा......., ज्यादा वीज चोरी असलेल्या विभागात ज्यादा वीज कपात कपात लागू करणे असे फुकट्या जनतेला अप्रिय वाटणारे निर्णय लोकशाही असून घेण्याचे धाडस दाखवत दादांनी महाराष्ट्र राज्य भारमुक्त करण्याचा दिशेने वेगाने प्रगती केली.......पण का कोण जाणे दादांचा ठरवून गेम करण्यात आला. सिंचन घोटाळ्याच्या धुरात महाराष्ट्र राज्य भारमुक्त करण्याचे स्वप्न भंग पावले......आता असा खमक्या मंत्री या खात्याला मिळणे अवघड आणि महाराष्ट्राचा अंधार खतम होणे नजीकच्या भविष्यात अवघड ...................

चीन युध्दात भारताच्या दारुण पराभवामध्ये नेहरुंचा वाटा मोठा होता.

बाळासाहेबांचे दुखद निधन. त्यानंतर कसाब फासी  या बातम्यांच्या गदारोळात एका महत्वाच्या बातमी कडे दुर्लक्ष झाले. पंडित नेहरूंनी हिमालया पेक्षा जास्त मोठ्या चुका करून भारताताचे प्रचंड नुकसान केले पण नेहरू अंधभक्त आज ही नेहरूंच्या या चुका मान्य करण्यास तयार नाहीत , हे भारताचे दुर्देव .
नवी दिल्ली। दि. २0 (लोकमत न्यूज नेटवर्क)
सन १९६२च्या भारत-चीन युद्धादरम्यान भारताने हवाईदलाचा वापर का केला नाही, हा वादाचा मुद्दा असताना या युद्धातील भारताच्या पराभवाला तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जबाबदार होते, असा ठपका भारतीय हवाईदलाचे माजी प्रमुख (एअर चीफ मार्शल) ए.वाय. टिपणीस यांनी ठेवला आहे. हवाई दलाचा वापर केला असता तर 1962 च्या युद्धाचे परिणाम वेगळे दिसले असते, असे मत विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल एन. ए. के. ब्राउन यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. त्या पार्श्वभूमीवर एअर चीफ मार्शल टिपणीस यांनी ही टीका केली आहे. जागतिक पातळीवरचा नेता बनण्याची पंडित नेहरु यांची महत्त्वाकांक्षा होती. यासाठी त्यांनी देशाच्या सुरक्षा हितांकडे दुर्लक्ष केले. चीन युध्दातील भारताच्या दारुण पराभवामध्ये नेहरुंचा वाटा मोठा होता.‘युद्धाच्या पाच दशकांनंतर भारत व चीन’ या विषयावरील एका चर्चासत्रात टिपणीस बोलत होते. जागतिक नेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेपोटी नेहरूंनी देशाच्या सुरक्षा हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप टिपणीस यांनी या वेळी केला.http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-21-11-2012-7cc10&ndate=2012-11-21&editionname=mainhttp://online1.esakal.com/esakal/20121120/4639284476902441226.htmhttp://navshakti.co.in/featured/95602/

Saturday, November 17, 2012

महामृत्युंजय जपाची दुरावस्था चटा वरील श्राद्ध उरकण्या सारखी झाली आहे.

मरण अटळ आहे. राम-कृष्ण सारख्या देवतांना ही  मरण चुकले नाही..........आपण तर सामान्य माणसच..... असे असताना कोण्या मनुष्य प्राण्याने या महामृत्युंजय जपाची रचना करून मानवाला न मरण्याच्या खोट्या आशेवर झुलवत ठेवले देव जाणे.......   तो खरोखरच महान आहे. बर ज्याने कोणी हा मंत्र रचला तो सुद्धा मृत्यु  वर विजय मिळवू शकला नाही...तरी  असा जप वर्षानुवर्षे विश्वासाने जपुन मानव मृत्यूला    चुकविण्याचा का बर प्रयत्न करतो हेच समजत नाही????......आणि आता तर मिडीयाच जन्म-मृत्यु चा ठेकेदार झाल्या मुळे अश्या अमानवी उपचारांचे अतिस्तोम माजणे साहजिकच आहे. 
एखाद्या गंभीर आजारातून बरे होण्यासाठी. महामारीच्या प्रकोपापासून रक्षण करण्यासाठी. वात(वायू) पित्त(ताप) आणि कफ या दोषांमुळे झालेल्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी. एखाद्या दुर्घटनेमुळे किंवा आजारामुळे जीवनावर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा जन्म कुंडलीतील ग्रह दोष, ग्रहांची महादशा, अंतर्दशा यांच्या अशुभ प्रभावाच्या शांतीसाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा..दरिद्रता दूर करण्यासाठी, धन प्राप्तीसाठी, सुखी आयुष्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.मानसिक अशांतता आणि क्रोध यामुळे धर्म आणि अध्यात्माप्रती निर्माण झालेली कटुता नष्ट करण्यासाठी. परिवार, समाज, आणि नात्यांमधील कलह दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.संपत्तीचे वाद मिटवण्यासाठी. शासकीय कामातील अडचणी दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. लग्न जमण्यात येणाऱ्या अडचणी नाडी दोष किंवा इतर बाधा दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दिव्य मराठी. http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-mahamritunjay-mantra-chanting-3515952.html?seq=7 
थोडक्यात जन्मा पासून मृत्यु पर्यंतच्या सर्व प्रवासात हर बीमारी का एक ही शर्तिया  ईलाज असे या जपाचे महात्म्य आहे. शर्त एकच हा जप पवित्र शुद्ध मनाने कोणत्याही प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक पापच्या वर्तना शिवाय पूर्ण करावा. ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात।।  इस मंत्र को संपुटयुक्त बनाने के लिए इसका उच्चारण इस प्रकार किया जाता है  ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुवः स्वः  ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम्पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात।। ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ  असा हा  देव भाषेतील  मंत्र  आजच्या काळात  प्रत्यक्ष देवाला सुद्धा शुद्ध  भाषेत उच्चारता येणार नाही तेथे  मृत्य  मानवाचे काय ???
आजच्या बाजारीकरणाच्या काळात या मंत्रौपचाराचे, मंत्र म्हणणारयांचे सुद्धा बाजारीकरण झाले असल्या मुळे  या  महामृत्युंजय जपाची दुरावस्था चटा वरील श्राद्ध  उरकण्या सारखी झाली आहे. या  मुळेच  मरणावर  मृत्यु  वर मानव विजय मिळवू  शकला नाही...निव्वळ मंत्र उच्चारून संकटावर मात करता येत नाही..तर संकटाना हिमंतीने सामोरे जावे लागते.... हेच खरे.

आम्ही जातो आमच्या गावा !!!!!!

Friday, November 16, 2012

मार्मिक मराठी व्यंगचित्र साप्ताहिक

  मार्मिक मराठी व्यंगचित्र साप्ताहिक हे बाळासाहेबांचे लढाईचे हक्काचे शस्त्र होते.ऑगस्ट, इ.स. १९६०मध्ये मार्मिक साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाचेमार्मिक हे नाव ठाकर्‍यांना त्यांचे वडील केशव सीताराम ठाकर्‍यांनी सुचविले. व्यंगचित्रात्मक असलेले हे मराठीतील पहिले साप्ताहिक ठरले. साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. प्रकाशनसमारंभास अनंत काणेकरही उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना यशवंतराव म्हणाले,“आज मी येथे रसिक म्हणून उपस्थित आहे. बाळ ठाकरे यांची व्यंगचित्रं मी नेहमीच आवडीने पहातो. अनेकदा मीही त्यांच्या कुंचल्याचा विषय ठरत असतो. त्यांच्या कुंचल्याचे बोचरे फटकारे ते त्यांच्या व्यंगचित्रातून मारत असतात, पण तो सगळा आनंददायी भाग असतो. त्यांच्या व्यंगचित्रांमुळे आम्हाला अंतर्मुख होण्याची संधी मिळते. जनतेची प्रतिक्रिया कळू शक‍ते. त्यांच्या या नव्या साप्ताहिकाला माझ्या शुभेच्छा.” शिवसेना साभार        
  या पहिल्या अंकाची किमंत फक्त पंचवीस पैसे (चार आणे) एव्हढीच होती.....आजच्या महागाईच्या वणव्यात शासनाला पंचवीस पैश्याचे नाणे रद्द करावे ....... पण त्या काळी एव्हढ्या पैशात महाराष्ट्राला हादरवून सोडणारे साप्ताहिक मिळत होते हे आपल्या नातवांना सांगितले तर  ते विश्वास ठेवत नाहीत .