Translate

Sunday, September 18, 2011

पितृपंधरवडा/ पितृपक्ष..............

भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण १५ या पंधरा दिवसांच्या कालावधीला पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा म्हणतात.
पितृपंधरवडा/ पितृपक्ष या कालात पृथ्वीवरील (मृत्यूलोकातील) माणसांकडे त्यांचे पितर निवासासाठी येतात. हे देवलोकातून, मृत्यूलोकातून, नरकातून, प्रेतयोनीतील असू शकतात. अश्या खोट्या भ्रामक चुकीच्या मूर्खपणाच्या  अंधश्रद्धा समाजात पसरवून सामान्य , बहुजन जनतेला लुबाडण्याचा राजरोस चालणारा हा उच्चवर्णीय वर्गाचा कुटील डाव मोडून काढण्याची आज गरज आहे. एकदा मेल्यावर सगळे संपते. त्या नंतर मानवी आत्म्याचे काय होते हे जगातील जिवंत असणाऱ्या कोणत्याही मानवाला माहीत नाही. आणि याचाच गैरफायदा घेत सामान्य, अडाणी जनतेला लुबाडण्याचा धंदा गेली हजारो वर्ष चालू आहे. श्राद्धात सांगितलेले वस्त्र (ऐच्छिक), त्रयोदशगुणी विडा, दक्षिणा इ. प्रकार करून आपल्या आई वडीलांच्या आत्म्यास शांती मिळवण्या पेक्षा , ते जिवंत असताना त्यांना चार घास सुखाने, प्रेमाने खाऊ दीले, त्यांचा आत्मसन्मान जपला, त्यांना मानाने वागवले तर ते प्रेत योनीत भूत योनीत कश्याला जातील.
ज्या मुलांना तळहाताच्या फोडा प्रमाणे  प्रेमाने जपले, दुधा पेक्षा साय महत्वाची म्हणत नातवंडाना त्यांनी सांभाळलेले असते, असे  ते आई वडील,  नातुचे आजी आजोबा मेल्यावर आपल्या मुलाला सुनेला नातवंडाना छळायला कश्याला या जगात येतील . हा साधा विचार सुद्धा आपण करत नाही ही आपल्या समाजाची शोकांतिका.
आई वडीलांच्या नावाने जेवण देण्याची जर एव्हढीच हौस असेल तर कोण्या अनाथ घरातील विद्यार्थ्यांना जेवण द्या, त्यांच्या शिक्षणा करता मदत करा, रात्री अंधारात रस्त्यावर कुडकुडत झोपणाऱ्या गरीबाच्या अंगावर चादर घाला हीच खरी सेवा. उगीच ज्यांच्या कडे आहे त्यांना वस्तू देऊन तुमच्या पितरांना नक्कीच शांती लाभणार नाही. अनाथांचे नाथ व्हा हीच खरी ईश्वर सेवा...........

1 comment:

aruna said...

एकदम खरं बोललात. सगंच पतलं. मी पण दर वर्षी असेच दान देते.