भारत रत्न हे पुरस्कार राजकीय सोई ने मताच्या राजकारणाने दिले जातात. आणि बाकी पद्म पुरस्कार तर सैफ अली सारख्या फालतू नटला सुद्धा मिळतात . हा पुरस्कार याला का मिळाला कोणी सांगेल का? या रत्नांच्या यादीवर नजर टाकली तर हे नग भारत रत्न कसे ? हा प्रश्न पडतो. कॉंग्रेस ची आणि नेहरू परिवाराची हांजी हांजी करणाऱ्या अनेक अपात्र लोकांना हा रत्न पुरस्कार मिळाला आहे.
....तर आंबेडकरना यांना नाईलाजाने जनमताच्या रेट्याखाली आणि स्वतः:च्या मतपेटी साठी हा पुरस्कार १९९० मध्ये त्यांच्या मृत्यू नंतर ३५ वर्षाने दिला. वल्लभभाई पटेल ज्यांनी एकसंघ भारताचे निर्माण केले त्यांना मृत्यू नंतर ४० वर्षाने हा पुरस्कार नाईलाजाने दिला हे कटू सत्य आहे ....मौलाना अब्दुल कलाम आजाद. एक प्रसिद्ध भारतीय मुस्लीम विद्वान कवी, लेखक पत्रकार भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक, स्वतंत्र भारताचे पहीले शिक्षण मंत्री म्हणुन अत्यंत महत्वाचे काम केले या करता यांचा जन्मदिवस शिक्षण दीवस म्हणुन साजरा केला जातो. ...पण ....यांना सुद्धा यांच्या मृत्यू नंतर तब्बल ३४ वर्षांनी भारत रत्न हा सन्मान देण्यात आला.
तर सत्यजित रॉय यांनी भारतीय गरीबी चे विकृत चित्रण करून जगात भारतीयांची बदनामी केली हे खुद्द खासदार नर्गिस दत्त यांनीच १९८० मध्ये संसदेत सांगितले, तरी त्यांना भारत रत्न त्यांचा पेक्षा कर्तबगार अडूर गोपालाकृष्णन, गिरीश कासरावल्ली, श्याम बेनेगल , गौतम घोष, राज कपूर, ऋत्विक घटक. आणि मृणाल सेन या सिने दिग्दर्शकांना डावलून देण्यात आला. या वरून हा पुरस्कार देताना काय काय देवाणघेवाण होत असेल देव जाणे.
-- .तर खऱ्या भारतरत्न असलेल्या सावरकरांना , भगतसिंग ,आझाद सुखदेव राजगुरुना तर या चमचेगिरीने वाळीतच टाकले आहे. पण इतिहास यांना क्षमा करणार नाही. एक दिवस जनताच नवा इतिहास लीहून यांच्या पापाचे माप यांच्या पदरात टाकेल. खोटे वाटत असेल तर या रत्नांची नगांची यादी पहा मग सांगा या पुरस्काराचे खरच किती मौल आहे ते? आता विचार करा सचिन ला सावरकरांच्या यादीत बसवायचे की........ हांजी हांजी करणाऱ्याच्या यादीत ? ...............
No comments:
Post a Comment