अमोल अ. अन्नदाते यांचा वैद्यकीय व्यावासिक नित्तिमतेच्या लेख मालिकेतील दूसरा लेख डॉक्टर यांच्या सौजन्याने अनावश्यक शस्त्रक्रियांविषयी चर्चा करताना एक गोष्ट सुरुवातीलाच अधोरेखीत करणे गरजेचे आहे. सरसकट सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया अनावश्यक असतात असे म्हटले तर मग वैद्यकीय क्षेत्रात शल्यचिकित्सा विभागच जन्माला का आला? असे म्हणावे लागेल. पण मात्र साधारणत: १० ते २० टक्के शस्त्रक्रिया व शस्त्रक्रियासदृश प्रोसिजर्स अनावश्यक असू शकतात.
नुकताच वैद्यकीय क्षेत्रातील अनावश्यक शस्त्रक्रियांच्या प्रथेवर दृष्टिक्षेप टाकणारा विक्रम गोखलेंचा ‘आघात’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विख्यात शल्यचिकित्सक एम.एस.चे शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरला एका २२ वर्षांच्या मुलींच्या दोन्ही ओवरिज (अंडाशय) काढून टाकण्याचा आदेश देतात. ती डॉक्टर एक ओवरी प्रिझर्व केली जाऊ शकते असा युक्तिवाद करत दोन्ही ओवरीज काढण्यास नकार देते.