आपण हजारो वर्षा पासून गणेश आणि कोटी पेक्षा जास्त देवतांची पूजाअर्चा
करत आहोत ....लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ गणपती उत्सव चालू केला
त्यास आज ११८
वर्ष झाली. या काळात भारतात अनेक सामाजिक, सांस्कृतिक बदल झाले. त्याच
बरोबर गणेश उत्सवाचे स्वरूप ही बदलले. ..... पण देशातील परीस्थिती अधिकच
बिघडत चाललेली आहे. देव जर माणसाच्या मनोकामना पूर्ण करतो असे सांगितले
जाते तर असे व्हायला नको . बर कोणता ही भक्त बोंबस्फोट, दहशदवाद , अराजकता
रोगराई भ्रष्ट्राचार याची मागणी देवबाप्पा कडे करत नाही. मग हे न
मागितलेले वर देवबाप्पा मान्य करून आपल्याला या सर्व गोष्टीचा शाप का
देतो? हा एक प्रश्नच आहे. की आपल्या देवां पेक्षा अतिरेक्यांचा
भ्रष्ट्राचार्यांचा देव जास्त शक्तिशाली आहे? म्हणुन आपल्या देशात सतत
दहशद वाद भ्रष्ट्राचार वाढत आहे. नक्की कोठे चुकत आहे हे कोणी माहीत करून
देईल का???????
या उत्सवात कलमाडी सारख्या भ्रष्ट्र गुन्हेगाराचा पैसा लागत आहे. आणि
गावोगावी असे अनेक कलमाडी आहेत . नगरसेवक, आमदार खासदार या लोकप्रतिनिधी
नी जनसेवेच्या नावाखाली
लुबाडलेला पैसा ते या उत्सवात कार्यकर्ते सांभाळ करण्या करता करत असतात.
जनतेला व्यसनाच्या खाईत लोटून भ्रष्ट्र मार्गाने पैसा कामावणाऱ्या ना
स्वतः ला समाजात प्रतिष्ठेने मिरवण्या करता अश्या उत्सवाचा चांगला उपयोग
होतो. गणपती आणि नवरात्र हे दोन उत्सव साजरे केले की कार्यकर्ते यांची १२
महिन्याची तगडी कमाई होऊन जाते. परत हे कोणाचा तरी झेंडा खांद्यावर घेऊन
समाजात धुडघूस घालण्यास राडा करण्यास मोकळे यामुळे येथे गजाननाचे नाही तर सैतानाचे अस्तित्व असते. तरी पण गणेशउत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.!!!!!!!!!!!
No comments:
Post a Comment