Translate

Friday, August 26, 2011

मुंबई लुटली , मुंबईत जागोजाग खड्ड्यांचे जाळे निर्माण केले

आपली संस्कृती श्रावणबाळाची आहे , पण इकडे श्रावणबाळांनीपित्याची कावड रामलीलेवर ठेवून देश मुठीत ठेवण्याची योजना आखली आहे. अण्णांच्या या श्रावणबाळांना वेळीच आवरावे लागेल. अशा अस्सल ठाकरे शैलीत शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णांचे '३ इडियट्स' सहकारी अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण यांना टोला लगावला.
दिल्लीतील रामलीला मैदानावरचे नाट्य संपता संपत नाही. आमच्या अण्णांचे कुंकू लावून केजरीवाल , किरण बेदी , प्रशांत भूषण वगैरे मंडळीच्या मनास जे उधाण आले आहे त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ‘ शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड ’ अशा आशयाची एक म्हण मराठीत आहे. तसलाच काहीसा प्रकार यानिमित्ताने सुरू आहे, असा चिमटाही बाळासाहेबांनी टीम अण्णांना काढला.
संसदेचे महत्त्व किती कमी करायचे? न्यायालये तसेच पंतप्रधानही जनलोकपालाच्या पकडीत देऊन नवीन घटनात्मक हुकूमशाही निर्माण करावयाची का? असे प्रश्नही त्यांनी दैनिक सामनाच्या माध्यमातून उपस्थित केले आहे.
 ज्या माणसांनी आयुष्यभर मांडवली केल्या, तोडपाणी केले मराठी माणसास मूर्ख बनवत मुंबई लुटली , मुंबईत जागोजाग खड्ड्यांचे जाळे निर्माण केले, कॉंग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली. आणि वेळ येताच कर्तत्वान पुतण्यास  डावलून स्वतःच्या मुलाच्या , नातवाच्या  दावणीला मराठी माणसाचा पक्ष बांधला. त्यांना केजरीवाल बेदी, आण्णा ना बोलण्यास हक्क नाही.आणि जे स्वतःच बडव्याच्या नजरकैदेत आहेत त्यांनी आधि आपले पाहावे. सिव्हील सोसायटी  मी आण्णा

1 comment:

aruna said...

तुमचे अगदी खरे आहे.