मी नेहमी मुंबई ला कामाला येतो . पहिल्या दिवशी VT स्टेशन पाहून छाती दडपून गेली होती. त्या नंतर प्रत्येक वेळी या स्टेशन वर उतरलो की असेच होते. आज ही या स्टेशन च्या भव्यतेची बरोबरी भारतातील कोणते ही स्टेशन करू शकत नाही. आज तर स्टेशन बांधले की महिन्याभरात त्याचे नुतनीकरण सुरु होते. पेव्हर चे अर्थकारण आणि राजकारण फार मोठे आहे. कायद्याने रस्त्यावर पेव्हर टाकणे बंद करावे . बेलार्ड पिअर, ते लायन गेट किंवा प्रिन्स ऑफ वेल्स पर्यंत , डॉक यार्ड रोड.. हा विभाग तर अत्यंत रमणीय आहे. येथे आल्यावर भारतात आहे असे जाणवत नाही. गर्दीत ही रमतगमत फिरण्यास येथे मजा येते. सर्वप्रथम बांधकामाची बिल्डर्स आणि राजकारण्यांच्या तावडीतून सुटका केली पाहिजे ; नाही तर ५०-६० वर्षा नंतर या शहरात राहणारी तरुण पिढी नक्कीच आपल्याला शिव्या घालेल .
मुंबई या नावाचा दबदबा भारतात फार मोठा आहे. महाराष्ट्र बाहेर परराज्यात गेलो की कोठे राहतात विचारले की माझे गाव ते कोठे आहे कस आहे हे सांगत बसण्या पेक्षा सरळ मुंबईत राहतो म्हणुन सांगतो .समोरचा माणूस आदराने तुमच्या कडे पाहत अर्धा खल्लास होतो. एव्हढी जादू या नावाची आहे. मध्यरात्री उशीरा मराठी नाटक/सिनेमा पाहून रस्त्याने एकट्या जाणाऱ्या स्त्रियांचे उत्तर भारतीयांना विशेषता:ह दिल्ही च्या नागरिकांना भलतेच आश्चर्य आणि कौतुक वाटते. हे मी स्वतः अनेकदा अनुभवले आहे.
CID मधील बदरुद्दीन जमालुद्दीन काजी उर्फ़ जानीवाकर जे मुंबई मध्ये बस कंडक्टर होते . आणि ज्यानी मुंबई चे जीवन स्वत: अनुभवले होते . बस मध्ये टिकिट काटता काटता लोकांचे मनोरंजन करत करत एक दिवस हिंदी सिने जगात प्रवेश करते झाले . येथे कधी कोणाचे नशीब उजळेल हे सांगता येत नाही तसे कधी रावाचा रंक होईल हे ही सांगता येत नाही . CID मध्ये त्यानी मुंबई वर गायलेले गाणे आज ही ताजे वाटते. आणि तेच गाणे मुंबईची खरी ओळख आहे.
कहीं बिल्डिंग कहीं ट्रामे, कहीं मोटर कहीं मिलमिलता है यहाँ सब कुछ इक मिलता नहीं दिल
इन्साँ का नहीं कहीं नाम-ओ-निशाँ
ये है बम्बई मेरी जान http://filmkahani.com/bollywood-melodies-lyrics/cid-yeh-hai-bombay-meri-jaan.html
No comments:
Post a Comment