Translate

Friday, February 18, 2011

.... पण या तमाश्यात यांचे सुतक कोणालाच असणार नाही.

                                        प्रामाणिक खेळ चाहत्यांची क्षमा मागून......
अपेक्षेच ओझ…  चला दोन महीने भ्रष्ट्राचार, बेईमानी, राजा कलमाड़ी, jpc लोकसभा  दहशदवाद ,महागाई या पासून मनमोहन सरकारची सुटका . रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्ना पेक्षा या सट्टे बाजाराच्या मायाजालात जनतेला देश भावनेची अफूची नशा चढ़वुन सरकार आणि विरोधी पक्ष सुद्धा निवांत बसतील. यंत्र तंत्र जपजाप यज्ञ करत INDIAN जनता  भारताचा नव्हे BCCI चा  संघ जिंकावा म्हणून  देव पाण्यात घालून बसतील आणि होय या सर्व तमाशाचे सूत्रधार सट्टेबाज अंधारात राहून सामना हार-जीत त्यांच्या सट्ट्या प्रमाणे ठरविण्यात,  खेळाडूना वश करण्यात यश मिळविण्यात यशस्वी होतील.तर मुंबई सामन्याच्या निमित्ताने भारत-पाक दुष्मनी चा गैरफायदा घेत राजकारणी नेहमी प्रमाणे मतांचे राजकारण करतील तर उच्चभ्रू सिने कलाकार  दहशदवादी हल्ल्यांचा इतिहास आपल्या मतलबा करता  विसरून खेळात आणि कलेत देशाच्या दुष्मनीच्या सीमेत बांधु नका म्हणत गळा काढतील. .... मिडिया ज्यांना खेळातील कांहीच काळत नाही त्यांच्या बरोबर बकबक करत चर्चेचा आव आणत TRP वाढवण्याच्या गेम खेळात मग्न होतील .... आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या नेहमी प्रमाणे  होताच राहतील .... पण या तमाश्यात यांचे सुतक कोणालाच असणार नाही........ 

No comments: