Translate

Sunday, May 29, 2011

बाळासाहेबांचा दिलदार मित्र की शत्रू ..... ???


मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयार केला आहे. चला, शिवसेनेला अडचणीत आणण्या करता  बाळासाहेबांचा दिलदार शत्रू सज्ज झाला. आता आठवले मुळे या नामकरण ला विरोध करता येत नाही . आणि विरोध केला तर आठवले बरोबरचा नवीनच असलेला हनिमून धोक्यात येईल .  आणि गप्प बसले किंवा मान्यता दिली तर  राज च्या हातात आयतेच कोलीत मिळेल आणि राजने नामकरणस  विरोध करत मराठी दादर अस्मिताचा आवाज केला की मतदार तुटतात . धरले तर चावते आणि सोडले तर राज पळवतो . राहता राहिला भाजपा. अखिल भारतीय पक्ष असल्याने  याला मात्र राज्य पातळीवरचे धोरणच नाही , यामुळे शिवसेनेच्या मागे फरफरट  जाण्या वाचून याला दुसरा कोणताही मार्ग नाही.  
अशी बिकट मुंबई महानगर पालिका निवडणूक झाली . दिलदार  पवारांच्या मनात नेमक काय आहे हे पवार ही सांगू शकत नाही. त्यांना राज ला मदत करायची, का कॉंग्रेस ला अडचणीत आणावयाचे की शिवसेनेला अपशकून करायचा होता हे महापालिकेच्या निवडणुकी नंतरच उजेडात येईल. आणि नवीन युती महापालिकेत उदयास येईल. तो पर्यंत सारेच आंधळ्या माणसां प्रमाणे पवार हत्ती दिसतात कसे याचा अंदाज करत बसतील.

No comments: