गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. इतर दिवशी काही काम करायचं असेल तर वेळ पहावी लागते पण या मुहुर्तावर तर सगळीच वेळ शुभ असते. याच शुभमुहुर्तावर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मीती केली म्हणतात. गुढीपाडव्याच्या शुभ-मूहर्तावर हिंदू कॅलेंडरप्रमाणे कालगणणा आणि ब्रम्हवर्ष कसं मोजलं जातं त्याचा वेगवेगळ्या हिंदू पुराणातला हा सारांश.
हिंदू धर्माच्या अनुसार सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांना मानलं जातं. त्यांचं आयुष्य त्यांच्याच शंभर वर्षांइतकं असतं. म्हणजे त्यांचं आयुष्य १००० महायुगांएवढं असतं.
१] विष्णु-पुराणानुसार काल-गणना विभाग, विष्णु पुराण भाग १, तॄतीय अध्यायाप्रमाणे :
2 अयन (सहा महिने कालखंड, वर पहा) = 360 मानव वर्ष = एक दिव्य वर्ष
4,000 + 400 + 400 = 4,800 दिव्य वर्ष = 1 कॄत युग
3,000 + 300 + 300 = 3,600 दिव्य वर्ष = 1 त्रेता युग
2,000 + 200 + 200 = 2,400 दिव्य वर्ष = 1 द्वापर युग
1,000 + 100 + 100 = 1,200 दिव्य वर्ष = 1 कलि युग
12,000 दिव्य वर्ष = 4 युग = 1 महायुग (दिव्य युग सुद्धा समजले जाते)
२] ब्रह्मदेवांची कालगणना
1000 महायुग= 1 कल्प = ब्रह्मा का 1 दिवस (केवळ दिवस) (चार खरब बत्तीस अरब मानव वर्ष; आणि आश्चर्य म्हणजे हेच सूर्याचं खगोलीय वैज्ञानिक वय सुद्धा आहे.).
(दोन कल्प मिळून ब्रह्मदेवांचा एक दिवस आणि एक रात्र होते. )
30 ब्रह्मदेवांचे दिवस = 1 ब्रह्मदेवांचा एक महिना (दोन खरब 59 अरब 20 करोड़ मानव वर्ष)
12 ब्रह्मदेवांचा महिना = 1 ब्रह्मदेवांचाचे वर्ष (31 खरब 10 अरब 4 करोड़ मानव वर्ष)
50 ब्रह्मदेवांचं वर्ष = 1 परार्ध
2 परार्ध= 100 ब्रह्मदेवांचं एक वर्ष= 1 महाकल्प (ब्रह्मदेवांचा जीवनकाल)(31 शंख 10 खरब 40अरब मानव वर्ष)
ब्रह्मदेवांचा का एक दिवस 10,000 भागात वाटलेला असतो, त्या भागांना चरण म्हणतात. सृष्टीची चार युगं मिळून चार चरण होतात.
सत युग = 4 चरण (1,728,000 सौर वर्ष)
त्रेता युग = 3 चरण (1,296,000 सौर वर्ष)
द्वापर युग = 2 चरण (864,000 सौर वर्ष)
कलि युग = 1 चरण (432,000 सौर वर्ष)
हे युगांच चरण चक्र सतत अशा गतीने फिरत रहातं की ब्रह्मदेवांच्या एका दिवसात 1000 महायुग होऊन जातात.
एक युग चक्र = एक महायुग (43 लाख 20 हजार सौर वर्ष)
३] श्रीमद्भग्वदगीतेप्रमाणे कालगणणा
श्रीमद्भग्वदगीतेप्रमाणे "सहस्र-युग अहर-यद ब्रह्मणो विदुः", अर्थात ब्रह्मदेवांचा एक दिवस = 1000 महायुग.
म्हणजेच याप्रमाणे ब्रह्मदेवांचा एक दिवस = 4 अरब 32 खरब सौर वर्ष. याच अनुसार दिवसाएवढा काळ ब्रह्मदेवांची एक रात्र असते.
एक मन्वन्तर म्हणजे 71 महायुग (306,720,000 सौर वर्ष) असतात. प्रत्येक मन्वन्तराचा शासक एक मनु असतो.
प्रत्येक मन्वंतरानंतर एक एक संधि-काल होतो, जो कि कॄतयुगच्या बराबरीचा असतो (1,728,000 = 4 चरण) (या संधि-काळी प्रलय होतो आणि सगळी पृथ्वी जलमग्न होते.)
एक कल्प म्हणजे 1,728,000 सौर वर्ष, ज्याला आदि संधिकाळ म्हणतात, ज्यानंतर 14 मन्वन्तर आणि संधि काळ येतात.
४] हिंदू कालगणणा सारांश.
ब्रम्हदेवांचा एक दिवस खालील गणणेच्या बरोबर असतो.
(14 x 71 महायुग) + (15 x 4 चरण)
= 994 महायुग + (60 चरण)
= 994 महायुग + (6 x 10) चरण
= 994 महायुग + 6 महायुग
= 1,000 महायुग
आशा आहे गुढीपाडव्यामागची हिंदू कालगणणेची ही रंजक माहिती आपणा सर्वांस आवडली असेल. गुढीपाडवा आपणासर्वांस सुखसमृद्धी आणि भरभराटीचा जावो. आणि येणार्या वर्षात आपल्या सर्व शुभकामना पुर्ण होवोत!
http://www.facebook.com/home.php?sk=group_168280689854493&id=213615885320973

No comments:
Post a Comment