शिक्षकांना वर्षातून 366 दिवसांपैकी तब्बल 144 दिवस अधिकृत सुटय़ा असून केवळ 234 कामकाजाचे दिवस आहेत़ यामध्ये किरकोळ, अर्जित रजा आणि वैद्यकीय सुटय़ांचा हिशोब लावला तर शिक्षकांना सुटय़ा किती, याचा पालकांनी विचार न केलेलाच बरा, मात्र या सुटय़ा अधिकृत असल्यामुळे त्यांना या सुटय़ांच्या कालावधीत वेतन पूर्णपणे मिळत़े विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेणार्या शुल्काचा हिशेब हा पूर्ण वर्षभराचा असतो़
त्यामुळे पालकांना भुर्दंड पडतो तो पूर्ण वर्षाचाच़ 2011-12 या शैक्षणिक सत्राचा विचार केल्यास मे 2011 पासून कामाला सुरुवात होईल़ एप्रिल 2012 मध्ये शैक्षणिक सत्र संपत़े .त्यामध्ये 366 दिवसांचे सत्र पकडल्यास 53 रविवार, 19 सार्वजनिक सुटय़ा, दिवाळी सुटय़ा 7, मुख्याध्यापक व जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील 6 सुटय़ा, उन्हाळी 47 आणि प्रत्येक शिक्षक हा 12 किरकोळ रजा घेतोच, अशा तब्बल 144 सुटय़ा शिक्षकांना अधिकृत मिळतात़.
Pawan Banokar facebook. हे मत फेसबुक वर वाचले आणि मी विचार करू लागलो की आपणास इतरांचे काम नेहमीच सोप्पे वाटत असते. या करता आपण असा विचार करतो. एरवी पालक मुलाला हॉटेल मध्ये घेवून जावून हजार भर रुपये सहजच खर्च करतात पण शिक्षण म्हंटले की ते कमी पैश्यातच झाले पाहिजे ही आपली मानसिकता बदलत नाही. शिक्षक म्हणुन समाजात वावरत असताना समाज त्यांना कांही विशेष सवलती देत नाही. की कमी खर्चात त्याच्यावर ओषध उपचार करत नाही. दैनंदिन वस्तू ही त्यांना बाजारभावानेच घ्याव्या लागतात. मग शिक्षणच कमी खर्चात झाले पाहिजे हा आपला हट्ट का?
पवन राजा, शिक्षकांच्या सुट्या तु ज्या मोजल्या त्य बरोबर आहेत. 53 रविवार, 19 सार्वजनिक सुटय़ा, जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील 6 सुटय़ा , 12 किरकोळ रजा या सुट्ट्या भारतात सर्व सरकारी नौकर वर्गाना असतात. हे तु विसरलास. शिक्षकांच्या फक्त सुट्ट्याच दिसतात पण त्यांना जी अशैक्षणिक कामे १२ महीने २४ तास करावी लागतात ती कधी समाजाला दिसली नाहीत . सरकारचा कोणता ही उपक्रम असो शासन शिक्षकांनाच हक्काचा बिनपगारी नौकर म्हणुन वापरते. कुटुंब नियोजन ते एड्स निर्मूलनाला प्रचार प्रभात फेऱ्या काढण्याचे कार्य करणे, हे काय शिक्षकाचे काम आहे? लहान मुलांना घेऊन एड्स च्या प्रभात फेऱ्या हा मूर्ख प्रकार फक्त आपल्या देशाची संस्कृती या विकृती आहे. अरे जेथे या विषयावर उघड बोलण्याचे आपण टाळतो तेथे एड्स वर रस्त्यावर लहान मुलानं कडून हातात बोर्ड्स घेवून फिरण्याच्या वेळी शिक्षकाची काय हालत होत असेल याची कल्पना कर. बँक किंवा इतर सरकारी नौकारा प्रमाणे शिक्षकांना प्रवास भत्ता किंवा अलोंस भेटत नाही. सुटय़ांच्या कालावधीत वेतन पूर्णपणे मिळत़े . हे म्हणणे तर निव्वळ विनोद नव्हे तर शिक्षकांची क्रूर चेष्टा आहे. अरे १० हजार रुपयांच्या पावती वर सही घेऊन संस्था चालक मालक यांच्या हातावर ३ हजार सुद्धा ठेवत नाही. आज मुजूर सुद्धा या पेक्षा जास्त महिना ५ हजारच्या वर कमावतो. पण पांढरपेशा वर्गा मुळे मजुरी ची लाज वाटत असल्याने शिक्षक हा वर्ग संस्था चालकाची गुलामगिरी सहन करत असतो . हे लक्षात घे.
आणि सुट्ट्यात शिक्षक रिकामे बसत नाही नाही अनेक कामे चालू असतात. म्हणुन आरोप करण्या आधि विचार करावा. इतर बाबीवर बेफाम खर्च करताना पालक कांही विचार करत नाही. त्यांच्या बालकास भावी नागरिक बनविण्याचे कार्य जे शिक्षक करतो त्याची किमत पैश्याच्या मोबदल्यात होऊ शकत नाही.
अब्राहम लिंकन ने आपल्या मुलाच्या जीवनात शिक्षकाचे महत्व आणि त्यास काय काय शिकवावे या
बद्दल मुलाच्या शिक्षकाला पत्र लिहिले होते ते जरूर वाचा
No comments:
Post a Comment