एक कोटीचे मालक असण हे आजच्या महागाईच्या काळात आणि घटत्या चलन दरा च्या काळात कांही मोठी गोष्ट नाही. प्रश्न आहे तो असमान संपत्तीच्या वाटपाचा. अनेक घोटाळे करून ज्यांनी कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा जमा केला त्यांचा निषेध केलाच पाहिजे. संपत्तीचे असमान वाटप हे क्रांती करून संपणार नाही. त्याला मानवाची हाव, लालसा कारणीभूत आहे. आणि ती कधीच कमी होणार नाही. सुई च्या अग्रावर मावेल एव्हढी ही माती पांडवांना देणार नाही अशी गुर्मी महाभारता पासून चालत आलेली आहे. फक्त आपण जेव्हढी होईल तेव्हढी समाजाला मदत करत जाणे, पण ही मदत करताना मासा खायला देण्या ऐवजी मासा कसा पकडावा ही शिकवण्या सारखी असावी. म्हणजे तो शिकणारा सक्षम होईल.
काळा पैसा स्वीस बँकेत जमा होत असल्याचे सांगण्यात येते हे चुकीचे सांगण्यात येत आहे.हा काळा पैसा येथे भारतातच काळ्या मातीत शेतकऱ्यांच्या शेतात, घरबांधणी उद्योगात दडपला जातो आहे. आज खेड्यात सुद्धा जमिनीचे भाव ७0 लाख ते एक कोटी रुपये एकर पर्यंत गेले आहेत आणि या भावात देखील लोक पैश्याच्या थैल्या घेवून जमिनी विकत घेण्यास रांगा लावून उभे आहेत. जमिनीच्या घरांच्या खरेदी विक्रीत खऱ्या किमतीची नोद होत नाही ३०% व्हाईट मनी आणि ७०% काळा पैसा अशी याची विभागणी असते. रजीशष्ट्री नोंदणी कार्यालयातील चपाराश्या पासून ते पंतप्रधाना पर्यंत सर्वाना ही गोष्ट माहित आहे. पण हे या वाढत्या किमतीलाच हे विकास संबोधून शैख चिल्ली स्वप्न दाखवून जनतेला मूर्ख बनवत आहेत. एव्हढ्या महाग भावात शेती घेवून देवांच्या अर्थमंत्र्याला कुबेराला ही शेती करणे परवडणार नाही तो सुद्धा आत्महत्त्या करेल. पण ही साधी गोष्ट पंतप्रधान यांना समजत नाही असे असे म्हणावे. आज कोणत्या प्रकल्पाला किती जमीन लागत याचा हिशोब न करता हजारो एकर चे सेझ बनवून लुटमार केली जात आहे. विद्यापीठाच्या नावाखाली ७०००-ते ८००० एकर जमीन ओरिसात घेण्यात अखेर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली. मुंबईच्या सेझ च्या नावाखाली अंबानीच्या घशात २०००० एकर जमीन घालण्याचा डाव शेतकऱ्यांच्या विरोध मुळे सरकारला सोडवा लागला. येथे कांहीच होत नाही असे नाही शिक्षण जसे होत जाईल असून बदल होत जाईल.
No comments:
Post a Comment