Translate

Friday, January 7, 2011

शिक्षण आणि आरोग्य सेवेचा यांनी जो खेळखंडोबा केला तो गेल्या १० हजार वर्षात कोण्याही राजकारण्याने केला नसेल

आपण अश्या देशात राहतो जेथे नागरिकांच्या जीवाशी,भावनांशी कंपन्या नव्हेच तर शासन सुद्धा राजरोस खेळते. जागतिककरणाच्या आणि महासत्ता बनण्याच्या हव्यासापोटी कोणतेही कायदेकानून न पाळता जनतेच्या आयुष्याला धोका निर्माण करणारे प्रचंड प्रकल्प सत्तेच्या जोरावर जनतेचा आवाज दडपून, त्यांनाच देशद्रोही ठरवून रेटले जात आहेत .वीज टंचाई चे जाणूनबुजून निर्माण केलेलं भूत आहे. भारता पेक्षा पाशिमात्यांचा परकीय देशाला फायदेशीर असे करार केले जात आहे. आदीवासींच्या जमिनी हडप करून आपल्या पापावर पांघरून टाकण्या साठी सेन सारख्यानाच तुरुंगात डांबून जनतेचा आवाज दडपण्यात येत आहे.


IPL सारख्या बाजारू स्पर्धा म्हणजेच राष्ट्रीय खेळ अशी बतावणी करून अफूच्या भांगे सारखी गुंगी  जनतेला नशा येईल अशी पद्धतशीर योजना आखली जात आहे. कॉमन वेल्थ चा प्रचंड भ्रष्ट्राचार्यांवर कार्यवाई होवू नये म्हणून त्या खेळ आयोजनाचा देश भावनेशी संबंध जोडत घरमे बारात आयी म्हणत जनतेला बहकवले जाते.  हा डाव, बेईमानी  उघड झाली  की ललित मोदी कलमाडी सारख्यांना बळीचा बकरा बनवले जाते , जनतेच्या डोळ्यात धूळ नव्हे तर लाल मिरचीची पूड फेकत पुरावे नष्ट झाल्यावर CBI च्या धाडीचे नाटक केले जाते .  आणि मग लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवताना आम्ही भ्रष्ट्राचारा विरुद्ध, कडक कायदे करणार आहो म्हणत स्वत:ला मिस्टर क्लीन म्हणून मिरवले जात आहे.
सरकारी नौकरशहा आणि राजकारणी नेत्यांनी तर भूखंड हडप करण्याचा एकमेव धंदा सुरु केला. भूदान चळवळी पासून भूखंड हाडपणे अशी आपली यांची अधोगती झाली आहे. शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडले म्हणून मध्यम वर्गच नव्हे तर श्रीमंत वर्ग सुद्धा धास्तावला आहे. याची मिडिया जोरात चर्चा करते. पण त्याही पेक्षा आमच्या खेड्यांची परीस्थिती भयानक आहे. आज एकेका एकर जमिनीचे भाव प्रति एकरी कोटीच्या कोटी रुपयांचे उड्डयन करून  कधीच वर गेले आहेत. शेती करण्यार्यावर सिलिंग चे भूत आहे. पण नफाखोरी करता जमिनीचा सट्टा खेळणाऱ्या करता जमीन राखण्याचे कोणतेही बंधन नाही. कोट्यावधी किमतीची जमीन विकत घेवून त्यावर शेती करणे शेतकऱ्याला कसे परवडणार याची चिंता करण्यास आपल्या महान अर्थतज्ञ पंतप्रधानाना वेळ नाही. कारण पाक अतिरेक्यांचे दहशतवादाचे पुरावे घेवून जगभर फिरण्यातच त्यांचा वेळ वाया जातो, यामुळे अतिरेक्यान विरुद्ध कार्यवाई करण्यास ही वेळ मिळत नाही तेथे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना कोण विचारतो.  आजवर भूखंड हडप करण्याची स्पर्धा होती. आता तर नदीच्या वाळू उपश्या करता  एकमेकांचे मुडदे पडण्या इतपत यांची स्पर्धा गेली, फुकटच्या वाळूला सोन्याचा भाव आला. या स्पर्धेतून सामान्य माणूस ज्याची या व्यवसायावर रोजीरोटी तो कधीच बाहेर फेकला गेला. शिक्षण , साखर, सहकार, भूखंड, बिल्डर माफिया सारखे वाळू तस्कर माफिया खेडोपाडी उदयास आले. त्यांचेच हित जपण्यासाठी राजकारणी राबत असतात.सामान्य माणसाचा  विचार करून या नेत्यांचा  काय फायदा. त्यांना तर केसरी, पांढरा हिरवा निळा दहशदवाद यातच मतलब आहे.
आपसातील मतभेदामुळे, लालचेने एखादा आदर्श घोटाळा उघड होतो. या बेईमानी ची जास्तीत जास्त सजा काय तर पद सोडणे , नौकरी वरून काढून टाकणे. यांना कधी जेल मध्ये जावे लागत नाही, CBI ही सरकारची बटिक यांचे जाब-जबाब  यांच्या सोयीने, यांच्या घरी जावून घेते .सामान्य माणसाने १०० रुपयांची लाच घेतली तर जेल मध्ये टाकले याते. यांना हा न्याय लागू नाही.
जनतेला रास्त भावात अन्नधान्य मिळत नसताना पैश्याच्या लालसेपायी धान्यापासून दारू तय्यार करण्याचे परवाने फक्त राजकारणी नेत्यांना जनतेला अंधारात ठेवून देण्यात आले. पाप उघड झाले की सडक्या धान्या पासून आम्ही दारू करणार आहोत आणि यामुळे शेतकऱ्याला खराब धान्याचे दोन पैसे जास्त मिळणार आहेत   असे निर्लज्जपणे समर्थन केल्या जात आहे. यांची तळी उचलण्यास मिडिया प्रसार माध्यमे संपादक , वार्ताहर तय्यारच असतात.कारण या लुटमारी, वाटमारी त्यांचा हिस्सा त्यांना मिळालेला असतो.
कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेता शहरा पासून ते जंगलातील आदीवासियांच्या हजारो एकर जमिनी पद्धतशीरपणे हडप करून हजारो करोडो रुपयांचे बाधकाम कायदे कानून धाब्यावर बसवत केल्या जाते. कोणी माहितीच्या अधिकारात हा प्रकार उजेडात आणला तर सरळ त्याला गोळ्या घातल्या जातात. पर्यावरण विभागाने हरकत घेतली  करोडो रुपयांचे बेकायदेशीर बांधकाम पाडले, रोखले तर देशाचा  विकास कसा होणार, उद्योगजगत काय म्हणणार सांगत सरकारवरच या बेकायदेशीर धंद्यास कायदेशीर करा म्हणून दबाब आणला जातो.
शिक्षण आणि आरोग्य सेवेचा यांनी जो खेळखंडोबा केला तो गेल्या १० हजार वर्षात कोण्याही राजकारण्याने केला नसेल.  आज या सेवा उपयोग करणाऱ्या करता वापरल्या जात नाही तर कंपन्या, विमा कंपन्या  विक्रते यांच्या करता राबवल्या जात आहेत. आणि डॉक्टर्स सुद्धा या व्यवस्थेत बळी पाडले जात आहेत.
http://kayvatelte.com/2011/01/07/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AB-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%9C%E0%A4%BE/
काका .१५ पैसे म्हटलं तरी भारताच्या लोकसंख्येच्या मानाने ही रक्कम प्रचंड होते. एक कॅप्सूल माणशी धरली तरी रोज
१५ कोटी X ३६५ दीवस बरोबर वर्षाला आपण  ५४७५ कोटी रुपयांना लुबाडले जात आहोत. कारण या कंपन्या कांही साधू संत नाहीत की त्या .१५ पैसे कमी खर्च आला म्हणून तुमच्या गोळीची तेव्हढी किमत कमी ठेवतील. आणि आज साधू सुद्धा रावणाला लाज वाटेल असे वागू लागले आहेत. त्याने कमीतकमी सीतेला तीच्या मर्जी विरुद्ध हात तर लावला नाही. पण आजच्या सीता या संन्याश्यांच्या वासनेला बळी पडत आहेत. थोडे विषयांतर झाले पण राहवले नाही म्हणून लिहिले. प्रसिद्ध करण्याचा नाकारण्याचा आपणास अधिकार आहे.
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

No comments: