Translate

Thursday, January 27, 2011

ग. दि. माडगुळकर यांची माफी मागून .....





ग. दि. माडगुळकर यांची माफी मागून .....
हे राष्ट्र माफियांचे हे राष्ट्र भ्रष्ट्राचाऱ्यांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य नौकर, नेतेशाहीचे


 


"आदर्श"भूखंडदक्ष भूमी कॉन्ग्रेसभाजापाची
कोट्ट्यावधीची उड्डाणे येथे भ्रष्ट्राचाराची
शीर शरमेने खाली व्हावे स्वातंत्र्यवीरांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भूखंड माफियांचे

येथे नको निराशा जळीताच्या घटनेने
राजकारण्यास बोध केला येथेस नौकारशाहीने
हा देश स्तन्य प्याला दारू  अन्नधान्याची

आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य नेत्यांच्या दारू कारखान्यांचे 

जेथे माफियांचा सन्मान नित्य आहे
जन लोकशाहीचा पायाच असत्य आहे

येथे सदा निनादो जयगीत बेईमनिचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र भष्ट्राचाराचे


Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com





--

No comments: