Translate

Thursday, January 20, 2011

दादा कोंडकेचे वर ढगाला लागलीय कळ पाणी थेंब थेंब गळ चालत नाही

ताकाला जावून भांड लपविणे किंवा कडी लावा आतली मी नाही बाई त्यातली या सारखी गत या साहित्य क्षेत्रात कब्जा करून बसलेल्या मान्यवरांची झाली आहे. मालवून टाक दीप चेतवून अंग अंग राजसा किती दिवसात लाभला निवांत संग असे गाणे चालते पण सामान्य जनतेने डोक्यावर घेतलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये सलग ९ सिनेमे रौप्य महोत्सवी म्हणून गौरव प्राप्त झालेल्या दादा कोंडकेचे वर ढगाला लागलीय कळ पाणी थेंब थेंब गळ हे मराठमोळ गाण चालत नाही.. मराठमोळी लावणी चालत नाही .
दादांना किंवा लावणीला नाव ठेवणारी अनेक मान्यवर मात्र चोरून हे सर्व पाहतात एन्जोय करतात. ही यांची . शोकांतीका दादा कोंडकेंचे मराठी चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांनी धुवांधार यश मिळविले आहे. ते एक प्रामाणिक कलाकार होते. पण सदाशिवपेठी वृतीने त्याना नेहमीच वाळीत टाकल्या सारखी वागणूक दिली, नावे ठेवली पण दादांनी कधी याची पर्वा केली नाही . बहुजना पैकी एखादा नवनिर्मित करू लागला तर आपल्या स्थानास धक्का बसेल या भीती पोटी, आकसाने अश्या प्रतिभावान लोकांना संपवण्याचे कारस्थान युगानुयुगे  एकलव्या च्या काळा पासून चालत आलेले आहे. अर्जुना करता एकलव्याचा  अंगठा तोडणारे  द्रोणाचार्य यांना स्वत;चे म्हणून मोठे वाटतात. जसजसा शिक्षणाने बहुजन समाज शिक्षित होवू लागला तसे यांचे पितळ उघडे पडत गेले, ही समाधानाची बाब आहे.

No comments: