आपण ज्या देवांची आपण भक्ती भावाने पूजा करतो त्या देवां कडे हे पुजारी साधे ढुंकून पण बघत नाहीत, कित्येक पुजारी देवळात लघुशंका करताना पकडले गेले आहेत, पण ते ब्राम्हण ते काहीही करतील आपला तो देव आहे, आपण तसे काही करायचे नाही फक्त कोणी देवाला वाईट बोलले तर त्याचे घर जाळायचे,आणि आपली भक्ती दाखवायची.Abhilash Deshmukhhttp://www.facebook.com/profile.php?id=100000981181310
या देशाचे सर्वात जास्त नुकसान जर कोणी केले असेल तर ते या मंदिरांनी आणि त्यांच्या या बडव्या दलालांनी केले आहे. आज ही कोणते ही वर्तमानपत्र वाचा हे पुजारी बलात्कार सारख्या कुकर्मात अडकलेले आहेत अश्या बातम्या असतात, यांच्या संपत्तीचे वैभव पाहून देवाच्या अर्थमंत्र्याला कुबेराला सुद्धा आपण गरीब आहोत याची लाज वाटेल. एका देवीच्या देवळातील पुजारी तर कित्येक दीवस आंघोळ करत नव्हता , केस दाढी विचित्र वाढलेली. चिलीम सतत प्यायचा अंगाला घाण वास यायचा तरी पण याच्या पाया पडण्यास पुरुषच नव्हे तर बाया ही पुढे-पुढे करायच्या. आणि मूर्ख भाविक त्याचा पाया पडून स्वता:ला धन्य समजत. यांच्या पेक्षा एखाद्या सफाई कर्मच्याऱ्याला त्याने सफाई केली म्हणून वंदन केलेले केंव्हाही चांगले असे मनापासून वाटते. करोडो रुपयांची संपत्ती असताना ही मंदिरे अस्वच्छ का ठेवतात , देवाच्या गाभारयात सुद्धा कुबट वास, अंधार का असतो हे शास्त्र मला तरी समजले नाही.
काळाबाजार वाले भ्रष्ट्राचारी यांच्या काळ्या पैश्यानी ह्यांच्या दानपेट्या भरभरून वाहतात. कित्येक भ्रष्ट्र अधिकारी, नेते, व्यापारी हे काळ्या पैश्याच्या बेईमानी च्या कमाई मधील १०-२०% इतकी रक्कम या देवताना दर वर्षी वाहतात आणि आपल्या पापात देवाला सामील करून परत भ्रष्ट्र काम करावयास मोकळे होतात. खर तर हा दानाचा प्रकारच बंद करावा. या पापाच्या भागीदारीत तिरुपती आणि शिर्डीचे साईबाबा यांना विशेष प्राधान्य आहे. पण फट म्हणता ब्रम्ह हत्त्या व्हायची म्हणुन कोणी बोलत नाही.... भाविकांची क्षमा मागून....
1 comment:
great.......
Post a Comment