Translate

Saturday, September 17, 2011

चिअर्स गर्ल्स सह बाजारीकरणाच्या हव्यासापायी खेळाचा सत्यानाश झाला आहे.

कार्डिफ - इंग्लंड दौऱ्यामधील मानहानीला दुखापती हेच प्रमुख कारण असल्याचे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आज (शनिवार) व्यक्‍त केले. ....... दुखापत नाही तर मैच फिक्स करता आल्या नाहीत , देशा करता नव्हे तर पैश्या करता खेळण्याची असलेली लोभी वृत्ती.  दुखापती असून हि व्यैयक्तिक विक्रमा साठी साठी संघात जागा अडवून ठेवण्याची लोभी वृत्ती. सराव करण्या पेक्षा शॉपिंग रेसिंग करता वेळ घालवणे अशी अनेक करणे पराभवास कारणीभूत आहेत . हेच खेळाडू IPL सामन्यात मात्र पैसा मिळतो म्हणुन जीव तोडून खेळतात. त्या वेळी कोणी आजारीपंणाचे दुखणे रडत नाही. जाहिरात करण्यासाठी दुखापत नाही, पण देशा करता खेळताना मात्र कच खातात. फक्त परदेश प्रवास, शॉपिंग, मौजमस्त्ती, या करताच संघात वर्णी लावून घेतली जाते. उगाच भूतकाळातील  कामगिरी चा बडेजाव करून संघात खोगीर भरती करण्या पेक्षा  जुन्या खोडांना संघातून हाकलून देणे हाच यावर एकमेव उपाय. चिअर्स गर्ल्स सह बाजारीकरणाच्या हव्यासापायी खेळाचा सत्यानाश झाला आहे. हेच खरे.
अहो ह्या क्रिकेट ला खड्य्यात घाला , देश्या पुढे दुसर्या खूप समस्या आहेत , कृपया क्रिकेट ला डोक्यावर घेऊ नका ,अमेरिका ,चीन ,जपान ,रशिया ,कोरें ,कॅनडा -असला भिकार खेळ खेळत नाहीत  फिर भी मेरा देश महान.

No comments: