Translate

Saturday, September 24, 2011

महा घोटाळ्याच्या हिशोब ठेवण्यासाठी भारताचा परम सुपर संगणकाच सरकारने द्यावा.

नवी दिल्ली । राष्ट्रकुल आयोजन घोटाळाप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले आरोपी खासदार सुरेश कलमाडी यांच्यासह अन्य सात जणांना तुरुंगात संगणक उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

 
बरोबर आहे न्यायालयाचे . एव्हढा मोठा हजारो करोडोचा कॉमन वेल्थ चा घोटाळा , त्याचे हजारो भागीदार, यांचा हिशोब हा हाताच्या दहा बोटं वर थोडाच करता येणार आहे. त्यातच स्मृती नष्ट होण्याचा धोका हा सर्व अभ्यास करून त्यांना संगणक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे न्यायालयाचे मत झाले.  आणि कलमाडी  तुरुंगाच्या भिंतीवर  कोळश्यानी हा हिशोब लिहून ठेऊन करण्यास काय परकीय सरकारच्या  इंग्रजांचे कैदी आहेत. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळाचे संसदेचे ते इज्जतदार सदस्य आहेत. खरे तर त्यांना या महा घोटाळ्याच्या हिशोब ठेवण्यासाठी भारताचा परम सुपर संगणकाच सरकारने द्यावा.

No comments: