Translate

Saturday, February 26, 2011

.http://www.nonukekokan.org/ जैतापूर अणु प्रकल्प.....

अति प्रचंड योजना अति प्रचंड भ्रष्ट्राचार मंदगति काम यामुळे योजनाचा वाढणारा अतिप्रचंड खर्च व भ्रष्ट्राचार या पेक्षा सरकार,  पोपटराव पवार हिवरे बाजार, हजारे यांचे राळेगणसिद्धी, नानाजी देशमुख यांनी उभारलेली स्वयंपूर्ण खेडी हा विकासाचा बिंदू मानून यांच्या सारखा विचार करून खेडी स्वयंपूर्ण होण्या करता  प्रत्येक  खेड्याच्या  विकास योजना  तेथील प्रामाणिक समाजसेवा करणाऱ्या नागरिकांना हाताशी धरून राजकारण न करता का अंमलात आणत नाही.


जैतापूर  अणु प्रकल्पा ची मुख्यमंत्र्यांनी  जनसुनावणी आज TV वर प्रत्यक्षात ब्रेक न घेता पाहीली.जनतेच्या प्रखर विरोध आणि राणे पितापुत्राची लोकांचा आवाज दडपण्या साठी चालू असलेली दादागिरी सुद्धा याची देही याची डोळा पाहण्यास मिळाली. TV समोर आम जनते समोर यांचे असे दडपशाहीचे वर्तन असेल तर प्रत्यक्षात  जनतेला त्यांचा किती त्रास मनस्ताप, दादागिरी, सहन करावी लागत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. आम्हाला जनतेने निवडून दिले (गुंडगिरीच्या जोरावर  कसे निवडून येतात हे सुद्धा जगाला माहित आहे,) यामुळे आम्ही जे निर्णय घेवूत ते जनतेने निमुटपणे मान्य केले पाहिजे असे उर्मट वर्तन राजकारण्यांचे झाले आहे. विकासाच्या निर्णयावर कोणाचेच दुमत असत नाही. पण विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याला उध्वस्त करत मोठ्या उद्योगपतींचे खिसे भरायचे यास जनतेचा विरोध असणारच. कोकणचा कैलिफोर्निया करण्याचे कित्येक वर्ष ढोल वाजवले जात होते, त्याचे काय झाले . कोणी उत्तर देत नाही.
..... आणि आता आहेत त्या फळबागा , स्थानिक उद्योग , मच्छिमारी व्यवसाय नष्ट करून मोठ्या शहराच्या विजेच्या वापरा साठी कोकणात अणु प्रकल्प लोकांचा विरोध असून सुद्धा स्थापन करण्याचे उद्योग राजकारणी करत आहेत. महाराष्ट्रात पुष्कळ शेत जमीन ओसाड आहे तेथे हा प्रकल्प उभा करता येणार नाही का? पण राजकारण्यांच्या गळ्यात घण्टा कोण बांधणार. पूर्वी जनमत जागृत नव्हते तेंव्हा विकासाच्या नावाखाली त्यांना उजाड करणे सोप्पे होते. पण आज जनमत जागृत झालेले आहे, त्याच बरोबर उजाड झालेल्या ग्रामीण नागरिकांचे झालेले बेहाल त्यांनी पाहिलेले असल्याने आणि सरकारने सुद्धा त्यांना वाऱ्यावर सोडण्याचा काळा इतिहास माहित झाल्या मुळे जनता आपल्या जमिनी बेईमान राजकारण्यांच्या थापांना भुलून प्रकल्पास देण्यास तय्यार नाही.देशहीता पेक्षा राजकारणी स्वत:च्या स्वार्थ साधण्यासाठी अश्या प्रकल्पांचा दुरुपयोग करतात हे जनतेला चांगलेच माहित झालेले आहे. प्रकल्प जाहीर होण्याची आतली बातमी मिळताच राजकारणी नेते आजूबाजूची जमीन साम दाम दंड भेद वापरून स्वत: बळकावून बसतात , आणि मग प्रकल्प सुरु होताच त्याचा फायदा हेच उचलतात.आणि ज्यांच्या जमिनी प्रकल्पात जातात ते जीवनातून उठतात.  इंरोन आला कि टाका कोकणात, जेट्टी आली कि टाका रत्नागिरीत. कोकणातील लोकांची स्वताचे जीवनपद्धत आहे. सतत लोकांच्या जगण्यावर घाला का घालतात? सगळ्या जमिनी महाराष्ट्रातच दिसतात. बरोबर आहे, आमचे लोक विरोध करतात, पोलीस आणि मिलिटरी आणून त्यांच्या कंबर तोडून प्रकल्प उभे राहतात, इंरोन सारखे. कोकण फक्त निसर्ग आणि पर्यटनातून विकसित व्हायला हवे. हे प्रकल्प इतर राज्यांच्या किनारपट्टीवर का उभारले जात नाही. एनरोन चा वाईट अनुभव पाठीशी असताना आणि सुरक्षिततेच्या बाबतीत युनियन कार्बाइड चा भयंकर परिणाम दिसत असताना या राजकारण्यांच्या शब्दावर कोण विश्वास ठेवील. हजारो नागरिकांचा खून करणाऱ्या लाखो जनतेला कायमचे आजारपण अपंगत्व देणाऱ्या कार्बाइडच्या अध्यक्षाला जेल मध्ये टाकण्या ऐवजी आपल्या सरकारने त्यास भारतातून पळून जाण्यास मदत केली हे जनता कसे विसरेल. भारतातील नौकरशाही आणि राजकारण्यांची तोंडे महात्मा छाप नोटे ने  बंद केली की येथे कारखानदारीच्या कामगारांच्या  सुरक्षितेतची उत्पादन प्रक्रियेच्या सुरक्षितेतची काळजी कोण गेतो. आणि घातपात झालाच तर राजकारणी सेक्युरेटी मध्ये परदेश्यात पळून जाण्यास मदत करण्यास तय्यारच असतात. नागरिक मेले तरी आपले स्विस खाते भरण्याशी त्यांना मतलब. यांच्या नियत मध्ये खोट असल्याने जनता जीव गेला तरी हरकत नाही या निश्चयाने रस्त्यावर आली आहे. पाहू आता काय होते ते.http://www.nonukekokan.org/  या कोकण प्रेमी जनतेने तय्यार केलेल्या साईटला अवश्य भेट द्या.

No comments: