Translate

Sunday, September 11, 2011

हा मौल्यवान उंची मुकुट सुद्धा रेड्डी बंधूंची पापे, काळे धंदे झाकू शकला नाही.

रेड्डी बंधू सारखे अनेक भ्रष्ट्र माफिया या भारतात प्रत्येक धर्मात आहेत, जे आपल्या पापात देवाला भागीदार करून घेतात . आपल्या अवैध धंद्याच्या कमाई तून त्यांनी तिरुपतीच्या बालाजीला ४२ कोटी रुपयांचा सोनेरी मुकुट अर्पण केला . विजयनगरच्या साम्राज्या पासूनच्या गेल्या ४०० वर्षाच्या तिरुपतीच्या इतिहासात  मंदिराला एव्हढ्या मोठ्या रक्कमेची एकरकमी  देणगी  कोणी ही दीली नव्हती. २० किलो शुद्ध सोने , ४००० कैरेट वजनाचे ७०००० रत्ने २.५ फुटाची उंची आफ्रिकेत तय्यार झालेल्या या मुकुटाचा खर्चच १० कोटी रुपयाच्या वर झाला . यावरून या मुकुटाच्या भव्यतेची, मौल्यवान किमतीची कल्पना येईल. ण हाय रे देवा!!  हा मौल्यवान उंची मुकुट सुद्धा  रेड्डी बंधूंची पापे, काळे धंदे  झाकू शकला नाही. कानून के हाथ लंबे होते है, कींवा भगवान के घर  मे देर है पर अंधेर नही.... या हिन्दी चित्रपट सृष्टीच्या प्रसिद्ध भावना , श्रद्धे प्रमाणे अखेर नाईलाजाने का होईना सरकारला रेड्डी बंधूंची तुरुंगात रवानगी करावी लागली.

तिरुपतीच्या संचालकांना नैतिकतेशी कांही देणेघेणे नाही यामुळे त्यांनी पापाचा मुकुट परत करण्यास नकार दीला. या तिरुपती, शिर्डी, अजमेर , दर्गा मंदीर , लालबागचा राजा चे स्तोम माजवून जनतेला लुबाडण्याचे पद्धतशीर कारस्थान चालू आहे,  याला आपण कीती बळी पडायचे हे ठरवणे आवश्यक आहे.  या राजरोस चालणाऱ्या लुटमारीला रोखण्यास भारतात कोणताही कायदा नाही. गुप्तदाना अंतर्गत काळा पैसा देणगी देण्याच्या प्रथेवर कायद्याने बंधन आणावे. आणि कोणत्याही धर्मातील संस्थाना ,देवालयाना गुप्त दान घेण्यास बंदी घालावी. तसेच या देवालयाना मिळणाऱ्या दानावर कांही टक्के कर लावावा. यांना ऑडित सक्तीचे करावे. दर ५ वर्षांनी नवीन देखरेख मंडळ स्थापन करावे. एकदा संधी दिल्यावर आयुष्यात परत संधी देऊ नये. तरच या पापाच्या भागीदारीला आळा बसेल. नाही तर........  आवो चोरो लुटो सारा आधा तुम्हारा आधा मेरा........ या देशात स्वातंत्र्या नंतर राजरोस चालूच आहे.

No comments: