Translate

Saturday, April 16, 2011

भूकंप त्यांचा आणि आपला

भूकंप त्यांचा आणि आपला 

माझी भूकंपाची कटू  आठवण गेल्या  महीन्यातील जपानच्या सुनामी भूकंपाने ताजी झाली.  जपान मधील भूकंप त्यानंतर त्या  देशाच्या नागरिकांनी सरकारने आणि राजकीय नेत्यांनी ज्या ध्यैर्याने आणि महत्वाचे म्हणजे इमानदारीने प्रामाणिकपणे आणि शिस्तीने या निसर्गनिर्मित संकटास तोंड दिले ते TV वर पाहुन आणि वर्तमान पत्रात वाचून आपल्या लातूर भूकंपाच्या आठवणीनी मनावरील त्या काळी झालेली जखम परत ताजी झाली. १९९३ साली अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ३० सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:५५ वाजता लातूर-उस्मानाबाद येथे झालेला भूकंप!

गणरायाला प्रेमाने निरोप देवून मराठी माणूस रात्री निवांत झोपेत असतानाच लातूर जिल्ह्यातील  खिल्लारी  या खेड्यावर क्रूर काळाने आपली झडप घातली आणि भूकंपाच्या जोरदार धक्याने गावकऱ्यांच्या कांही लक्षात येण्या आधीच  १०००० गावकऱ्याना काळाने मृत्युच्या दाढेत फेकले. क्षणात होतेचे नव्हते झाले . संपूर्ण गाव उध्वस्त झाले. उजाडता उजाडता सर्व महाराष्ट्रात हे वृत्त वाऱ्याच्या वेगाने पसरले , आणि मेलेल्या मढ्याच्या टाळू वरील लोणी खाण्यासाठी जशी गिधाडे आकाशात टपलेली असतात त्या प्रमाणे सरकारी नौकर नेते आणि लुटारू जनता समाजसेवेच्या च्या नावाखाली खिल्लारीच्या जनतेला लुटण्यासाठी दखल झाली. यांनी मेलेल्या मृतांच्या अंगावरील दागिने सुद्धा लुटले. मदतीच्या नावा खाली स्त्रियांची अब्रू सुद्धा लुटण्यास या नराधमांनी कमी केले नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटना वाचून मान शरमेनी खाली झाली.  यात सामान्य जनते पासून ते राजकारणी नेत्यांनी नौकारशाहाच्या मदतीने करोडो रुपयांची अक्षरश: लुट केली. सर्वत्र अराजकता माजली होती . दोन दीवस गावकऱ्यांचे होते नव्हते ते लुटण्यासाठी होड लागली होती. पुढे सैनिकांच्या ताब्यात हा भाग देण्यात आला पण लुट कांही थांबली नाही. भूकंपग्रस्त भागात मोठ्या प्रमाणात  आलेल्या देशी परदेसी मदती च्या सामानाची लुट सुद्धा सरास चालू होती. या मदती मध्ये आलेल्या परदेशी वस्तू विक्रीची अनेक दुकाने सोलापूर उस्मानाबाद बीड जिल्ह्यात उघडली होती. मदती पासून ते भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसन योजने पर्यंत प्रत्येक गोष्टीत भ्रष्ट्राचार झाला.
प्रेम : जपान मधील  रेस्टॉरंटस्नी आपले खाद्यपदार्थांचे दर कमी केले. जे बलवान आहेत त्यांनी दुर्बलांची काळजी घेतली. एटीएम यंत्रावरील सुरक्षा व्यवस्थाही हटविण्यात आली होती. पण एकही एटीएम लुटले गेले नाही.
 धंदा भारतात कोठली ही आपत्ती आली की हॉटेल, दुकानदार काळाबाजार करत वस्तूचे भाव प्रचंड वाढवतात.अश्या वेळी लुटमार हा एक धंदाच होतो. जिस की लाठी उसकी भैंस या प्रमाणे वर्तन असते.रक्षकच भक्षक बनतात 
संयम : दुभंगलेली जमीन आणि लाटांच्या तांडवात जपानी माणूस आपलं सर्वस्व गमावून बसला, पण दु:खातिरेकाने छाती बडवून घेणार्‍या एकाही जपानी माणसाचे छायाचित्र जगापुढे आले नाही
संयम भावनांचा उद्रेक, अतिरेक हा भारतीयांचा स्थायी भाव .आणि अश्या वेळी TV चैनेलवाल्यांचा अश्या दु:खाचे बाजारीकरण करून TRP साठी चाललेली घाणेरडी धडपड 
 प्रतिष्ठा : संकटाच्या काळातही एकमेकांची प्रतिष्ठा जपानी माणसाने जपली. पाण्यासाठी किंवा अन्नधान्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या खर्‍या, पण या रांगेतून कधी कुणी कुणावर डाफरलं नाही, शिवीगाळ तर दूरच, साधा रागाचा कटाक्षही कुणी टाकला नाही.  
अप्रतिष्ठा :समोरच्याची बेइज्जति करणे हा इंडियन जनतेचा मुलभूत अधिकार आहे. कर्तव्य गेले खड्ड्यात .रांगा न लावता वस्तू हिसकावून घेणे हा स्वभाव अश्या वेळी अधिक आक्रमक होतो, ओरडा ओरड धक्काबुक्की अनियंत्रित समूह वागणे 

भान : प्रत्येकालाच काही ना काही मिळायला हवे याचे भान इथल्या लोकांना आहे. म्हणूनच कोणीही गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करून साठेबाजी केली नाही. जेवढी गरज तेवढीच खरेदी हे त्यांचे धोरण होते.
 बेभान वृत्ती सर्वच मला मिळाले मिळाले पाहिजे .माझे ते माझे शिवाय तुझे सुद्धा  माझे आणि गरजे पेक्षा कितीतरी जास्त वस्तूंचा साठा जनता अविवेकाने करत असते. 
सुव्यवस्था : एरवी अशा महासंकटाच्या काळात चोरीमारीला ऊत येतो. पण जपानमध्ये एकही दुकान लुटले नाही. वाटमारी झाली नाही. वाहतूकही नियमाला धरून सुरू होती. कुठेही ओव्हरटेकिंगची घाई नव्हती. होता तो समजूतदारपणा.
बेशिस्त अव्यवस्था अश्या संकटाच्या वेळी जास्त उफाळून येते.चोऱ्या, लुटमार यांना उधाण येते.बेशिस्त वाहतुकी ची सवय असल्या मुळे अश्या प्रसंगी वाहतूक जास्तच बिघडून सर्वचजण रस्त्यात अडकतात.
त्याग : पन्नास कामगारांनी जीवाची पर्वा न करता अणुभट्ट्या शांत करण्यासाठी समुद्राचे पाणी उपसण्याचे काम केले.
स्वार्थ: नेता जनता नोकरशहानी मेलेल्या मढ्याच्या अंगावरचे दागिने घरेदारे,इज्जत लुटली त्यांच्या क्रोर्याला अंत नाही.त्याग माहीतच नसल्या मुळे त्याचा प्रश्न च निर्माण होत नाही. त्यांच्या शौर्याचे आणि त्यागाचे मोल कसे
जाणीव : एका दुकानात वीज गायब झाली तेव्हा आतील ग्राहकांनी खरेदीसाठी हातात घेतलेल्या वस्तू पुन्हा दुकानातील रॅकवर परत ठेवल्या आणि ते शांतपणे दुकानाबाहेर येऊन थांबले. करणार?
 जाणीव : दिवसाढवळ्या सूर्याच्या प्रकाशात सरास लुटमार चालू असल्या मुळे असला वस्तू न घेता बाहेर पडण्याचा मूर्खपणा भारतीय करणार नाही उलट सामुहिक रीतीने दुकान साफ करतात
प्रशिक्षण : या संकटाच्या काळात कसा मुकाबला करायचा? काय काळजी घ्यायची हे थोरांनी लहानांना शिकविले. जाणत्यांनी अजाणत्यांना समजावले. प्रत्येकाने दुसर्‍याची काळजी घेतली.
अशिक्षण रोजच्या जीवन जगतात कसे वागावे याचे कोणते ही शिक्षण नसल्या मुळे सामाजिक सामंजस्याची जाणीवच नाही. दुसऱ्याची काळजी न करता प्रत्येकजण आपलाच स्वार्थ साधण्यात मग्न.सौजन्याची ऐशी तैशी म्हणच आहे.
मीडिया : प्रसिद्धी माध्यमांची कामगिरी कौतुकास्पदच होती. भूकंप आणि सुनामीच्या बातम्या अत्यंत संयमाने दिल्या. उथळ पत्रकारितेला तिथे स्थान नव्हतं. बटबटीतपणा तर बिल्कुल नव्हता.
मिडिया: कसा नसावा याचे उत्तम उदाहरण  भारतीय मिडिया .माणूस मारत असताना तुम्ही मरत आहात आता कसे वाटते किंवा बलात्कार कसा झाला हे सांगाल काय हे विचारण्यात यांना आसुरी आनंद मिळत असतो.
गुणवत्ता : जपानी तंत्रज्ञांनी इथली बांधकामे इतकी मजबूत बनवली होती की ती कोसळली नाहीत.
गुणवत्ता :भ्रष्ट्राचार बेईमानी कामात चलता है ही वृत्ती यामुळे बांधकाम करतानाच इमारती पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळतात तेथे भूकंपाचे तर कारणच पापावर पांघरून घालण्यात वापरले जाते.

No comments: