Translate

Wednesday, January 26, 2011

महाराष्ट्राचा बिहार झाला.


तांभाळे ते सोनवणे... आणखी किती बळी?
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, January 26, 2011 AT 12:00 AM (IST)
पुणे - नाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेटवून देऊन त्यांचा खून करण्याच्या घटनेने सरकारी कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई येथे बाजार समितीचे प्रशासक ए. जी. तांभाळे यांचा खून नऊ वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्याचा शासकीय कर्तव्य बजावत असताना खून झाल्याचा तिसरा प्रकार मनमाडजवळ घडला आहे. जनतेच्या प्रतिक्रिया
On 26/01/2011 07:24 AM parbhanikar said:
सोनवणे यांच्या कुटुंबियांना ते नौकरीवर हजर आहेत असे गृहीत धरून त्यांचा पगार बोनस नियमितपणे एक तारखेला त्यांच्या घरी त्यांच्या निवृत्तीकाळा पर्यंत पोहंचवावा. हि अपेक्षा. पण भ्रष्ट्र राजकारणी आणि मुजोर नौकरशाही असे करणार नाही. कायद्यात अशी तरतूद नाही म्हणून आडकाठी आणतील. पण गुन्हेगारांना मात्र कमीतकमी शिक्षा होईल त्यांना जामीन मिळावा म्हणून मात्र जरूर प्रयत्न करतील. आणि परत राकेल माफिया मोकळे होतील. आणि नौकारशाही सुद्धा म्हणेल उगीच जीव देण्या पेक्षा लाच खालेली बरी. मेरा देश महान 



prashant said:
महाराष्ट्राचा बिहार, उत्तर प्रदेश व्हायला आता वेळ नाही लागणार, आता लवकरच मराठी लोक बिहार मध्ये नौकरी साठी जातील, नेते आणि police चे हार्दिक अभिनंदन. असेच राज्य करा कॉम्मोन लोकांवर.
On 26/01/2011 02:33 PM Sharad Puranik said:
शासनाचे अभिनंदन. महाराष्ट्राचे नाव बदलण्याच्या दिशेने घोड दौड सुरु आहे. वर्षभरात बिहारचे आणि महाराष्ट्राचे नामांतर होईल.
On 26/01/2011 09:01 AM milind jawale said:
अशा घटना घडण्यास राज्यकरते जबादार आहेत निवडणुका जिंकण्या साठी अतोनात पैसा खर्च केला जातो तो कोठून येतो तर तो पैसा पोपट शिंदे सारखे लोक पुरवितात साहजिकच वेळोवेळी राज्यकर्त्यांना त्यांना सांभाळून घ्यावे लागते त्यामुळे पोपट शिंदे सारखे उन्मत्त होतात व अशा घटना घडतात २६ जानेवारीच्या आदल्या दिवशी अशी घटना घडावी या सारखे दुर्दैव नाही कदाचित पोपट शिंदेला शिक्षा होईल सुद्धा पण लगेच नवीन पोपट शिंदे तयार केला जाईल हे दुष्ट चक्र थांबवण्या साठी जनतेने व मेडिया ने नेटाने प्रयत्न केले पाहिजे

महाराष्ट्राचा बिहार (२००६ पूर्वीचा) होण्याकडे जी वाटचाल चालू आहे ती अतिशय गंभीर बाब आहे.
On 26/01/2011 12:25 PM DHANANJAY GOKHALE said:
वाळू तस्कर,बेकायदा काम करणारे, सरकारी जमीन लाटणारे बिल्डर,अवैध काम करणारे यांची सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षात एक लौबी तयार झाली आहे.त्यामुळे अशा घटने विरुद्ध न्याय मागणे म्हणजे दरोडेखोर व चोर राजाकडे न्याय मागीताल्यासारखे आहे.
On 26-01-2011 07:10 AM VASANT GALATAGE said:
सर्व घटना मोंगल शाहीची आठवण करून देतात. शासनकर्त्यांना प्रमाणिकपणे विचारकरून योग्य कारवाही प्रामाणिकपणे करण्याची वेळ आली आहे. लोक जरी कांही करू शकले नाहीत तरी देव/निसर्ग आपले काम न्याय पूर्वक करत असतो. हि गुंडागर्दी थाब्विण्याची सद्बुद्धी भगवान साबंधीताना देवो हीच देवाकडे प्रार्थना. योग्य जलद कार्यवाही हीच सोनावणे साहेबाना खरी श्रद्धांजली ठरेल. आज राष्ट्रध्वज फडकताना हे राष्ट्र प्रेमाची/भक्तीची जाग येवूद्या व गांधीजींच्या स्वप्नातील भारत साकार होऊद्या .
On 26/01/2011 07:05 AM Datta said:
अरे या असल्या माफिया सरकारकडून दुसरी काय अपेक्षा करणार .नुसते मारणार्याला न पकडता मुख्य सूत्रधाराला पकडून फाशी द्याला पाहिजे. कायदा सुव्यायास्थितीत नाही किंवा राजकारण्यांची साथ असते म्हणून तर अश्या लोन्कांचे फावते .
On 26-01-2011 06:47 AM VASANT GALATAGE said:
उल्लेखित सर्व घटना लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या, आणि लोकप्रतिनिधीना नैतीकतेबाबाद विचार करण्याची वेळ आली आहे. कर्तव्यदक्ष अधिकार्यांचा सन्मान केला पाहिजे. त्यांच्यावर्तीच अप्रत्यक्षरित्या कार्यवाही केली जाते, मग अशाने कोण पुढे येईल? नवे मुख्यमंत्री स्वछ प्रतिमेचे आहेत.त्यांच्याकडून कडक कार्यवाहीची अपेक्षा आहे. ती पूर्ण होईल का? मोंगलाई कशी होती याचे दर्शन होत आहे. देवच सर्वाना सद्बुद्धी देवो आणि जनतेचे रक्षण करो हीच कामना.
On 26/01/2011 05:23 AM satya said:
केवढे हे क्रौर्य ? असा प्रसंग खरोखर कुणावरही येवू नये. कै. सोनावणे आपले कर्तव्य पार पाडीत असताना मरण आले याची नोंद घेऊन त्याना मरणोत्तर पुरस्कार द्यावा व त्यांच्या कुटुंबालाही पेन्शन द्यावी. काही दिवसांपूर्वीच नव्या मुंबईत एका पोलिसावर बनावट रिक्षा चालकाकडून असाच हल्ला झाला होता.
On 26/01/2011 04:52 AM Kishor K said:
राजकारण्यांनी आणि सरकारी नोकरांनी पोसलेला भ्रष्ट्राचार पहा कसा त्यांनाच भोवतोय? "कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ" हे म्हणतात ते काही खोटे नाही. राज्यकर्ते आत्ता तरी सुधारणार कि नाही?
हे असाच सुरु राहिला तर काही वर्ष्यात छोटा इराक,इराण,सारखे प्रांत आपल्याच देश्यात निर्माण होतील...राजकारणी मंत्री महोदय मात्र निषेध नोंदवून इतर घोटाळे करण्यास मोकळे...

No comments: