Translate

Friday, January 14, 2011

पानिपत - एक विजयी पराभव

पानिपत - एक विजयी पराभव

आज १४ जानेवारी २०११. पानिपत च्या रणसंग्रामाला एक चतुर्थांश सहस्त्रक पूर्ण झाले. बरोबर २५० वर्षांपूर्वी पानिपत च्या रणभूमीवर श्रीमंत भाऊसाहेब पेशवे यांच्या नेत्रूत्वाखालील मराठी सैन्य आणि अहमदशाह अब्दाली या दुराणी बादशहाच्या हाताखालील अफगाण सैन्य यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात अफगाण सैन्याने जरी मराठी सैन्याचा पराभव केला तरी मराठी सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलेल्या चिवट लढ्याने शत्रूपक्ष नामोहरम होण्याची वेळ आली होती. केवळ काही जुन्या सरदारांच्या आडमुठेपणामुळे अचानक युद्धाचे पारडे फिरले. प्रत्यक्षात मराठ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. अन्न-पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे सैनिकांना गवत आणि माती खाऊन दिवस काढावे लागले होते. या अवस्थेत अहमदशाह अब्दालीला जरी विजयाची खात्री वाटत होती तरी मराठ्यांचा धडाका पाहून त्याला आपल्या देशात परत जाण्याची शंका वाटू लागली होती. अर्धवट अन्न-पाणी, अपुरा दारुगोळा आणि बाजार-बुणग्यांचे लटांबर यामुळे स्वराज्याच्या रक्षणासाठी गेलेल्या सैन्याला हार खावी लागली.


या युद्धाचे परिणाम फार भयंकर झाले. आख्या महाराष्ट्रात एकही घर असे नव्हते की ज्यातील कोणी मृत्यूमुखी पडले नाही. महाराष्ट्राची एक आख्खी पिढी मारली गेली. अफगाण सैन्याने तर अशी दहशत खाल्ली की अवघ्या ३८ वर्षात अनेक देशांच्या सरहद्दीला धडका देणार्या अब्दालीलाच काय पण अनेक परकीय राजांना भारताकडे येण्याची हिम्मत झाली नाही.
या युद्धात लाखो सैनिकानी रणचंडीला शिरकमलांचा नैवेद्य अर्पण केला. आजच्या विशेष दिवसानिमित्त त्या सर्वाना भावपूर्ण श्रद्धांजली.
॥ जय हिंद ॥
Thanthanpal Parbhanikar Thanthanpal Parbhanikar पराभवाचे ही बाजारीकरण करून त्यास उदात्त ठरविण्याचा हा प्रयत्न म्हणजे आपला पराभव अमान्य करणे. अब्दालीलाच काय पण अनेक परकीय राजांना भारताकडे येण्याची हिम्मत झाली नाही. यासारखा विनोद गेल्या १ लाख वर्षात कोणी सांगितला नसेल. गेल्या ८०० वर्षात भारत गुलामगिरीत होता हे सोयीस्कर रीत्या विसरल्या जात आहे. आणि आज ही पाक बांगला या छोट्या देशांपासून ते चीन हे देश भारतावर दहशदवादी हल्ले करण्याची एकाही संधी सोडत आणि , आणि आपण ..... भाष्य न केलेलेच चांगले.
सुनिल चावरे nahi yethe amhi parabhav amanya nahi karate. pan swatantryanantar jevha swatantra pakistan chi nirmiti zali tevha he halle parat chalu zale. ani "अनेक परकीय राजांना भारताकडे येण्याची हिम्मत झाली नाही.
" ya vakyacha artha asa ahe ki swatantry...a mileparyant tya bhagatun e ekahi akraman zale nahi. aj parakiya desh halla kartat yache karan tyana tevache rajyakarte ani sadhyache rajyakarte yanchyatala farak mahit ahe. joparyant peshwai satte madhe hoti to paryant ekahi parakiya halla zala navta.See More ‎@ Sunil : copying....
Rajesh Prabhu Salgaonkar ‎@ Thanthanpal Parbhanikar : completely disagree.... आपण पराभूत मानसिकता सोडली पाहिजे.....
Rajesh Prabhu Salgaonkar याच युद्धानंतर मराठ्यांची अधिसत्ता उत्तरेत स्थापन झाली... दिल्लीश्वराला मराठ्यांना बाजुला टाकून काही करणे अशक्य बनले.....
सुरवात केली आणि आपण पोटापाण्यास लागलो. या हल्ल्यास कांही दिवसांनी विजयाचे स्वरूप मिळाले आपण गेल्या ८०० वर्षात गुलामगिरीत होतो ह्या कटू सत्य विसरून आज २५० वर्षा नंतर पराभव सुद्धा आपणास विजया सारखा वाटत आहे. पण त्या वेळी पराभव झाला तेंव्हा त्या मारल्या गेलेल्या कुटुंबियांच्या भावना काय आघात झाला असेल हे आपणावर मुंबई संसदे वर झालेल्या दहशदवादी हल्ल्याच्या वेळी अनुभवले आहेच. पण आपल्या बेरकी नेत्यांनी आपला पराभव लपवण्या साठी दुसऱ्या दिवशी मुंबईकर जिंकले म्हणत ढोल वाजवण्यास तर आश्यर्य वाटावयास नको.
Rajesh Prabhu Salgaonkar ‎@ Thanthanpal : तुमचे नाव सार्थ करून उगाच ठणाणा करू नका... जे ऐतिहासिक परिणाम आहेत ते नाकारणार आहोत का आपण...? Thanthanpal Parbhanikar Thanthanpal Parbhanikar तुम्हीच नाकारत आहात मी सत्य सांगितले आहे, ते पचवण्याची आपली हिम्मत नाही.
Rajesh Prabhu Salgaonkar जेंव्हा युद्ध होते तेंव्हा माणसे मारली जातातच... पण माणसे मारली जातात म्हणून मातृभूमीचे रक्षण करू नये असे तुम्हाला म्हणायचे आहे काय...? मराठ्यांनी स्वत:च्या घरादाराची, जीवाची पर्वा नं करता देशाच्या रक्षणासाठि धाव घेतली, या गोष्टीकडे दुर्लक्ष का करावे...?
Thanthanpal Parbhanikar Thanthanpal Parbhanikar माणसे मारली जातातच पण विजय हा महत्वाचा असतो. माणसे मरतात म्हणून युद्ध नको असे आजचे भ्याड अहिंसेचे तत्व बेरकी राजकारणी पराभव लपवण्या साठी करत आहेत जो जिता वो ही सिकंदर . पराभव पचवण्याची हिम्मत लागते.
Mrudula Tambe Did you forget Mohhamad Ghauri attacked India 17 times? It's their (Moghul) mentality to fight repeatedly. If no single attacker came thereafter, it means that they also got hurt similarly human resource wise. The same thing happened with Alexander who won many countries and died in India.
Thanthanpal Parbhanikar Thanthanpal Parbhanikar महमद घौरी, अब्दाली बाबर, इंग्रज पोर्तुगीज , फ्रांस या लोकांनी आपल्या देशावर आणि आता पाक, चीन बांगला देश भारतावर नेहमी नेहमी हल्ले का करतात आपण कोठे कमी पडतो? आपल्या देशा कडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही याची संरक्षण सिद्धता करण्या ऐवजी त्यांनी किती वेळा हल्ले केलेत आणि आम्ही परत कामाला लागलो याचेच कौतुक करत मूर्खाच्या नंदनवनात राहण्या सारखे आहे. पानिपत च्या युद्धा नंतर देश गुलामगिरीतच गेला यामुळे युद्ध नंतर हल्ले झाले नाही असे म्हणत स्वतःची आत्मवंचना करणे आहे . स्वतःला कधी फसवू नका; आत्मवंचना फार वाईट.
Mrudula Tambe आत्मवंचना नक्कीच नाही पण त्यामुळे मराठ्यांचे बलिदान कमी महत्त्वाचे ठरत नाही. नि:संशय सदैव युद्धसज्ज असायलाच हवे.
Rajesh Prabhu Salgaonkar मराठ्यांच्या बलिदानाची "पराभव - पराभव" अशी अवहेलना केल्यामुळेच आजची ही वाईट स्थिती देशाच्या सामरीक क्षेत्रात आली आहे.... म्हणूनच तर "पानिपतावर मराठ्यांनी पराक्रमाची शर्त करून हा देश वाचविण्याची पराकाष्टा केली होती" हे जगाला आणि स्वत:ला ओरडून पुन्हा पुन्हा सांगावेच लागेल.... तरच नागरिकांची मानसिकता सुधारेल....
Thanthanpal Parbhanikar Thanthanpal Parbhanikar माझे सुद्धा तेच म्हणणे आहे. पण अहिंसेच्या महात्म्याने आपली नसबंदी केल्या मुळे पराभवास आम्ही कसे सामोरे गेलोत आम्ही दुसऱ्यावर हल्ले केले नाही आमच्या वर हल्ले झाल्यावर मुंबईची जीवन वाहिनी कशी सुरु झाली मुंबईकर कामावर कसा गेला याचेच ढोल पिटले जातात. पण मुंबईकराची रोजीरोटीची भावना मजबुरी कोणी समजून घेत नाही. तो नाईलाजाने सरकारला दुषणे देत कामावर जातो . कसाब अफजल गुरूला बिर्याणी खाऊ घालणारे मायबाप सरकार यांना थोडेच खाऊ घालणार .
सुनिल चावरे @महमद घौरी, अब्दाली बाबर, इंग्रज पोर्तुगीज , फ्रांस या लोकांनी आपल्या देशावर आणि आता पाक, चीन बांगला देश भारतावर नेहमी नेहमी हल्ले का करतात आपण कोठे कमी पडतो? ....
amhi ase nahi mhanat ki aplya deshakade koni vakadya najrene pahat nahi. tya...che spashtikaran mi dilele ahe. pan 1761 che panipat ani 1857 cha uthav jyanantar peshwai sampali tya kalat konihi parkiy halla kela navta.See More Rajesh Prabhu Salgaonkar मराठ्यांच्या बलिदानाची "पराभव - पराभव" अशी अवहेलना केल्यामुळेच आजची ही वाईट स्थिती देशाच्या सामरीक क्षेत्रात आली आहे.... म्हणूनच तर "पानिपतावर मराठ्यांनी पराक्रमाची शर्त करून हा देश वाचविण्याची पराकाष्टा केली होती" हे जगाला आणि स्वत:ला ओरडून पुन्हा पुन्हा सांगावेच लागेल.... तरच नागरिकांची मानसिकता सुधारेल....
Paresh Paradkar ‎@mrudula, Alexander didn't die in India but in Babylon after returning from India.. Thanthanpal Parbhanikar Thanthanpal Parbhanikar 1857 cha uthav jyanantar peshwai sampali tya kalat konihi parkiy halla kela navta. १८५७ नंतर आपण मुळातच स्वतंत्र नव्हतो. इंग्रज आपल्यावर राज्य करत होते, यामुळे त्याकाळी हल्ला झाला नव्हता असा पुरुषार्थ करण्यात अर्थ नाही. आणि १९४७ मध्ये भारत... स्वतंत्र झाला की लगेच काश्मीर वर झालेल्या हल्ल्याला आपण ज्या मनोवृतीने सामोरे गेलो त्या मुळे हल्ले करणाऱ्याची हिम्मत इतकी वाढली ती दिल्ही तील लोकशाहीच्या मंदीरावर संसदेवर हल्ला करण्या पर्यंत पण आपल्या नेत्यांनी काय उजेड पाडला . या सर्व काळात फक्त शास्त्रीजींनी चोख उत्तर दिले पण, गड आला पण सिंह गेला अशी आपली अवस्था झाली. पण आजच्या पत्रकारांना मिडीयाला गांधी नेहरू परिवाराच्या भाट असणाऱ्यांना याचे भान नाही.See More
सुनिल चावरे mi pan tech mhantoy ki nantar halle zale te nishkaam rajyakartyanmule. alyawar halle zale nahi he mhananya magcha maza heu keval tevachya marathi satteche peshwaiche kautuk karne ha ahe

No comments: