Translate

Tuesday, April 19, 2011

महाराजांची क्षमा मागून.

शिवाजी महाराजांच्या २-२ जयंत्या दारू पिवून धिंगाणा करत साजरा करणाऱ्या दोन्ही पक्षांना महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्याची तसदी घ्यावीशी वाटली नाही. का? अश्या कार्यक्रमात धिंगाणा घालता येत नाही म्हणुन ते न साजरे केलेलेच बरे असा विचार ही या नेत्यांनी केला असेल. का? असे ही असू शकेल की आपले महाराज कोणत्या तिथीला वारले हे नक्की ठरवता येत नसेल . कारण दोन जयंत्या तर साजऱ्या होतातच त्या मुळे आज नक्की कोणाचे महाराज वारले त्यांचे की आपले हे ठरवता येत नसेल. आता कांही वर्षांनी दोन पुण्यतिथ्या सुद्धा साजरी कराव्या लागतील...... आणि तसे झाले तर पुढच्या शतकात महाराष्ट्रात दोन शिवाजी राजे होवून गेलेत हा इतिहास लिहावा लागेल. इंग्रजा सारखे जार्ज पहिला, जार्ज दुसरा , तिसरा या धर्तीवर शिवाजी राजे पहिले, शिवाजी राजे दुसरे असा इतिहास निर्माण होईल…. आणि ज्यांचे त्यांचे भाट तय्यारच आहेत असा इतिहास लिहिण्या साठी..... महाराजांची क्षमा मागून.

No comments: