Translate

Thursday, February 10, 2011

भ्रष्ट्राचारी INDIA माझा देश आहे.

भ्रष्ट्राचारी INDIA माझा देश आहे.
सारे भ्रष्ट्राचारी माझे बांधव आहेत.
काळ्या पैशावर, सरकारी भूखंडावर आदर्शावर माझे प्रेम
माझ्या देशातील बेईमानी आणि भ्रष्ट्र कारभारा करता असलेल्या विविध चोरवाटांच्या लाल फितीचा मला अभिमान आहे.
त्या बेईमान भ्रष्ट्र राज्य व्यवस्थेचा भाग होण्याचा मी प्रयत्न करीन.
...काळा पैसा परदेशात न ठेवता भारतातच जमीनजुमला बेनामी संपत्तीत गुंतवणूक करेन
मी हाय कमांड , काळा पैसा मोठ्या गुंडांचा मान ठेवीन . लहानान बरोबर मी उद्धटपणाने वागेन.
आमचा भ्रष्ट्राचार, भ्रष्ट्र बेईमान यांच्याशी निष्ठा राखण्याची मी दारू पिवून प्रतिज्ञा करतो.
। अन्नधान्य सडवून त्या पासून दारू करण्याचे कारखाने काढण्यास मी कायद्याने बांधील आहे. माझ्या चमच्यांचे कल्याण आणि समृद्धी यातच देशाचे जनतेचे सौख्य सामावले आहे.

No comments: