प्रकाशजी नमस्कार ,
बऱ्याच दिवसांनी आपला मेल आला. खरच सर्वाना वाटत राजेंनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा .......... पण दुसऱ्याच्या घरात. कारण भविष्यात परत एकदा आपल्या घराण्याची बेअब्रू नको. परत कोणी तरी मूर्खपणे म्हणेल आमचा माणूस त्याचा गुरु होता ...... म्हणून राजे राजे झालेत ......... तर असा आपला मूर्ख समाज आहे. मला मात्र काल शिव जयंतीच्या निमित्याने माझ्या घरा समोरून ज्या मिरवणुका गेल्यात त्या मिरवणुका पाहून आज जर... राजे असते...... आणि त्यांनी या सर्व मिरवणुकीत चाललेला तमाशा पाहीला असता तर........ त्यांनी या मिरवणुका काढणाऱ्यांना हत्तीच्या पाया खाली चिरडण्याची किंवा यांना तोफेच्या तोंडी देवून ठार मारण्याची आज्ञा दिली असती एव्हडा गोंधळ होता .....
......या मिरवणुकात .... काय नव्हते प्लास्टिकच्या पिशव्यातील पाण्याच्या पाऊस..... ...रयतेला पाणी पिण्यास मिळत नाही....... ही गोष्ट वेगळी........ कान बहिरे करणाऱ्या DJ चा कर्ण कर्कश आवाज. आणि गाणी म्हणताल तर ती ऐकूनच राजेंनी कानात शिसे ओतून घेतले असते. मराठी सोडून सर्व भाषेतील अचकट विचकट गाण्यांची रेलचेल होती. गाण्याच्या तालावर दारूच्या धुंदीत तरुणाई ( म्हणावे का ? हा प्रश्न आहे) अंगावरील कपड्यांचे भान हरपून नाचत होती . आता सांगा यांना खरच राजे कळले का? .....आपणास माहीतच आहे. राजे रयताच्या गवताच्या काडीला ही हात लावत नव्हते.....आणि.....आज त्याचं राजांच्या जयंती निमित्य.......... हजारोच्या रेडीमेड पावत्या पक्षांच्या गडा वरून दुकानदारांच्या दुकानात पाठवण्यात आल्या ....... नाही... म्हणायची सोय नाही....कमी म्हणावे तर उद्या दुकानाची नासधूस ठरलेली ....... आता तुम्हीच ठरवा राजे जन्म घेवून तरी काय करतील...........
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.
No comments:
Post a Comment