हिन्दू एक समृद्ध अडगळ

भालचंद्र नेमाडे म्हणतात तेच खर आहे हिन्दू एक समृद्ध अडगळ नवीन गोष्टी स्वीकारत असतानाच जुन्या पुराण्या गोष्टीचा मोह सुटत नाही. आजच्या वेगवान जीवनप्रवाहात ही जुनी विचारसरणी , हे नाटक पाहायला कोणाला वेळ आहे? आणि अशी नाटक बसविण्यात येणारा प्रचंड खर्च, तो वसूल व्हावा म्हणुन आकारावी लागणारे प्रचंड तिकिटाचे दर कोणाला परवडणार आहेत. आणि ५-६ तास समरसून काम करणारे नाट्य कलावंत तरी मिळतील का?दोन अडीच तासाच्या नाटकात काम करताना यांना तर पडदा कधी पडतो आणि चौथा अपेयपान अंक कधी सुरु होतो याचे वेध लागलाले असतात. सेनेमा काढून दोन घटका मनोरंजन म्हणुन हा प्रयोग ठीक आहे. हाच सेनेमा जर श्री नितीन चंद्रकांत देसाई यांनी ६-७ तासाचा काढला असता तर किती प्रेक्षक अखेर पर्यंत बसून राहिले असते? पुढील प्रेक्षकाची प्रतिक्रिया बोलकी आहे.आणि हो! चित्रपटाच्या अखेरीस बालगंधर्वांची दुर्मिळ छायाचित्रे दाखवतात. तेव्हा उगीच बाहेर पडण्याची घाई न करण्याची प्रेक्षकाना विनंती. काही प्रेक्षकांना गर्दी व्हायच्या आत पार्किंग मधून गाडी काढायची इतकी घाई होते की बाकीचे प्रेक्षक अजून बसले असतानाच त्यांच्या मधून उठून व्यत्यय आणतात. तेव्हा कृपा करुन पडदा काळा होईपर्यंत खुर्चीतून उठू नये एवढीच ह्या पुणेरी प्रेक्षकाची विनवणी! http://sukameva.wordpress.com/
No comments:
Post a Comment