डीडीच्या दुनियेत
दुसरा भाग वाचल्यावर मनात उमटलेली उस्फुर्त प्रतिक्रिया :- डी डी सरजी महाबळेश्वरचे गौडबंगाल या हेडींग मध्ये थोडा बदल करावा असे वाटते.महाबळेश्वर ऐवजी INDIA भारताचे गौडबंगाल हे हेडींग आपल्या लेखास सार्थ आहे असे वाटते. लेखाच्या शेवटच्या दोन पैरेग्राफ आणि दैनिक ऐक्यच्या त्यावेळच्या बातमीनुसार,वाचून अरे हा प्रकार ही बातमी तर आपल्या गावातीलच आहे असे वाटते.आज भारतात सर्व शहरातच नव्हे तर खेड्या पाड्यात सुद्धा हेच चित्र सगळी कडे पहावयास मिळते. आज मराठवाड्यातील खेड्यातल्या जमिनीचे भावं ऐकून चक्कर येण्याची वेळ आली आहे. ७० लाख ते १ कोटी रुपये एकर हा शेत जमिनीला भाव भेटत असेल तर शेती करणे परवडत नसताना शेतकरी कश्याला शेती करेल. या भाववाढी मागचे गौडबंडल मोठ्या प्रमाणातील भ्रष्ट्राचार काळा पैसा हा यात गुंतवला जात आहे. परदेशी बँकात पैसा ठेवण्या पेक्षा जमिनीत पैसा दडपला जात आहे. शहरे उभारण्या बरोबरच खेडी शेती उजाडण्याचे कारस्थान हे कांही वर्षात देशाला अधोगती कडे घेवून जाईल हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. भूदान ते भूखंड माफिया हा गेल्या ६३ वर्षाचा आपल्या स्वतंत्र भारताचा अधोगतीचा प्रवास विकासाचे ढोल वाजविणाऱ्या अ र्थ त ज्ञ ? पंतप्रधानांच्या लक्षात हा अनर्थ येत नाही ही लोकशाहीची शोकांतीका आहे. या बाबत आणि जमिनीच्या मालकी हक्क धारणेवर मर्यादा आणण्या करता अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा करण्याची वेळ आली आहे. कृपया आवाज उठवावा.
No comments:
Post a Comment