कुलकर्णी सर, महागाई आत्महत्या पोस्ट वाचून बऱ्याच म्हणी आठवल्या तश्या ह्या
म्हणी अमेरिकेची पत घसरली तेंव्हा पासून मनात येतच होत्या. आपल्या
पूर्वजांनी जे जीवनाचे सूत्र सांगितले तेच आपण विसरलो आणि मग असा लोच्या
होऊन जीवन उध्वस्त होते. हे झाले शहरी मध्यम माणसाचे तर शेतकऱ्यांचे
प्रश्नच वेगळे आहेत.
अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा नाव मोठे लक्षण खोटे –
कीर्ती मोठी पण कृती छोटी .हात तोकडे पडणे कागदी घोडे नाचवणे कुऱ्हाडीचा
दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे हपापाचा
माल गपापा , बचती ने राष्ट्र मोठे होते कर्ज काढून गुंतवणूक नको! ऋण
काढून सण साजरा करू नये”, ”हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर
खावी. .. उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. उद्योगाचे घरी रिध्दी
सिध्दी पाणी भरी….उधारीचे पोते, सव्वा हात रिते. अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ
खातं.- आगीशिवाय धूर दिसत नाही-आज अंबारी, उद्या झोळी धरी.आभाळ फाटल्यावर
ढिगळ कुठे कुठे लावणार?ओल्या बरोबर सुके जळते. सगळी सोंगे आणता येतात पण
पैशाचे सोंग आणता येत नाही”. आमदनी अठन्नी खर्चा रुपइया पैशाचे नाव अर्थ
पण तो करतो मोठा अनर्थ (गोंदवलेकर महाराज) ..थेंबे थेंबे तळे
साचे……………………..