Translate

Tuesday, May 3, 2011

..अखेर महात्म्याने आमची जी नसबंदी केली आहे ना. मग हिंसक कसे होणार आम्ही.

  अमेरिकेने निर्माण केलेल्या भस्मासुराने अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरलाच जाळले . आणि भस्मासुरा प्रमाणेच अमेरिकेला त्रासून सोडले अखेर १० वर्षाच्या प्रयत्ना नंतर  आणि अगणित नुकसान सोसून या स्वनिर्मित भस्मासुरास ठार करून अमेरिकेने मोकळा  श्वास घेतला असेल. अमेरिकेच्या निवडणुकीत परत जिंकून येण्या साठी आणि घसरलेली लोकप्रियता वाढवण्यासाठी ओबामा नक्कीच या घटनेचा फायदा करून घेतील .जगभरातील राजकारणी हेच करत असतात. जनतेच्या सुख-दु:खाशी त्यांना कांही घेणे देणे असत  नाही. आपण उगीच इंडियन भ्रष्ट्र राजकारण्यांना दोष देतो. 

हं पण भारतीय राजकारण्यांचे वेगळे आहे. मतांच्या राजकारणा साठी दहशदवादी अफजल,कसाब ला न मारता त्यांना  बिर्याणी, शेर खुरमा  कबाब खाऊ घालत पोसत असतात. पाक वर हल्ला न करता बस रेल  यात्रा काढत असतात.  क्रिकेट मध्ये दुश्मन देश्या बरोबर मैच फिक्स करत जनतेला मूर्ख बनवत असतात. तर विनायक सेन, शर्मिला चानू सारख्या IRON LADY ला अन्याया विरुद्ध अहिंसक आमरण उपोषण  केले म्हणुन  जेल मध्ये टाकत असतात. ६० वर्षा पासून हा अन्याय आपले सरकार स्वकीयांवर करत आहे ..पण मानावातावाद्याना या कडे लक्ष देण्यास वेळ नाही. कारण काश्मीर मधील अतिरेकी किंवा गुजराथ मधील दंगलखोर मारला गेला म्हणुन छाती बडविण्यात आणि धर्मनिरक्षेप म्हणुन घेत कॅण्डल लाईट मोर्चा काढत मिडिया समोर चमकण्यात   यांचा वेळ जातो.  अखेर महात्म्याने आमची जी नसबंदी केली आहे ना. मग हिंसक कसे होणार आम्ही.

1 comment:

aruna said...

a long time back i had seen a marathi translation of 'Caucasian chalk circle' by PDA of Pune. it had a telling comment on the politicians and their chameleon behavior. it also showed how far they can go to achieve their personal betterment.