कांहींच न करता समाजसेवेचा आव आणण्याचा एक तमाशा ( समस्त तमाम तमासगीरांची माफी मागून ) म्हणजे या धावण्याच्या स्पर्धा. देशा करता धावा,स्वातंत्र्य एकता बंधुत्वा करता धावा , शांतते साठी धावा. गल्ली पासून दिल्ही पर्यंतच्या फडतूस नेत्याच्या वाढदीवसा करता धावा. आशियाड खेळासाठी , राष्ट्रकुल खेळासाठी लंडन पासून समस्त भारतभर धावून देखील कलमाडीचा भ्रष्ट्राचार कमी झाला नाही. जर अश्या धावण्या मुळे देशभावना निर्माण होत असेल तर हा भ्रष्ट्र कारभार व्हावयास नको होता . एव्हढे धावून सुद्धा हा प्रकार कसा झाला? हा प्रश्न सामान्य माणसाला भेडसावतो.
दहशदवाद्यांनी मुंबई, देशावर हल्ला केला की आम्ही हिम्मत हरलो नाही मुंबई जिंकली म्हणून धावा (म्हणजे काय? हे कोणी समजून सांगितले तर मी त्याचा जन्म भर आभारी राहीन) त्यांच्या वर हल्ला करू नका बर! नाही तर महात्म्याच्या हृदया ला यातना होतील . जिवंत नागरिक यातना होवून मेले तर चालेल पण आमच्या सर्वधर्म समभाव या दुप्पटी धोरणाला धक्का बसता कामा नये. मेणबत्ती जाळत मूक मोर्चा काढण्याचा प्रकार सुद्धा असाच आहे. या मूक मोर्च्याचा आणि धावण्या च्या कार्यक्रमाचा फक्त चमको नट नट्या कलमाडी सारखे राजकारणी अनिल सारखे धंदेवाईक आणि मिडीयाला च होतो. सामान्य माणसे फक्त प्रेक्षक असतात. त्यांना अश्या धावण्याच्या नाटकात रस नसतो. रोजचे जीवन जगत असताना त्यांची जीव तोडून धावण्याची शर्यत कोणत्या ही पदकाच्या अपेक्षे शिवाय चालूच असते. त्या कडे ना मिडियाचे ना राजकारण्याचे लक्ष असते.
No comments:
Post a Comment