Translate

Saturday, May 7, 2011

जळी स्थळी काष्ठी पाषाणी भ्रष्ट्राचार आणि आण्णा बाबा हा एकच विषय झाला होता.

हायकमांड उर्फ राणीसाहेब आपल्या सरकारी निवासस्थानात रागारागाने फेऱ्या मारत होत्या .रोज सकाळी वर्तमान पत्र उघडले की भ्रष्ट्राचाराच्या बातम्यांनी त्यांचा दीवस सुरु व्हायचा . TV पाहावा म्हंटले तर तेथे ही आण्णा, बाबांचा जयजयकार जोरात सुरु असे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी भ्रष्ट्राचार आणि आण्णा बाबा  हा एकच विषय झाला होता.
पूर्वीच्या काळी मुघल सैन्याला   मराठ्यांच्या संताजी-धनाजी ची  इतकी धास्ती बसलेली होती;  की सैनिकांनाच काय पण घोड्यांनाही जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, संताजी-धनाजी दिसू लागत होते . नदीकाठच्या पाण्यात सुद्धा घोड्यांना संताजी-धनाजी  दिसत असावे अशी भीती मुघल सैन्याला वाटत होती. तसेच हाल आजकाल  हाय कमांडच्या  सुभेदारांचे झाले होते. या सुभेदारांना सर्वत्र आण्णा बाबा च दिसत होते. यामुळे पक्षाच्या तिजोरीत आणि वैयक्त्तिक फंडात ही टंचाई जाणवत होती. 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्या पासून लोकशाहीच्या नावा खाली त्यांच्याच घराण्याची या देशावर अनिर्बंध सत्ता होती. यामुळे या भ्रष्ट्राचाराची संशयाची सुई सतत त्यांच्या घराण्या भोवतीच फिरत असे. स्वातंत्र्या नंतर लालकिल्ल्यावर तिरंगा फडकवताना त्यांच्या आज्जे सासऱ्यांनी काळाबाजार, भ्रष्ट्राचार करणाऱ्यांना जाहीर फाशी देण्याची घोषणा केली होती.... पण निवडणुकीच्या मतांच्या  राजकारणात गेल्या ६५ वर्षात भ्रष्ट्राच्याऱ्याला   ही फाशी झाली नाही. एव्हढेच नव्हे तर स्वातंत्र्य भारतातील घोटाळ्यांच्या रुपयांनी हजारो करोडोची उड्डाणे लीलया पार केली. स्वातंत्र्याच्या पहिल्याच वर्षी 1948- जीप घोटाळा, 80 लाख रुपयांचा झाला . त्या नंतर सायकल आयात घोटाळा, बनारस हिंदू विद्यापीठ शैक्षणिक घोटाळा, 50 लाख रुपये , मुंदरा घोटाळा, 1 कोटी 25 लाख , तेजा लोन घोटाळा, 22 कोटी , नागरवाला घोटाळा ,इंदिरा गांधी- मारूती घोटाळा या प्रमाणे मारुतीच्या शेपटी प्रमाणे ही घोटाळ्यांची रांग वाढतच चालली होती आणि आज या घोटाळ्या नी कॉमनवेल्थ घोटाळा, 70 हजार कोटी, 2जी स्पेक्ट्रम घोटाळा, 1.76 लाख कोटी , शिधावाटप घोटाळा, 2 लाख कोटी अशी हजारो लाखो करोडोची उड्डाणे पार केली होती....... पण एकाला ही फाशीच काय साधी जेल ची हवा देखील खावी लागली नाही. उलट हेच भ्रष्ट्र लोक सत्तास्थानावर कब्जा करून बसले .  या वरून देशभरात राजकीय भूकंपाचे धक्के सुरू झाले होते.
दोन वर्षा पूर्वी निवडून आलेला उत्साह संपला होता. येणाऱ्या निवडणुकात काय होणार याची चिंता, त्यात बिहारात झालेल्या पानिपताने युवराजांच्या भवितव्याची काळजी वाढली. काळजावर दगड ठेवून , अशोकला घरी बसवले, कलमाडी राजा  यांना जेल मध्ये टाकावे लागले... .पण जनतेचा क्षोभ कमी झालाच  नाही तर जास्तच उफाळला. जंतर मंतर वरून लागलेल्या आगीच्या झळा आता   जनपथा वर बसत होत्या. यामुळे तातडीने कांही तरी करावे नाही तर हातात कांहीच राहणार नाही याची हायकमांडला खात्री पटली. हायकमांड जवळ आज अकबर राजा  सारखा बिरबल ही नव्हता. सर्व जी हुजरेगिरीची फौज जी त्यांनी  जमा केली होती . अखेर त्यांनी पक्षाचे चाणक्य दादांनाच शरण जायचे असा निश्चय केला. आणि त्या शांत झाल्या. 

भाग दुसरा फाशीचा सूळ...

1 comment:

aruna said...

अण्णा नवाचा जिनि( बाटलितला जदुइ राक्षस) एव्हढा पोवरफ़ुल निघेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नसेल.पण प्रत्येक गोष्टीला कधितरि अंत अस्तोच ना! अता त्यांचे १०० अपराध भरले असे वटतेय. बघुया पुढे काय होते ते!