Translate

Tuesday, September 13, 2011

माझ्या जवळचा एक सत्य अनुभव मित्रांसाठी इथे देत आहे.
सोसायटीत ब्राह्मण, मराठा, दलित या तिन्ही समाजाची घरे शेजारी आहेत.
दोनतीन महिन्यातच इथे रहायला आले आहेत, अजून माने जुळायची आहेत.
अशात दलित समाजाच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलाने,  मराठा समाजातील मुलीची
शाब्दिक छेड काढली. मुलीने घरी सांगताच साहजिकच तिचे वडील संतापले. आणि त्यांनी
रागाच्या भारत संबंधीत मुलाच्या घरी जाऊन दोन चापट्या मारल्या.
नंतर दलित मुलाचे आईवडील घरी येईपर्यंत त्यांचे त्या भागात राहणारे
समाजसेवक पुढारी समाज बांधव घरी हजर झाले. तुमचा मुलगा नादान आहे.
जरी त्याचे चूक असेल तरी, त्यांनी त्याला घरी येऊन मारायची हिम्मत केलीच कशी...?



चला आपण त्यांना धडा शिकवू, जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून पोलिसात तक्रार देऊ.
असा आग्रह करून वातावरण तापवू लागले. मुलाची आई जवळच उभी राहून सगळे ऐकत होती.
आता ती पुढे येऊन म्हणाली,..... 'त्यांनी मारण्याऐवजी आम्हाला सांगायला पाहिजे होते हे ठीक आहे.
पण त्यांनी जातीवाचक शिवीगाळ मुळीच केलेली नाही. शिवाय चूक आमच्या मुलाची आहे... आज जर त्याच्या चुकीला
बळ दिले तर तो उड्या मोठा गुंड होईल... आधीच दलित समाजाला चांगल्या वस्तीत सामावून जायला अडचणी येतात. त्याचे कारण हेच आहे.
त्यांच्या जागी मी असते तर मीही संतापाच्या भारत कदाचित हेच केले असते. असे म्हणून तिने मुलाचा कान धरला, त्या
मुलीच्या वडिलाकडे नेऊन चूक कबुल करायला कावली. मुलाच्या वतीने स्वत:ही माफी मागून घरी घेऊन आली..."
जातीवाचक शिवीगाळीचा आग्रह धरणाऱ्या पुढाऱ्यांना हात जोडून म्हनाली, 'भाऊ, माझ्या मुलाला चांगला बनायला मदत करा,
गुंड बनवू नका..." बिचारे चडफडत परत गेले. या केसमध्ये पन्नास एक हजाराचा हात मारायची संधी हुकली म्हणून चिडले.
पण मित्रानो, आज ती दोन्ही कुटुंबे, दहा वर्षापासून एकत्र राहत आहेत.
त्यांचे खूप मधुर संबंध आहेत, बाहेर जातांना एकमेकांच्या घरी चावी ठेवून जातात.
मुलीचे लग्न होऊन सासरी गेलीय. मुलगा नोकरीला लागला, तेंव्हा त्याच मुलीच्या वडिलांनी ओळखीने शिफारस केली.
. कधी त्या प्रसंगाची आठवण झाली, तर म्हणतो,
 'माझ्या आईने मला माणूस बनवले, मी त्या मुलीला वाईट मित्रांच्या पैजेखातर छेडले होते...
माल मारहाण झाली तेंव्हा ते पळून गेले होते. आणि गम्मत म्हणजे त्यात त्या चिथावणी देणाऱ्या पुधार्याचाच मुलगा होता .
जर तेम्हा पोलीस केस झाली असती तर माझी खोड्या पचवण्याची ताकद वाढली असती...'
विवेक सांभाळला तर माणसे सांभाळली जातात.
दुसरीकडे त्या नेत्याचा  मुलगा आता दारू आणि ड्रगच्या व्यसनात बुडून गेला आहे.
पुढारी महाशय आज आज परेशान आहेत.
सदरील भगिनी ही माझी मानलेली बहिण आहे.
ज्या दिवशी तिने आपल्या मुलाचा कान पकडून त्याला सन्मार्गाला लावले,
त्यादिवशी बुद्ध हसला होता, होय त्या दिवशी बुद्ध पौर्णिमाच होती....!
तुम्हाला हा अनुभव सांगतांना तो माझ्या मनात पुन्हा हसत आहे.
आपल्याला आवडला असेल तर हा अनुभव दुसर्याना सांगा.
बुद्ध पुन्हा पुन्हा हसेल... हसतच राहील... पौर्णिमाच काय, कधीही आकाशाकडे पहा, त्याचे निळे स्मित
तुम्हाला शांत करील... !!
-- नवनाथ बंडू पवार
औरंगाबाद, महाराष्ट्रा
११.०९.२०११

No comments: