Translate

Sunday, August 28, 2011

ढवळ्या पवळ्या ला लाख लाख शुभेच्छा !!!!!!!!!!!

श्रमिकाना ही भावना मन असते त्याना सन्मानाने वागवा असा आज कार्पोरेट मन्त्र झाला आहे. पण भारतीय शेतकरयाना हा धड़ा शिकविण्याची गरज कधीच भासली नाही. ते आपल्या बरोबर शेतात राबणाऱ्या ढवळ्या पवळ्या च्या बैल जोडीला कधीच श्रमिक मानत नाही तर ते त्यांच्या कुटुंबातील  नातेवाईक सदस्यच असतात. एव्हढेच नव्हे तर त्यांचा वाढदिवस आणि इतर कौतुक कुटुंबाचा भाग म्हणूनच साजरा करत असतात. त्यांच्या कृतज्ञेपोटीचा पोळा हा सण उत्सव साजरा केला जातो. हे फक्त भारतातच घडू शकते  पोळ्याच्या सणा निमित्य शेतकरी बांधवाना आणि त्यांच्या ढवळ्या पवळ्या ला लाख लाख शुभेच्छा !!!!!!!!!!!

No comments: