उन्हाळ्यात लिंबु शरबत, कैरीचे पन्हे, चिंचेचे पन्ह कोकम शरबत, अननस व मोसंबीचा रस, यासारखी शुष्कता घालवून शरीरास ताजेपणा देणारी घरगुती शीतपेये भारतात पूर्वी पासून घराघरात तय्यार होत होती. .........साधी गोष्ट गरम उन्हातून माणूस घरी आला तर, त्यास बैठकीच्या खोलीत थोडावेळ बसवून बाकी काही पाहुणचार देण्याआधी गूळ आणि पाणी द्यायची पद्घत होती ती भारतात खेड्यापाड्यात आज ही आहे. बाजारातील पेयांपेक्षा घरगुती पदार्थाचे सेवन हितकारक हाच या मागचा दृष्टीकोन होता.
पण परदेशी ड्रिंक्स च्या आकर्षक, आक्रमक जाहिराती आणि मार्केटिंग मुळे ही भारतीय पेये पिणे भारतीयांनाच कमीपणाचे वाटू लागले आणि तरुण पिढी हातात थम्स च्या कार्बन सोड्याची बाटली धरणे मोठेपणाचे लक्षण समजू लागली . आजच cafecoffeeday. या कॉफी विकणाऱ्या मोठ्या कंपनीने पन्ह कोकम शरबताचे शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्पादन सुरु केले असून भारतीय परंपरे प्रमाणे हे पेये लाभदायक असल्याचे जाहीर करत . फक्त ८० रुपये प्रति ग्लास प्रमाणे विकण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रात ४ कृषी विद्यापीठे असून ही यांना या साध्या उत्पादनाचे महत्व कळले नाही हे अपयशच म्हणावे लागेल. साधे ताक, मठ्ठा, लिंबू कोकम शरबत , पन्ह यात काय संशोधन करणार या नकारात्मक वृतीचा जेंव्हा ही विद्यापीठे त्याग करतील तेंव्हाच शेतकऱ्यांचे भले होईल...... तो दीवस दूर नाही जेंव्हा ही भारतीय स्वदेशी पेये परदेशी कंपन्या त्यांच्या ब्रण्ड नेम ने विकतील....
No comments:
Post a Comment