नांदेड चा आता शाळामध्ये ""आदर्श घोटाळा":- .......नांदेड जिल्हय़ातील प्राथमिक व मा
...ध्यमिक शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवून कोटय़वधी रुपयांची अनुदाने लाटणाऱ्या संस्थाचालकांमध्ये सुमारे ९० टक्के राजकारणीच आहेत.
...नांदेड जिल्हय़ातील सगळय़ा शाळांमधील विद्यार्थ्यांची चार दिवसांत
पटपडताळणी करताना मतदानाच्या वेळी वापरण्यात येणारी शाई मुलांच्या बोटांना
लावण्यात आली. तरीही परराज्यातून वा शेजारच्या जिल्हय़ातून विद्यार्थी आणले
जातील, असे लक्षात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या
वाहतुकीस बंदी घातली. या तपासणीनंतर जे सत्य बाहेर आले, ते डोळे
विस्फारायला लावणारे आहे. सुमारे ""दीड लाख"" विद्यार्थ्यांची बोगस नोंदणी
करून संस्थाचालकांनी शासनाची लुबाडणूक केल्याचे त्यात स्पष्ट झाले.
....विद्यार्थीसंख्या खोटी दाखवायची आणि शिक्षकांची पदे निर्माण करायला भाग
पाडायचे. या पदांवर शिक्षक भरती करताना प्रचंड भ्रष्टाचार करायचा आणि नंतर
खोटय़ा विद्यार्थ्यांच्या नावे मिळणारे अनुदानही लाटायचे, असा हा प्रकार
आहे.
...नव्या आकडेवारीनुसार तेथे किमान तीन हजार शिक्षक अतिरिक्त
ठरण्याची शक्यता आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना
काम देणेही शासनाला शक्य होईल की नाही, हे सांगता येत नाही. याच नांदेड
जिल्हय़ात २००४ मध्ये अशीच पटपडताळणी झाली होती. तेव्हा सुमारे ३५० शिक्षक
अतिरिक्त ठरले होते. त्यातील अडीचशे शिक्षकांना कोठे ना कोठे काम मिळाले.
परंतु सुमारे शंभर शिक्षक आजही विनाकाम वेतन घेत आहेत.
....एकाच
विद्यार्थ्यांचे नाव चार-चार शाळांमधील पटावर नोंदविण्यात येते आणि नव्या
तुकडय़ांची मागणी केली जाते. आताही शासनाकडे आठ हजार तुकडय़ा वाढवण्याचे
प्रस्ताव आले आहेत.
....बोगस तुकडय़ा काढून कोटय़वधी रुपयांचा मलिदा खाला आहे,See more
1 comment:
भ्रष्टाचारापासून दूर असलेले एकमेव क्षेत्र म्हणून ज्या शिक्षा व्यवसायाकडे बघितले जायचे ते क्षेत्र आज आपादमस्तक भ्रष्टाचाराच्या गाळात बुडून गेले आहे.सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारणी आणि धनदांडग्यांच्या ताब्यात गेल्यात. आपल्याच संस्था आणि आपलेच नातेवाईक नोकरीवर असे चित्र अख्ख्या महाराष्ट्रात पहावयास मिळते पण याचा खरा फटका बसतो आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला. एकतर त्याची शैक्षणिक गुणवत्ता डावलून त्यांच्याजागी पैसे मोजानार्यांना नोकरी मिळते आणि एक पालक म्हणून आपल्या मुलांना शिकवतांना असल्या दर्जाहीन शिक्षकांच्या हातात आपल्या मुलांचे भवितव्य नाईलाजाने सोपवावे लागते.
Post a Comment