Translate

Thursday, May 26, 2011

पुतळा उभारणे .... एक राजकारण....

गांधीनगर- नर्मदा नदीवरील धरणाजवळ उभारण्यात येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीचा प्रस्तावित पुतळ्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचे आता अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी या पुतळ्यासाठी १ हजार कोटी रुपयांचा खर्च येईल असा अंदाज होता.
पुतळ्याचे राजकारण बंद करा. जनतेला प्राथमिक सोयी सुविधा न देता अश्या उधळपट्टीवर खर्च करणे हा कायद्याने गुन्हा ठरवावा .या २००० कोटी मध्ये कितीतरी लोक उपयोगी कामे करता येवू शकतील . नेहरू खानदान  काय, मायावती काय आणि आता नाकाने कांदे सोलणाऱ्या भाजपचे नरेंद्र मोदी  काय सर्व एकाच माळेचे मणी आहेत हे सिद्ध होते. मानावाधिकारी, सामाजिक संस्था काय झोपल्या काय? सुप्रीम कोर्टाने स्वतः: यात लक्ष देवून असे पुतळे उभारणे , सरकारी योजनांना पक्षाच्या नेत्यांची नावे देणे कायद्याने बंद करावे.



जनतेचा सरकारी पैसा वापरून योजना आखायाच्या आणि त्या सत्ताधारी नेत्या च्या नावाने जाहीर करावयाच्या आणि जणू त्या सत्ताधारी पक्षानेच या योजना पक्षाच्या पैश्याने जनते करता राबविल्या असा देखावा करायचा असा फंडा कॉंग्रेस ने या देशात सुरु केला. आज भारतात ज्या सरकारी योजना चालू आहेत त्या ४९५ योजनांना नेहरू, राजीव गांधी परिवाराची नावे आहेत . जणू कांही देशात फक्त हे एकच घराणे गरीबा करता काम करते असा देखावा निर्माण केला जातो.. TV फुकट दारू फुकट अन्न फुकट अश्या योजना आखून जनतेच्या श्रम शक्ती चे खच्चीकरण केले जात आहे. निवडणुकीत अश्या घोषणा देऊन मते विकत घेतली जात आहे. हा  मते खरेदी विक्रीचा भ्रष्ट्राचार  निवडणूक आयोग आयोगाच्या आंधळ्या नजरे समोर राजरोस चालू असतो मग या नेत्यांना तरी का दोष द्यावा.
कोणत्या ही सरकारी योजनेला , संस्थेला , प्रतीष्टानाना  नेत्याचे नाव देवू नये.
नेत्यांचे पुतळे गलोगल्ली उभे न करता एकच पार्क उभारून तेथेच उभे करावेत.
नेता जिवंत असताना त्याचा पुतळा उभा करू नये. तसेच तो मेल्यावर दोन पिढ्या  नंतर जनतेला वाटले तर त्याचा पुतळा उभा करावा.

No comments: