Translate

Sunday, December 23, 2012

तिसरे युग


सरकारप्रधान विकासाची विचारप्रणाली सर्वव्यापक असलेल्या काळात  जेआरडींची सारी कारकीर्द बहरली. निखळ बाजारपेठीय स्पर्धेची आणि  खासगी उद्यमशीलतेची महत्ता
शिरोधार्य मानणार्या  विचारपर्वादरम्यान रतन टाटा यांच्या  प्रगल्भ कर्तबगारीला  दशदिशा मोकळ्या मिळाल्या.  आता, ‘सरकारआणि बाजारपेठया दोन्ही संस्थांच्या  अंगभूत र्मयादांची प्रचीती  अनुभवलेल्या सध्याच्या टप्प्यावर  टाटा उद्योगसमूहाची सूत्रे  सायरस मिस्त्री  हातात घेणार आहेत.
प्रत्येक युगातील पिढीला  तिचा तिचा स्वतंत्र मंत्र जपावा लागतो.  जेआरडींची जागा घेण्याचे स्वप्नदेखील मी कधी  पाहिले नाही आणि  आताबी युवर ओन सेल्फहेच  मी सायरसला सांगतो आहे’,  असे रतन टाटा  अलीकडेच म्हणाले.  त्यामागील सूत्र हेच असावे का

Saturday, December 22, 2012

सपनोंका सौदागर


दीपक घैसास
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17721425.cms
येत्या २८ डिसेंबरला वयाची ७५ वर्षे पूर्ण करून रतन टाटा आपल्या 'टाटा समूहा'ची धुरा अवघ्या ४४ वर्षीय सायरस मिस्त्री यांच्याकडे सोपवत आहेत. ज्येष्ठांना डावलून त्यांच्यावर वयाच्या ५६व्या वर्षी 'टाटा समूहा'ची सूत्रे सोपवण्यात आली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण मोठी स्वप्न बघणे आणि ती प्रत्यक्षात आणणे, हा रतन टाटा यांचा आवडता उद्योग. त्यामुळेच जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या लाटेवर टाटा समूहाला आरुढ होऊन नवीन प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करता आली. एवढेच नव्हेतर एका पाठोपाठ एक परदेशी कंपन्या विकत घेऊन पूर्ण भारतीय उद्योगजगताला अभिमान आणि आत्मविश्वास मिळवून दिला. यातून जागतिक मंदीच्या काळात चीनप्रमाणे भारतीय उद्योगही जागतिक स्तरावर आपले हातपाय पसरू शकतात व जागतिक अर्थव्यवस्थेत लक्षणीय कामगिरी करून भारताला महासत्तेच्या दिशेने पुढे नेऊ शकतात, ह्याची चुणूकच दाखवणा‍ऱ्या रतन टाटा यांच्या उद्योजकीय कारकिर्दीचा घेतलेला मागोवा... 
 

जागतिकीकरणाचा मानवी चेहरा.....

Published: Sunday, December 23, 2012
भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, गलथान प्रशासनाने पोखरलेल्या आणि विकासाच्या बहुतेक आघाडय़ांवर जगाच्या खूप मागे पडलेल्या आपल्या देशाचा अभिमान वाटावा असे प्रसंग हल्ली दुर्मीळच झाले आहेत. म्हणून अशा एका प्रसंगानेच सुरुवात करावीशी वाटते. 'चेंज फॉर बेटर' या इंग्रजी त्रमासिकाच्या मुंबईतील प्रकाशन समारंभात २३ ऑक्टोबर २०१० रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितलेला हा प्रसंग. प्रकाशनाच्या काहीच दिवस आधी ते इंग्लंडमध्ये असताना घडलेला. रतन टाटा यांचा इंग्लंडमध्ये जाहीर सत्कार होत होता. तो स्वीकारायला टाटा स्टेजवर गेले, तेव्हा शेजारच्याच खुर्चीत बसलेला एक इंग्रज गृहस्थ माशेलकरांना म्हणाला, ''लक्षात घ्या, ज्याचा आम्ही आता सत्कार करतो आहोत तो उद्योगपती आजचा ब्रिटनमधला खासगी क्षेत्रातील सर्वात मोठा रोजगारनिर्माता आहे.'' हे सांगून मुंबईतल्या त्या प्रकाशन समारंभात माशेलकर पुढे म्हणाले, ''ज्या ब्रिटनचे आम्ही दीडशे वर्षे गुलाम होतो, त्या ब्रिटनमध्ये सर्वात जास्त नोक ऱ्या देणारा माणूस एक भारतीय आहे, माझा देशबांधव आहे, याचा मला त्या क्षणी प्रचंड अभिमान वाटला. एकेकाळी आमच्यावर राज्य करणाऱ्यांना आज आम्ही नोकरीवर ठेवत होतो. ब्रिटिश करत होते तो जणू फक्त टाटांचा नव्हे, तर संपूर्ण भारताचाच सन्मान होता.'' आपल्या खचलेल्या अस्मितेला उभारी देणारे असे क्षण आपल्या वाटय़ाला वरचेवर यायला हवेत. त्यासाठी आपल्या बाहूंना बळ देण्याचे सामथ्र्य रतन टाटा यांच्या वारशात आहे.


उपभोगशून्य स्वामी!......

Published: Sunday, December 23, 2012
टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा हे येत्या २८ डिसेंबर रोजी वयाची पंचाहत्तरी पूर्ण होत असल्याने टाटा समूहाच्या जबाबदारीतून निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सायरस मिस्त्री टाटा समूहाची सूत्रे हाती घेत आहेत. त्यानिमित्ताने उद्याच्या समर्थ भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल अशा रतन टाटा यांच्या समृद्ध औद्योगिक आणि मूल्यात्मक वारशाचे मार्मिक विश्लेषण करणारे लेख..
बॉम्बे हाऊसमध्ये- म्हणजे टाटा समूहाचं मुंबईतलं मुख्यालय- इथं काम करणारे सांगतात- भारतातल्या सगळय़ात मोठय़ा उद्योगसमूहाचे अध्यक्ष रतन टाटा जेव्हा या इमारतीत आपल्या कार्यालयात येण्यासाठी शिरतात..
तेव्हा काहीही वेगळं होत नाही!
म्हणजे एरवी एखाद्या छोटय़ा-मोठय़ा उद्योगपतीच्या कार्यालयात त्याच्यासाठी स्वतंत्र लिफ्ट असते. तो यायच्या आधी त्याचे भालदार-चोपदार 'बाजू व्हा.. बाजू व्हा' असं म्हणत तिथे असलेल्या इतरांना उगाचच लहान वाटायला लावत असतात. पण रतन टाटा जेव्हा बॉम्बे हाऊसमध्ये शिरतात तेव्हा यातलं काहीही होत नाही. त्यांची गाडी आली की पहिल्यांदा दारात बसलेल्या कुत्र्यांना आनंद होतो. आता एवढय़ा मोठय़ा उद्योगपतीच्या दारी कुत्रे असणं नवीन नाही. पण बॉम्बे हाऊसमधले कुत्रे म्हणजे खरे कुत्रे. चार पायांचे. समस्त टाटा कुटुंबियांना त्यांचं प्रचंड प्रेम. रतन टाटा यांची गाडी आली की हा सारमेय संप्रदाय त्यांच्या गाडीभोवती जमतो. गाडीतून उतरले की लोक काय म्हणतील वगैरे विचार न करता रतन टाटा त्यातल्या काहींना थोपटतात. लाड करतात. 'दीज इंडियन डॉग्ज..' वगैरे शब्द त्यांच्या तोंडात काय, मनातही येत नाहीत. आणि मग ते लिफ्टच्या रांगेत उभे राहतात. इतर कर्मचाऱ्यांसारखे. म्हणजे त्यांच्यासाठी लिफ्ट राखून वगैरे ठेवली जात नाही. आपण कोण आहोत, काय आहोत, हे हा माणूस कधीही  मिरवत नाही. पेज-थ्रीच्या उथळ आणि उठवळ पाटर्य़ात पाचकळपणा करताना दिसत नाही. आणि उद्योगपतींच्या मतलबी गराडय़ातून स्वत:ला अलगद वेगळं ठेवू शकतो. स्वत:च्या घरासाठी २०-२५ मजल्यांचा इमला उभारणं टाटांना सहज शक्य आहे. पण ज्या शहरात ६५ टक्के जनतेच्या डोक्यावर आभाळाशिवाय काहीच नाही, त्या शहरात असं राहणं बरं नाही, हे त्यांना जाणवतं. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्यासारखे ते फ्लॅटमध्ये राहतात. आणि शनिवारी आपले दोन जर्मन शेफर्ड कुत्रे आणि ते स्वत:च्या छोटय़ा यंत्रहोडीतून अलिबागला जातात.


Saturday, December 8, 2012

भारत कधी कधी माझा देश आहे......

सर, लहानपणी शाळेत ग्राउंड वर जन-गण-मन अधिनायक जय हे, भारत-भाग्य-विधाता या राष्ट्रगीता नंतर भारत माझा देश आहे ही प्रतीज्ञा म्हणताना छाती अभिमानाने भरून यावयाची देशा बद्दल गर्व वाटायचा .....कांही वात्रट विद्यार्थी सारे भारतीय माझे बांधव आहे म्हणताना हळुच एक सोडून म्हणत तेंव्हा आजूबाजूंच्या विद्यार्थ्याना हसू आवरत नसे...........हळूहळू काळ बदलत गेला. रामदास फुटाणे यांची भारत कधी कधी माझा देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझा जयजयकार असो, माझ्या धर्माचा जयजयकार असो, माझ्या पंथाचा जयजयकार असो,माझ्या प्रांताचा जयजयकार असो. झालाच तर... कधी कधी... माझ्या देशाचा सुद्धा जयजयकार असो.-रामदास फुटाणें ही वात्रटीका वाचनात आली...... जे न देखे रवी ते देखे कवी या म्हणीची प्रचीती आली.....खरच फुटाणे यांनी देशाच कीती सार्थ वर्णन केल...आणि आजची देशाची भयानक दुरवस्था पाहता शाळेतल्या प्रतीज्ञे चा पोकळपणा जाणवतो आणि रामदास म्हणतात तेच पटते ...कधी कधी भारत माझा देश आहे.......अखेरीस ....जनगण मन अधिनायक जय हे राष्ट्र गीत इंग्लंडचा बादशहा जार्ज पंचम याच्या १९११ च्या भारत भेटीच्या वेळी त्याचे स्वागत करण्याकरता त्याचे गुणगान गाण्या साठी खास लीहले गेले होते हा कटु सत्य असलेला इतिहास समजल्यावर आणि स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी  वंदे मातरम गीता ला डावलुन या जन-गण-मन गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याकरता जे घाणरडे राजकारण खेळले गेले ते समजल्यावर तर या राष्ट्रगीताचा सुद्धा तिटकारा वाटायला लागला............बऱ्याच वर्षांनी प्रतीज्ञा वाचल्यावर मनावरच्या जखमेतून अश्वत्थाम्याच्या जखमेप्रमाणे भळभळून रक्त वाहू लागल्याने प्रतिक्रया मोठी झाले.

Wednesday, December 5, 2012

....जोतिष्य वास्तुशास्त्राचा अतिरेक

आज घर बांधणीवर आर्किटेक्ट इंजिनिअर यांच्या पेक्षा  वास्तुशास्त्राचा, जोतिष्याचा दशदिशांचा  खूप अतिरेक परिणाम  झाला आहे...प्लॉट घेण्या पासून ते नवराबायाकोने पलंगावर कसे झोपावे , पूजा घरात देवाची पूजा कशी करावी दगडी मूर्तीच्या देवाचे तोंड कोणत्या दिशेला असावे, स्वयंपाक घरात जेवण कसे तय्यार करावे..... आणि कोणत्या दिशेला तोंड करून जेवावे.... हे सुद्धा हेच कुडमुडे लोक ठरवत असतात. आता तर संडासाचे भांड सुद्धा कसे बसवायचे, कोणत्या दिशेला बसवायचे हे सुद्धा हेच वस्तूतज्ञ दिशा तज्ञ  ठरवितात......पण या मुळे घरमालकाची कशी गोची होते, आपल्या सोयीसुविधा प्रमाणे घर न बांधता कोण्या मूर्ख  वास्तुतज्ञा च्या सल्ल्या प्रमाणे घर बांधल्यास काय अतिरेक दुष्परिणाम होतात, हे या व्यंग चित्रकाराने एकदम प्रभावीपणे चित्रात दाखवले आहे.....१०० ओळीचा लेख लिहून ही जो प्रभाव पडला नसता तो या चित्रा वरून पडला ....आता तरी जनता शहाणी होईल ....