Translate

Sunday, September 4, 2011

यांचे सारे विशेषाधिकार कडून टाकावेत अधिक कर्तव्ये लागू करावी

रामदेवबाबा ,त्यांचे सहकारी, कंपन्या आणि .....आता ................
टीम आण्णा चे प्रामाणिक, सामान्य आम आदमी असलेले कार्यकर्ते यांना सरकार ने टार्गेट करण्यास सुरुवात करून भ्रष्ट्र कारभारा विरोधातील आंदोलन दडपून टाकण्याचा जोरदार प्रयत्न बेईमान सरकार करत आहे. किरण बेदी, प्रशांत भूषण केजरीवाल एव्हढंच काय ओमपुरी यांनी या भ्रष्ट्र खासदारा विरुद्ध केलेले आरोप हे १००% नव्हे तर १०१% खरे आहेत. भारताच्या १२४ कोटी लोकांचे हेच मत आहे. आज जर खासदारांच्या वर्तनावर  सार्वत्रिक मतदान मतदान घेतले तर ९९% जनतेचे हेच मत आहे हे दिसून येईल
६५ वर्षात पहिल्यांदाच यांच्या बेईमानी, भ्रष्ट्राचार, कबुतरबाजी, अश्या अनेक काळ्या धंद्या ना प्रथमच लोकक्षोभा ला सामोरे जावे लागत असल्या मुळे आणि भविष्यात हा वणवा वाढतच जाणार आणि आपल्या निरंकुश सत्तेला लगाम बसणार हे लक्षात आल्या मुळेच खासदारांचा हा सर्व थयथयाट चालू आहे. ज्या गुन्हेगारांना जेल मध्ये जावे लागले असते ते आपल्या BLACK MAKING ताकदीचा गैरफायदा घेत सत्तेत राहात आहेत हे या देशाचे दुर्देव आहे. सत्तेतील लोकांना कोणताही विशेष अधिकार असत नाही उलट त्यांना आम जनते पेक्षा जास्त कर्तव्ये , जबाबदाऱ्या पर पाडाव्या लागतात. यांचे सारे विशेषाधिकार कडून टाकावेत अधिक कर्तव्ये लागू करावी. आणि हे कर्तव्य पालन न केले तर त्याच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंदवावा.

No comments: