Translate

Thursday, December 3, 2015

नशीब त्या काळाच्या आणि आजच्या महिलां जातीचे … ज्या काळी १८२९ मध्ये समाजसुधारक राजा राम मोहन रोय आणि इंग्रज शासक लॉर्ड विल्यम बेंन्टीन्क यांनी नवरा मेल्या नंतर त्याच्या बरोबर सती जाण्याची स्त्रीयांना जिवंतपणी जाळण्याची कुप्रथा धर्मांध धर्ममार्तडांचा प्रचंड विरोध सहन करून बंद केली …

त्या काळात स्त्रीया सती जाण्याच प्रमाण प्रचंड होत. तत्कालीन पंडीतांच्या मते पतीच्या मृत्यूनंतर विधवा स्त्रीपुढे दोनच पर्याय असत. एक म्हणजे सर्व सुखांचा त्याग करून अत्यंत कठोर नियमांनी बद्ध अस जीवन जगणे किंवा दुसरा पर्याय म्हणजे सती जाणे. एकदा स्त्रीनं सती जाण्याचा निर्णय घेतला असता तिला त्यापासून परत फिरता येत नसे. अर्थात ज्या समाजात स्त्रीला मूळातच दुय्यम स्थान होत (/आहे) आणि जिला स्वतःचा आवाजच नव्हता ती हा निर्णय स्वतः घेत असेल ही शक्यताही धूसरच आहे. भावनेच्या भरात एखाद्या स्त्रीन असा निर्णय घेउन नंतर चितेवर गेल्यावर तिथून परत फिरायचा प्रयत्न केला तर तिला मोठ्या मोठ्या बांबूंच्या सहाय्यान आत ढकलंल जात असे. तिचा आक्रोश कोणाला ऐकायला येउ नये यासाठी तिथ मोठ-मोठी वाद्य वाजवली जात. कलकत्त्याच्या स्मशानभूमीत वाद्यांच्या गजरात पतीच्या चितेवरती बळजबरीन जाळल्या जाणार्‍या स्त्रीया हे नेहमीच दृश्य असे. बरेचदा त्या स्त्रीला नशा येणारा भांग किंवा तत्सम पदार्थ दिला जात असे आणि त्या अमलाखाली असतानाच ती चितेवर गेली की तिला तिच्या मृत पतीच्या प्रेताशी बांधून टाकण्यात येई.



नाहीतर आजचे ताई सारखे लोकशाहीवादी मंत्री असते तर ……… मी जन्माच्या आधी पासून नवरा मेल्या नंतर जिवंत असलेल्या पत्नीने स्वतःला त्याच्या चितेवर जाळून घेवून मरून जाण्याची प्रथा आहे …. त्या मुळे मेलेल्या  नवऱ्याच्या चितेवर  जिवंत असलेल्या बायकोने स्वतःस जाळून घेऊन मरून जाण्याच्या प्रथेला विरोध करता कामा नये … नवरा मेलेल्या महिलांना जगण्यास धर्माच्या ठेकेदारांनी बंदी घातली असेल तर त्यात मानापमान मानण्याचे काही कारण नाही, हा परंपरेचा प्रश्न आहे, त्यासाठी नवरा मेल्या नंतर जिवंत राहण्याचा  हट्ट तरी विधवा ने  कशाला करायचा? म्हणत महिलांना मेलेल्या नवऱ्या सोबत जिवंत जाळून घेऊन मरून जाण्याचा सल्ला या लोकनेत्यांनी दिला असता .