Translate

Friday, June 24, 2016

भारतात सुद्धा महत्वाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधीला डावलून नागरिकांकडून सरळ मतदान

http://www.loksatta.com/desh-videsh-news/britains-referendum-results-live-early-leads-show-its-a-neck-and-neck-contest-1255733/

लोकशाही ब्रिटन  च्या नागरिकांनी सरळ मतदान करून   ब्रिटनचा युरोपिअन महासंघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. नागरिकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतांना सुद्धा लोकशाही देशात महत्वाच्या प्रश्नावर सरळ जनमत घेतले जाते . मध्यंतरी स्विस नागरिकांनी सुद्धा सरळ मतदान करून सरकारने आम्हाला फुकटचा भत्ता देऊ नये हा जनमत कौल दीला होता. याला खरी लोकशाही म्हणतात .
                                                                                                             
या उलट जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतातील परिस्थिती आहे . एकदा खेड्याच्या ग्रामपंचायती पासून तर दिल्ली च्या संसद सभासद्द  लोकप्रतिनिधी निवडून दिले की नागरिकांचा लोकशाहीशी असलेला संबंध संपतो .. आणि सुरू होतो राजकारणी नेत्यांचा गोरखधंदा . आम्हाला जनतेनी निवडून दिले याचा अर्थ आम्ही कसाही स्वैराचार केला , जन विरोधी निर्णय घेतले तरी त्यास जनतेने विरोध करू नये अशी उद्धट वृत्ती निर्माण होते . आणि देशा पेक्षा , नागरिकांच्या हिता पेक्षा पक्ष हित , मतपेटी डोळ्या समोर ठेवून वेळ प्रसंगी देश हित विरोधी निर्णय घेतले जातात . अशी अनेक उदाहरणे देता येतील . पंजाब मधील अतिरेकी भिंदरवाला याचा उदय , विविध राज्यांचे ,जिल्ह्याचे विभाजन , नदीचे पाणी वाटप, राज्यांच्या सीमा   भाषा जातपात आरक्षण या बाबत निर्णय हे राजकारण्यांच्या फायद्याच्या नफातोटा च्या हिशोबातून घेतले जातात . वेळ प्रसंगी यात नागरिकांच्या , देश्याच्या हिताचा बळी सुद्धा देण्यास हे राजकारणी नेते मागेपुढे पाहत नाही .

या साठी भारतात सुद्धा  महत्वाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधीला डावलून नागरिकांकडून सरळ मतदान घेऊन नागरिक जो निर्णय  देतील तो अमलात आणावा . आपली मते मांडल्यास योग्य .