Translate

Thursday, September 8, 2011

संसदेचे कामकाज दिवसभर साठी तहकूब......

नवी दिल्ली। दि. ७ (प्रतिनिधी)
१) दिल्ली उच्च न्यायालय परिसराततील आजच्या भीषण बॉम्बस्फोटाचा सदस्यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवून संसदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.
२) भारताची न्याय व्यवस्था भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही, असा संदेशच आज उच्च न्यायालयाच्या व्यवस्थापनाने दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेर स्फोट झाल्यानंतर काही तासांतच न्यायालयाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.
संसदेचे कामकाज दिवसभर साठी तहकूब तर ज्या ठिकाणी बोम्स्फोट झाले त्या हाय कोर्टाचे कामकाज मात्र लगेच कांही तासात सुरु............
आपले लोकप्रतिनिधि कामकाज बंद करून जीवाची दिल्ही साजरी करण्यात नेहमीच उत्सुक असतात. देशाच्या अड़चणी धोके यांच्याशी या खासदारांचे कांही देणेघेणे नाही. मेलेल्या खासदारांना श्रद्धांजली वाहून सुट्टी घेण्याचा अजब प्रकार भारतातच चालतो. यांना आपण सुट्या घेण्यासाठी मौज  भ्रष्ट्राचार करण्या साठी निवडून देतो का ? हा प्रश्न निर्माण होतो. सामान्य सरकारी नौकाराला २ दिवसाच्या वर जेल मध्ये टाकले तर त्याच्या नौकरी वर गदा येते. आणि राजा कलमाडी कानमोली अनेक महिन्या पासून जेल मध्ये सडत पडले तरी यांचे सभासदत्व रद्द होत तर नाहीच , पण ते जेल मध्ये असून ही सरकारी कार्यक्रम पत्रिके वर अजून ही त्यांचे नाव ........ यांच्या बरखास्ती बद्दल कांही कायदे कानून आहे की नाहीत. आताच बातमी आली नोट के बदले वोट या प्रकरणात मला ही जेल मध्ये टाका ही अडवाणी यांनी मागणी केली आणि लगेच गोंधळ आणि संसद स्थगित . ........काय खेळखंडोबा करून ठेवला आपल्या राजकारणी नेत्यांनी. आयोध्या कांडा बद्दल मला जेल मध्ये टाका........ असे कधी आडवाणी यांनी म्हंटल्याचे आठवत नाही...... संसद स्थगित झाल्यास खासदारांना दंड करण्यात यावा. .........अशी तरतूद करणे आवश्यक आहे.

No comments: